Skip to content
  • Thu. Jun 26th, 2025
    • आमच्या बद्दल (About us)
    • गोपनीयता धोरण (Privacy Policy)
    • आमच्याशी संपर्क साधा (Contact us)
    agmarathi logo

    agmarathi.in

    शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनाविषयी अद्ययावत माहिती आणि बातम्या

    Home
    • मुख्य पृष्ठ
    • कृषि
    • पर्यावरण
    • ग्रामीण विकास
    • शाश्वत जीवन
    • अन्न आणि पोषण
      • पाककृती
    • सरकारी योजना
    • नोकऱ्या
    '
    agmarathi logo

    agmarathi.in

    शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनाविषयी अद्ययावत माहिती आणि बातम्या

    • मुख्य पृष्ठ
    • कृषि
    • पर्यावरण
    • ग्रामीण विकास
    • शाश्वत जीवन
    • अन्न आणि पोषण
      • पाककृती
    • सरकारी योजना
    • नोकऱ्या
    HomeFood and NutritionRecipesस्वादिष्ट आणि आरोग्यदायी: नाचणी-फुटाण्याचे झटपट लाडू
    Nachni and Futanyache Ladu
    नाचणी व फुटाण्याचे पौष्टिक लाडू
    Recipes

    स्वादिष्ट आणि आरोग्यदायी: नाचणी-फुटाण्याचे झटपट लाडू

    author
    By प्राची राजूरकर
    July 7, 2024July 14, 2024
    0 minutes, 16 seconds Read

    सणासुदीचा काळ असो किंवा घरगुती कार्यक्रम, लाडवांचा साज कधीही कमी पडत नाही. महाराष्ट्रातील पारंपरिक मिठाईंपैकी नाचणी आणि फूटाण्याचे लाडू खास आहेत. हे लाडू स्वादिष्ट तर असतातच, पण त्यात पौष्टिकतेचा खजिनाही भरलेला असतो. नाचणी हे कॅल्शियम, आयर्न आणि फायबरने समृद्ध धान्य आहे, तर फूटाणे प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. विशेष म्हणजे, या लाडवांची रेसिपी अतिशय सोपी आणि कमी साहित्य लागणारी आहे. काहीच वेळात तुम्ही या पौष्टिक आणि चविष्ट लाडवांचा आनंद घेऊ शकता. चला तर मग, जाणून घेऊया नाचणी आणि फूटाण्याच्या लाडवांची ही खास, सोपी रेसिपी!

    नाचनीला इंग्रजीत Finger millet म्हणतात. नाचणीचे शास्त्रीय नाव एल्युसिन कोराकाना (Eleusine coracana) आहे. नाचणी ला हिंदीत मेधुवा सुद्धा म्हणतात.

    नाचणी / Finger millet

    नाचणीला सुपरफूडचा टॅगही देण्यात आला आहे. नाचणी हे दररोज खाल्ल्या जाणाऱ्या धान्यांचा एक प्रकार आहे जे विशेषतः भारत, नेपाळ श्रीलंका, थायलंड आणि आफ्रिकेतील काही विशिष्ट ठिकाणी पिकवले जाते. भारतात नाचणीची लागवड मुख्यता दक्षिण भारतात केली जाते. नाचणी या वनस्पतीची उंची सुमारे 2 ते 3 फूट असते. नाचणी आकाराने अतिशय लहान असून तिचा रंग लाल असतो. कमी सुपीक जमिनीतही नाचणीची चांगली लागवड करता येते.

    Finger-Millets-Ragi
    Finger Millets, Image credit: https://www.flickr.com/photos/13070711@N03/53346898615

    नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यांसारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे चांगली असतात. नाचणीमध्ये फायबरचे प्रमाण आणि अमिनो ॲसिडही चांगल्या प्रमाणात असते. नाचणी पचन सुधारण्यासाठी, उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि हाडे आणि दात निरोगी ठेवण्यासाठी खूप चांगले कार्य करते. नाचणी हे ग्लूटेन मुक्त धान्य (Gluten-free grains) आहे, याचा अर्थ ज्यांना ग्लूटेनची ऍलर्जी आहे तेही नाचणीचे सेवन करू शकतात. ग्लूटेन ऍलर्जी असलेले लोक गहू, बार्ली आणि त्यांचे पीठ खाऊ शकत नाहीत, परंतु ते नाचणीचे पीठ खाऊ शकतात.

    फुटाणे/ Roasted Gram

    फुटाणे म्हणजेच रोस्टेड ग्राम (Roasted Gram), भाजलेले चणे किवा हरभरा. साधारणपणे लोक स्नॅक्सच्या स्वरूपात खातात. मात्र या फुटाण्याचे अनेक आरोग्यवर्धक फायदे आहेत. फुटण्याच्या सालीमध्ये फायबर आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे फुटाणे खाल्ल्यानंतर पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते. फायबर असल्यामुळे ते पचायला जास्त वेळ लागतो त्यामुळे लवकर भूक लागत नाही.

    फुटण्याचे आणखी काही फायदे म्हणजे, फुटाण्यांमध्ये कॅलरीज खूप कमी असतात. त्यामुळे अनेकदा वजन कमी करण्यासाठी (weight loss) फुटाणे खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, लोह आणि इतर अनेक जीवनसत्त्वे असतात. फुटण्याचे नियमित सेवन केल्याने रक्तातील साखर आणि मधुमेह नियंत्रणात राहतो. याशिवाय फुटाणे हाडांना निरोगी ठेवण्यास मदत करतात आणि हृदयासाठीही ते फायदेशीर आहे. फुटाण्यामुळे बॅड कोलेस्टेरॉल (Bad cholesterol) सुद्धा कमी होते.

    Roasted gram_futane
    Roasted gram

    गुळ /Jaggery :

    उसाचा रस आटवून गुळ तयार केला जातो. गूळ तयार करताना उसामध्ये असणारी विविध पोषकतत्वे, खनिजे, क्षार व व्हिटॅमिन्स गुळामध्ये टिकून राहतात. गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅंगनीज ही पोषकघटक मुबलक असून यात व्हिटॅमिन-B, कॅल्शिअम, जस्त, फॉस्फरस व तांबे यासारखी महत्वाचे घटकही असतात.

    Jaggery
    Jaggery cubes, Image credit: https://commons.wikimedia.org/wiki/File:Jaggery_cubes.jpg

    गुळ खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत:

    हिमोग्लोबिन वाढवते, स्त्रियांसाठी उपयुक्त, रक्तदाब नियंत्रित ठेवतो, पचनशक्ती सुधारते, लिव्हर डिटॉक्सिफिकेशन करते. आयुर्वेदात गुळाचे खूप महत्व आहे. त्यामुळे अनेक आयुर्वेदिक औषधेही गुळाबरोबर दिली जातात.

    साहित्य – नाचणी आणि फूटाण्याचे लाडू

    1. नाचणी चे पीठ – दोन वाट्या
    2. फुटाणे– एक वाटी
    3. गुळ – दिड वाटी

    बनविण्याची विधी- नाचणी आणि फूटाण्याचे लाडू

    1. सर्वप्रथम नाचणीचे पिठ व्यवस्थितपणे तव्यावर भाजून घ्यावे.
    2. त्यानंतर फुटाणे व्यवस्थित स्वच्छ करून त्याची बारीक पावडर करून घ्यावी.
    3. भाजलेले नाचणीचे पीठ व फुटाण्याची पावडर एकत्र करून घ्यावी.
    4. त्यानंतर गुळ व्यवस्थित रित्या कुटून घ्यावा.
    5. त्यानंतर कढई मंद आचेवर ठेवून गरम झालेल्या कढईत बारीक केलेला गुळ टाकून थोडा वितळू द्यावा त्यातच एकत्र केलेले नाचणी व फुटाण्याचे पीठ मिसळून सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून गस बंद करावा.
    6. मिश्रण थोडे कोमट असतानाच हाताला थोडे तूप लावून त्याचे लाडू वळून घ्यावे.

    तर तयार आहेत आपले पौष्टिक लाडू!

    Nachni and Futanyache Ladu
    नाचणी व फुटाण्याचे पौष्टिक लाडू

    आरोग्य आणि पोषण सूचना: या वेबसाइटवरील आरोग्य आणि पोषण माहिती सामान्य माहिती देण्यासाठी आहे. प्रत्येकाची पोषण गरज वेगवेगळी असू शकते. वैयक्तिक आहार सल्ल्यासाठी आपल्या आरोग्यतज्ञाचा सल्ला घ्या. आम्ही दिलेल्या माहितीची अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ही माहिती वैद्यकीय सल्ला नाही.

    Share this:

    • Post
    • Click to share on Reddit (Opens in new window)Reddit
    • Click to share on Telegram (Opens in new window)Telegram
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)WhatsApp

    Related

    Tags: Finger millet Jaggery Nachani Recipes Roasted Gram गुळ पाककृती पौष्टिक लाडू फुटाणे मराठी रेसिपीज लाडू
    author

    प्राची राजूरकर

    प्राची पर्यावरण शास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीधर असून त्यात संशोधन देखिल करीत आहे. याचबरोबर ती शिक्षणशास्त्रात पदवीधर असून कायद्याची देखील पदवीधर आहे. थोडक्यात सांगायचेच तर ती एक संशोधक, शिक्षण व कायदेतज्ञ आहे, आणि मुख्यत्वे ती वनीकरण क्षेत्रात निपुण असून एका जवाबदार पदावर कार्य करीत आहे. तिला विविध सरकारी योजनाबद्दलचे माहिती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवायला आवडते जे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी तसेच मोठ्या सामाजिक परीवर्तनासाठी फायदेशीर ठरेल.

    Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana in Maharashtra
    Previous

    महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: संपूर्ण माहिती

    Bajarichya Pithachi Ukadpendi- Dish
    Next

    बाजरीच्या पिठाची उकडपेंडी: स्वादिष्ट, 15 मिनिटात तयार, ग्लूटनफ्री

    Similar Posts

    स्वीट कोर्न चा उपमा_ Sweet corn upma
    Recipes

    फायबर युक्त स्वीट कॉर्न चा उपमा

    author
    By प्राची राजूरकर
    August 4, 2024August 4, 2024
    करटोली ची भाजी_ Spiny gourd curry
    Recipes

    करटोली ची भाजी – आरोग्याचा खजिना

    author
    By प्राची राजूरकर
    August 13, 2024August 13, 2024

    Leave a ReplyCancel reply

    Subscribe via email!

    Subscribe to agmarathi newsletter

    Recent Posts

    • रात्रीचा सम्राट: घुबडाची अद्भुत कहाणी
    • मी आहे संपत्ती, समृद्धी आणि अढळ विश्वासाचे प्रतीक – मी आहे र्‍होडोडेंड्रॉन!
    • झिरो एनर्जी कूल चेंबर – फळे व भाजीपाला ताजे ठेवण्याचा कमी खर्चाचा उपाय
    • मी आहे बेस्ट आर्किटेक्ट! – सुगरण पक्ष्याचं अफलातून घरटे
    • वन्यप्राणी गणना बुद्ध पौर्णिमेलाच का करतात?
    • संत्रा बागेसाठी रोगमुक्त रोपे कोठे खरेदी करावी
    • कावळा आणि मुंग्यांचं नैसर्गिक हॉस्पिटल!
    • मेंढपाळाचा मुलगा ते UPSC अधिकारी : बिरदेव डोणे यांची जिद्दीची कहाणी
    • मातीचे गुणधर्म: शेतीसाठी माती किती उपयुक्त आहे हे कशावर ठरते?
    • देशी कोंबडी की देशी-टाईप? खरी ओळख, अंड्याची व मांसाची गुणवत्ता आणि बाजारातील फसवणूक उघड

    आम्हाला फॉलो करा

    • facebook
    • twitter
    • instagram
    • youtube
    Test

    प्रधानमंत्री सौरघऱ – मोफत वीज योजना: संपूर्ण माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया

    भारत सरकारने हरित उर्जेचा प्रचार आणि वीज बचतीसाठी १३ फेब्रुवारी...
    VIEW MORE
    Test

    ॲग्रीस्टॅक: शेतकऱ्यांच्या डिजिटल ओळख, मुख्य आव्हाने, आणि सहभागी होण्याची प्रक्रिया

    ॲग्री स्टॅक (Agri Stack) एक डिजिटल पायाभूत सुविधा आहे जी...
    VIEW MORE
    Test

    पीएम-कुसुम योजना: कॉम्पोनंट-ए – संपूर्ण माहिती

    पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान (PM-KUSUM / पीएम-कुसुम...
    VIEW MORE
    • आमच्या बद्दल (About us)
    • गोपनीयता धोरण (Privacy Policy)
    • आमच्याशी संपर्क साधा (Contact us)
    A theme by Gradient Themes ©