पावसाळा सुरु झालाय, सगळीकडे स्वीट कॉर्न उपलब्ध आहेत. आणि मक्याचे पदार्थ फक्त चवीलाच नाहीतर आरोग्यासाठीही उत्तम असतात. थंडीमध्ये अनेक भाज्यांमध्येही मक्याच्या पीठाचा तुम्ही वापर करू शकता. खरंतर थंडीत मक्यापासून विविध पदार्थ बनवण्यामागे यापासून मिळणारं भरपूर पोषण आहे. चला तर मग बनवूया स्वीट कॉर्न चा उपमा (Sweet corn upma).
व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने भरपूर असलेला मका हा फक्त भारतातच नाहीतर विदेशातही भरपूर प्रमाणात वापरला जातो. मक्याचं कणीस आणि पॉपकॉर्न्सचा आस्वाद तर आपण घेतोच. या पावसाळ्यात गरमागरम स्वीट कॉर्न चा उपमा (मक्याचा उपमा) आज आपण बनवणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांना दुपारच्या सुट्टीत खाण्यासाठी डब्यात द्यायला किवा नाष्ट्यासाठी एकदम उत्तम आणि करायला अगदी सोप्पा!
या स्वीट कॉर्न च्या उपम्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल ते बघूया.
बनविण्यासाठी लागणारे साहित्य- स्वीट कॉर्न चा उपमा
- स्वीट कॉर्न -१ (स्वीट कॉर्ण चे दाणे सोलून मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यावे )
- हिरवी मिरची -४
- कांदा -१ बारीक कापलेला
- टोमाटो-१ बारीक कापलेला
- कढीपत्ता-२ पाने
- कोथिंबीर -४-५ काड्या बारीक कापलेला
- मीठ -१ चमचा
- जिरे १/२ चमचा
- मोहरी १/२ चमचा
- हळद -१/२ चमचा
- तेल ३ चमचे
बनविण्याची विधी- स्वीट कॉर्न चा उपमा
- प्रथम कढई मध्ये तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, घालून थोडावेळ फोडणी तडतडू द्यावी. त्यानंतर बारीक कापलेला कांदा ,टमाटर,व मिरची घालून परतून घ्यावा.
- त्यानंतर त्या मिश्रणात हळद , मिठ व मिक्सर मध्ये बारीक केलेले स्वीट कॉर्न चे दाणे घालून व्यवस्थितपणे एकत्रित करून घ्यावे.आणि चांगले लालसर भाजून घ्यावे.
- त्यानंतर कढई वर झाकण ठेवून मंद आचेवर वाफ निघेपर्यंत आतील मिश्रण शिजू द्यावे.
- पाच मिनिटांनी झाकण काढून आतील मिश्रण व्यवस्थित फिरवून घ्यावे. शेगडी बंद करावी.
- वरून कोथिंबीर कांदा घालून अत्यंत पौष्टिक स्वीट कॉर्न चा उपमा खाण्यासाठी तयार आहे!
तुम्हाला योग्य पद्धतीने वजन वाढवायचे असेल तर तुम्ही आहारात मक्याचे प्रमाण वाढवू शकता. मक्याचं पीठ हे त्यांच्यासाठी खासकरून फायदेशीर मानलं जातं, ज्यांना थंडीत पचनाचा त्रास होतो. मक्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने ते पचायला अगदी सोपं असतं. तुम्ही तुमची पचनशक्ती सुधारण्यासाठी आहारात मका, मक्याचे पीठ, यापासून बनवलेले पदार्थ समाविष्ठ करू शकता. ज्यामुळे आतड्यांना आराम मिळेल आणि तुमची पचनशक्ती सुधारून पोट निरोगी राहिल.