Skip to content
  • Fri. May 9th, 2025
    • आमच्या बद्दल (About us)
    • गोपनीयता धोरण (Privacy Policy)
    • आमच्याशी संपर्क साधा (Contact us)
    agmarathi logo

    agmarathi.in

    शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनाविषयी अद्ययावत माहिती आणि बातम्या

    Home
    • मुख्य पृष्ठ
    • कृषि
    • पर्यावरण
    • ग्रामीण विकास
    • शाश्वत जीवन
    • अन्न आणि पोषण
      • पाककृती
    • सरकारी योजना
    • नोकऱ्या
    '
    agmarathi logo

    agmarathi.in

    शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनाविषयी अद्ययावत माहिती आणि बातम्या

    • मुख्य पृष्ठ
    • कृषि
    • पर्यावरण
    • ग्रामीण विकास
    • शाश्वत जीवन
    • अन्न आणि पोषण
      • पाककृती
    • सरकारी योजना
    • नोकऱ्या
    Homeकिड्स कॉर्नररात्रीचा सम्राट: घुबडाची अद्भुत कहाणी
    Indian Eagle Owl_घुबड
    घुबड, Image credit: https://commons.m.wikimedia.org/wiki/File:Indian_Eagle_Owl_2.jpg
    किड्स कॉर्नर

    रात्रीचा सम्राट: घुबडाची अद्भुत कहाणी

    author
    By प्राची राजूरकर
    May 9, 2025May 9, 2025
    0 minutes, 5 seconds Read

    बालमित्रांनो, हॅरी पॉटर (Harry Potter) मालिकेत जादूच्या जगात दूत म्हणून काम करणारा घुबड तुम्ही पाहिला असेलच. विनी द पू (Winnie-the-Pooh) मध्ये घुबडाचे पात्र ज्ञानाचे प्रतिनिधित्व करते, हेही तुम्हाला माहिती आहेच! पण “काय रे घुबडतोंड्या!” असं उपहासाने कोणी तरी म्हणताना ऐकलंय ना? काही लोक तर मला अशुभही मानतात. पण हे सगळं चुकीचं आहे बरं का! मी आहे घुबड- एक अनोखा आणि अद्वितीय पक्षी.

    माझी ओळख – एक निशाचर शिकारी!

    मी स्ट्रिजिफॉर्मेस (Strigiformes) या वर्गातील एकाकी आणि निशाचर शिकारी पक्षी आहे. माझ्या रात्रीच्या सवयी, वेगळं रूप आणि शिकार करण्यात असलेल्या कौशल्यामुळे लोक मला वेगळ्या नजरेने पाहतात. आम्ही मुख्यतः सस्तन प्राणी, कीटक आणि इतर लहान पक्ष्यांची शिकार करतो. काही आमच्या प्रजाती मासे पकडण्यातही तरबेज आहेत!

    जगभरात माझ्या २०० पेक्षा जास्त प्रजाती आढळतात, तर भारतात सुमारे ६० प्रजाती आणि उपप्रजाती आहेत. माझ्यातील सर्वात छोटा सदस्य म्हणजे एल्फ आऊल, ज्याची उंची केवळ ५ ते ६ इंच असते. तर माझ्यातलाच एक भला मोठा सदस्य म्हणजे ग्रेट ग्रे आऊल, ज्याची उंची तब्बल ३२ इंचांपर्यंत जाऊ शकते!

    भारतीय संस्कृतीत माझं महत्त्व

    भारतीय संस्कृतीत मला लक्ष्मी देवीचे वाहन मानतात. मला शुभ आणि धनसंपत्तीचे प्रतीक मानले जाते. काहींनी मला बुद्धिमान पक्षीही म्हटले आहे. घुबडाला भूत आणि भविष्य दोन्हीचे ज्ञान आधीपासूनच आहे असे मानतात. ग्रीक पुराणकथेनुसार घुबड हा अथीना, ज्ञानाची देवता यांच्याशी संबंधित आहेत तर अमेरिकन दंत कथांमध्ये बहुतेकदा शक्तिशाली आध्यात्मिक प्राणी म्हणून घुबडांचे उल्लेख आढळतात, परंतु बरेच लोक घुबडला भीत असल्यामुळे या भीतीपोटीच त्याला अशुभ मानले जाते.

    या पक्ष्यांचा अधिवास स्मशानात सर्वाधिक असतो. कारण ढोली असलेली, स्थानिक प्रजातींची मोठी झाडं तेथे असतात. त्यांचे डोळे लाल गडद असतात म्हणून लोक भितात. तसेच त्यांच्याबद्दल अंधश्रद्धा पसरवतात. घुबडाला मारण्याचे प्रकार होतात. घुबड हे अशुभाचे प्रतीक आहे, ही अंधश्रद्धा थांबवली पाहिजे.

    घुबडांच्या काही उल्लेखनीय प्रजाती

    • ग्रेट हॉर्न्ड घुबड: अमेरिकेत आढळणारा एक मोठा, शक्तिशाली घुबड.
    • कोठार घुबड: जगभरात व्यापकपणे पसरलेला, हृदयाकार चेहऱ्यासाठी ओळखला जातो.
    • स्नोवी घुबड: आर्क्टिक टुंड्रातील एक प्रभावशाली पांढरा घुबड.
    • बरोइंग घुबड: एक लहान, लांब पायाचा घुबड जो भूमिगत बिळात राहतो.
    • स्पेक्टेकल्ड घुबड: मध्य आणि दक्षिण अमेरिकन रेनफॉरेस्टमधील एक वैशिष्ट्यपूर्ण घुबड.

    घुबड या पक्षाची वैशिष्ट्ये

    • आम्ही निशाचर असल्यामुळे सगळं जग झोपलेलं असताना आम्ही जागे असतो आणि शांतपणे शिकार करतो. आमच्या पंखांचा उडतानाही आवाज होत नाही!
    • आमचे डोळे समोर आणि ट्यूबसारखे असतात, त्यामुळे दूरवर पाहू शकतो, पण जवळचं थोडंसं अस्पष्ट दिसतं. आम्ही डोळे हलवू शकत नाही, त्यामुळे मान तब्बल २७० अंश फिरवावी लागते.
    • आमच्याकडे तीन प्रकारच्या पापण्या असतात – झोपण्यासाठी, डोळे स्वच्छ ठेवण्यासाठी आणि झाकण्यासाठी. त्यामुळे डोळे कधीच पूर्णपणे बंद होत नाहीत, आणि आम्ही रात्री अंधारातही स्पष्ट पाहू शकतो.
    • आमची ऐकण्याची क्षमता खूपच तीव्र असते. कान वेगवेगळ्या उंचीवर असल्यामुळे अगदी हलकासा आवाजही आम्हाला सहज ऐकू येतो.
    • आम्ही शेतकऱ्यांचे खरे मित्र आहोत. उंदीर, साप, विंचू आणि लहानमोठ्या कीटकांची शिकार करून पिकांचे रक्षण करतो. बार्न आऊल वर्षभरात तब्बल १००० उंदीर खातो!
    • आमचा चेहरा चपटा, चोच लहान पण मजबूत असते. आमची मादी आकाराने मोठी, अधिक आक्रमक आणि आकर्षक रंगाची असते. तिचा आवाज नरापेक्षा मोठा असून एक मैल दूर ऐकू येतो.
    • जगभर गव्हाणी घुबड सर्वत्र आढळतो. भारतात गव्हाणी आणि पिंगळा घुबड प्रसिद्ध आहेत. पिंगळा घुबड लहान असून मानवी वस्तीजवळ राहतं. मादी एका वेळेस ४ ते ७ पांढऱ्या अंडी देते.
    • पिंगळा घुबड जुन्या पडक्या इमारती किंवा झाडांच्या ढोलीत घरटे बांधतो, जे अनेक वर्ष वापरतो आणि दिवसा सावलीत विश्रांती घेतो.

    घुबडांचे संवर्धन

    बालमित्रांनो, माझं म्हणजेच आम्हा घुबडांचं आयुष्य सध्या थोडं कठीण झालंय. मानवी कृतींमुळे आम्ही अनेक संकटांना सामोरं जात आहोत.

    आम्हाला कुठल्या संकटांचा सामना करावा लागतो?

    • माणसं झाडं तोडतात आणि मोठमोठी शहरं उभारतात, त्यामुळे आमचं घरच उरलं नाही!
    • हवामान बदलामुळे आम्हाला घरटे बांधायला जागा मिळणं कठीण झालंय, आणि शिकारही कमी झाली आहे.
    • शेतात वापरण्यात येणाऱ्या कीटकनाशकांमुळे आमची लोकसंख्या घटते आहे.
    • काही वेळा आम्ही उडताना गाड्या किंवा उंच इमारतींशी धडकतो, आणि आमचं मोठं नुकसान होतं.

    आम्हाला वाचवण्यासाठी काय करता येईल?

    • आमच्या राहण्याच्या जागांचा (जंगलांचा) बचाव करा आणि झाडं लावा.
    • आमच्यासाठी खास घरटे बॉक्स तयार करा, म्हणजे आम्ही तिथे सुरक्षित राहू शकू.
    • आमच्याविषयी अधिक संशोधन करा आणि आम्हाला मदतीची गरज आहे हे सर्वांपर्यंत पोहोचवा.
    • आम्हाला अशुभ मानण्याऐवजी, आमच्या उपयुक्ततेची माहिती इतरांना सांगा!

    घुबडांबद्दल मनोरंजक तथ्ये

    • आम्ही आमचे डोळे हलवत नाही, त्यामुळे आमचं डोकं पूर्ण फिरवतो!
    • आमच्या घोळक्याला “संसद” म्हणतात, हो खरंच!
    • ग्रेट ग्रे घुबड दोन फूट बर्फाखालूनही सावज हलताना ऐकू शकतो.
    • सर्वात लहान एल्फ घुबड तर चक्क चिमणीएवढं लहान असतं!
    • आम्ही जन्मानंतर फक्त ७ आठवड्यांनी उडायला शिकतो!
    • आमच्या नखांमध्ये एवढी ताकद असते की आम्ही १३५ किलो पर्यंत दाब लावू शकतो!
    • अमेरिकेत आम्हाला घरात पाळणं गुन्हा मानला जातो.
    • आम्ही निळा रंग ओळखू शकतो आणि माणसांप्रमाणेच 3D मध्ये वस्तू पाहतो!

    तर बालमित्रांनो, अंधाऱ्या रात्री जर माझी भेट झाली तर अजिबात घाबरू नका. लक्षात ठेवा, मी आहे तुमचा मित्र – “रात्रीचा सम्राट”! मी आहे घुबड – एक अनोखा आणि अद्वितीय पक्षी!

    तुम्हाला अशा गमतीशीर, विज्ञानावर आधारित निसर्गकथा आवडतात का? मग, आमच्याबाल विभागात अधिक कथा शोधा.

    Share this:

    • Post
    • Click to share on Reddit (Opens in new window)Reddit
    • Click to share on Telegram (Opens in new window)Telegram
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)WhatsApp

    Related

    Tags: Birds Indian Owl Nocturnal Owl अंधश्रद्धा घुबडांचे संवर्धन निशाचर पक्षी रात्रीचा सम्राट लक्ष्मी देवीचे वाहन
    author

    प्राची राजूरकर

    प्राची पर्यावरण शास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीधर असून त्यात संशोधन देखिल करीत आहे. याचबरोबर ती शिक्षणशास्त्रात पदवीधर असून कायद्याची देखील पदवीधर आहे. थोडक्यात सांगायचेच तर ती एक संशोधक, शिक्षण व कायदेतज्ञ आहे, आणि मुख्यत्वे ती वनीकरण क्षेत्रात निपुण असून एका जवाबदार पदावर कार्य करीत आहे. तिला विविध सरकारी योजनाबद्दलचे माहिती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवायला आवडते जे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी तसेच मोठ्या सामाजिक परीवर्तनासाठी फायदेशीर ठरेल.

    र्‍होडोडेंड्रॉन (Rhododendron)
    Previous

    मी आहे संपत्ती, समृद्धी आणि अढळ विश्वासाचे प्रतीक – मी आहे र्‍होडोडेंड्रॉन!

    Similar Posts

    बकानीचे झाड_Ailanthus excelsa
    किड्स कॉर्नर

    स्वर्गाचे झाड: बकानीचे झाडाचे अद्भुत रहस्य

    author
    By प्राची राजूरकर
    March 31, 2025March 31, 2025
    जागतिक वसुंधरा दिन_Earth Day
    किड्स कॉर्नर

    जागतिक वसुंधरा दिन: पृथ्वी रक्षणाची जबाबदारी आपलीच!

    author
    By प्राची राजूरकर
    March 31, 2025March 31, 2025

    Leave a ReplyCancel reply

    Subscribe via email!

    Subscribe to agmarathi newsletter

    Recent Posts

    • रात्रीचा सम्राट: घुबडाची अद्भुत कहाणी
    • मी आहे संपत्ती, समृद्धी आणि अढळ विश्वासाचे प्रतीक – मी आहे र्‍होडोडेंड्रॉन!
    • झिरो एनर्जी कूल चेंबर – फळे व भाजीपाला ताजे ठेवण्याचा कमी खर्चाचा उपाय
    • मी आहे बेस्ट आर्किटेक्ट! – सुगरण पक्ष्याचं अफलातून घरटे
    • वन्यप्राणी गणना बुद्ध पौर्णिमेलाच का करतात?
    • संत्रा बागेसाठी रोगमुक्त रोपे कोठे खरेदी करावी
    • कावळा आणि मुंग्यांचं नैसर्गिक हॉस्पिटल!
    • मेंढपाळाचा मुलगा ते UPSC अधिकारी : बिरदेव डोणे यांची जिद्दीची कहाणी
    • मातीचे गुणधर्म: शेतीसाठी माती किती उपयुक्त आहे हे कशावर ठरते?
    • देशी कोंबडी की देशी-टाईप? खरी ओळख, अंड्याची व मांसाची गुणवत्ता आणि बाजारातील फसवणूक उघड

    आम्हाला फॉलो करा

    • facebook
    • twitter
    • instagram
    • youtube
    Test

    प्रधानमंत्री सौरघऱ – मोफत वीज योजना: संपूर्ण माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया

    भारत सरकारने हरित उर्जेचा प्रचार आणि वीज बचतीसाठी १३ फेब्रुवारी...
    VIEW MORE
    Test

    ॲग्रीस्टॅक: शेतकऱ्यांच्या डिजिटल ओळख, मुख्य आव्हाने, आणि सहभागी होण्याची प्रक्रिया

    ॲग्री स्टॅक (Agri Stack) एक डिजिटल पायाभूत सुविधा आहे जी...
    VIEW MORE
    Test

    पीएम-कुसुम योजना: कॉम्पोनंट-ए – संपूर्ण माहिती

    पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान (PM-KUSUM / पीएम-कुसुम...
    VIEW MORE
    • आमच्या बद्दल (About us)
    • गोपनीयता धोरण (Privacy Policy)
    • आमच्याशी संपर्क साधा (Contact us)
    A theme by Gradient Themes ©