Skip to content
  • Wed. Jun 25th, 2025
    • आमच्या बद्दल (About us)
    • गोपनीयता धोरण (Privacy Policy)
    • आमच्याशी संपर्क साधा (Contact us)
    agmarathi logo

    agmarathi.in

    शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनाविषयी अद्ययावत माहिती आणि बातम्या

    Home
    • मुख्य पृष्ठ
    • कृषि
    • पर्यावरण
    • ग्रामीण विकास
    • शाश्वत जीवन
    • अन्न आणि पोषण
      • पाककृती
    • सरकारी योजना
    • नोकऱ्या
    '
    agmarathi logo

    agmarathi.in

    शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनाविषयी अद्ययावत माहिती आणि बातम्या

    • मुख्य पृष्ठ
    • कृषि
    • पर्यावरण
    • ग्रामीण विकास
    • शाश्वत जीवन
    • अन्न आणि पोषण
      • पाककृती
    • सरकारी योजना
    • नोकऱ्या
    HomeFood and NutritionRecipesकरटोली ची भाजी – आरोग्याचा खजिना
    करटोली ची भाजी_ Spiny gourd curry
    करटोली, Image Credit: https://en.wikipedia.org/wiki/File:Erumapaval.JPG
    Recipes

    करटोली ची भाजी – आरोग्याचा खजिना

    author
    By प्राची राजूरकर
    August 13, 2024August 13, 2024
    0 minutes, 15 seconds Read

    पावसाळा म्हणजे रानभाज्यांचा ऋतू. सगळीकडे रानभाजी महोत्सव सुरु होतात. याच पावसाळ्यात हमखास उपलब्ध होणारी एक अत्यंत पौष्टिक अशी रानभाजी म्हणजेच करटोली. करटोली या वनस्पतीला ‘कारटोली’, ‘काटवल’, ‘कंटोळा’, ‘कंटोली’, ‘रानकारली’, ‘कर्कोटकी’, ‘करटुली़’ अशीही स्थानिक नावे आहेत. या रानभाजीचे शास्त्रीय नाव मोमॉर्डिका डायोइका (Momordica dioica) असे असून इंग्रजी भाषेत करटोलीला ‘वाइल्ड करेला फ्रूट’ (Wild Karela Fruit) असे म्हणतात. चला जाणून घेऊया या रेसिपीचा वापर करून स्वादिष्ट पण पौष्टिक करटोली ची भाजी कशी बनवायची.

    ही रान भाजी वर वर दिसायला जरी काटेरी दिसत असली तरी म्हणतात ना काय भुललासी वरलिया रंगा ! त्याचप्रमणे या भाजीच्या वर वरच्या रंग व स्वरूप न बघता यातील औषधी गुणधर्म घरातील लहानांपासून मोठ्या मंडळी करिता सुद्धा लाभदायक आहे. पावसाळ्यातील विकारांवर करटोलीची भाजी हितावह आहे. त्वचारोग होऊ नयेत म्हणून ही भाजी अवश्‍य खावी.

    तर आज आपण बनवूयात चना डाळ घालून करटोली ची भाजी. सकाळच्या किंवा रात्रीच्या जेवणात हि भाजी पोळी किंवा भाताबरोबर सहज खाता येईल. चला तर मग हि भाजी बनवायला काय काय साहित्य लागेल ते बघूया!

    बनविण्यासाठी लागणारे साहित्य- करटोली ची भाजी

    1. हिरवी कोवळी करटुली(wild karela)-पाव किलो
    2. भिजलेली चना डाळ(yellow lentil split) -अर्धा वाटी
    3. ओले खोबरे(coconut )-अर्धी वाटी,
    4. बारीक चिरलेला कांदा(onion)- एक वाटी,
    5. हिंग(asafoetida)-चिमुटभर
    6. मोहरी(mustard seeds)-अर्धा छोटा चमचा
    7. मीठ(salt)-१ चमचा
    8. जिरे(cumin seeds)-अर्धा छोटा चमचा
    9. हळद(turmeric powder) – अर्धा छोटा चमचा
    10. चिरलेल्या हिरव्या मिरच्या(green chilly)-दोन
    11. लाल तिखट(red chilli powder)-१ चमचा
    12. साखर(sugar)-चिमुटभर
    13. तेल(edible oil)-३ चमचे

    बनविण्याची विधी- करटोली ची भाजी

    • करटुल्यांचे अर्धे भाग करून त्यातील बिया व गर काढून टाकावा. नंतर बटाट्याचे काप केल्याप्रमाणे करटुली चिरून घ्यावीत.
    • शेगडी वर कढई चढवून कढई गरम झाल्यावर त्यात ३ चमचे तेल सोडावे
    • हिंगाची जिरे व मोहरी ची फोडणी करून त् त्यात चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकाव्यात.
    • नंतर त्यात कांदा, मीठ, थोडेसे लाल तिखट व हळद घालून चांगले परतावे.
    • भिजवलेली डाळ व करटुल्याच्या फोडी घालून चांगल्या परताव्यात.
    • झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्यावी.
    • नंतर झाकण काढून मंद गॅसवर पाणी न घालता ३ ते ४ मिनिटे भाजी परतावी.
    • नंतर वरून ओले खोबरे व थोडी साखर घालावी.
    • ही भाजी गोडा मसाला घालूनही रुचकर व चांगली लागते.
    • गरमागरम करटोलीची भाजी तयार आहे.
    करटोली ची भाजी
    करटोली ची भाजी

    मोमॉर्डिका डायोइका (करटोली) ही कुकुर्बिटेसी कुलातील वनस्पती आहे, जी आशियातील एक मूलस्थानिक वेल आहे. भारत आणि बांगलादेशात ती मोठ्या प्रमाणावर आढळते. कंटोळा ही वनस्पती विविध रोगांच्या प्रतिबंधक आणि उपचारात्मक गुणधर्मांसाठी ओळखली जाते. ही वनस्पती पोषणमूल्यांनी समृद्ध असून, हजारो वर्षांपासून भाजीपाला म्हणून वापरली जात आहे. कंटोळा वनस्पतीमध्ये अल्कलॉइड्स, ग्लायकोसाइड्स, स्टेरॉइड्स, ट्रायटरपेनॉइड्स, फ्लेवोनॉइड्स, उर्सोलिक असिड, जीवनसत्त्वे, खनिजे आणि भरपूर प्रमाणात तंतू असतात, जे दमा, सूज, ताप, मानसिक आणि पाचनासंबंधी विकार यांसारख्या आजारांवर गुणकारी असतात. त्वचेच्या आरोग्याची देखभाल करण्यासाठीही ही वनस्पती उपयोगी आहे.

    करटोली हे डोकेदुखीवरील उत्तम औषध आहे. करटोलीचे फळ कडू, उष्ण, संसर्गरक्षक आहे. वात, कुष्ठरोग, मूत्रस्राव, प्रमेह व मधुमेहात करटोलीची फळे उपयुक्त आहेत. अति लाळ सुटणे, मळमळ, हृदयाचे त्रास यातही करटोली गुणकारी आहे. रक्तरोग, डोळ्यांचे रोग, या विकारांत करटोलीचा वापर करतात. कच्चे फळ भाजी म्हणून वापरतात. हे तापातून उठलेल्या रोग्यास पोषक म्हणून देतात.

    Share this:

    • Post
    • Click to share on Reddit (Opens in new window)Reddit
    • Click to share on Telegram (Opens in new window)Telegram
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)WhatsApp

    Related

    Tags: Momordica dioica Wild Karela Fruit करटुल्याची भाजी करटोली काटवल काटवल ची भाजी पाककृती मराठी रेसिपीज रानभाज्या
    author

    प्राची राजूरकर

    प्राची पर्यावरण शास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीधर असून त्यात संशोधन देखिल करीत आहे. याचबरोबर ती शिक्षणशास्त्रात पदवीधर असून कायद्याची देखील पदवीधर आहे. थोडक्यात सांगायचेच तर ती एक संशोधक, शिक्षण व कायदेतज्ञ आहे, आणि मुख्यत्वे ती वनीकरण क्षेत्रात निपुण असून एका जवाबदार पदावर कार्य करीत आहे. तिला विविध सरकारी योजनाबद्दलचे माहिती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवायला आवडते जे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी तसेच मोठ्या सामाजिक परीवर्तनासाठी फायदेशीर ठरेल.

    स्वीट कॉर्न पकोडा_Sweet corn pakora
    Previous

    स्वीट कॉर्न चे स्वादिष्ट आणि पौष्टिक असे पकोडे

    ओल्या हळदीची चटणी_Turmeric Root Chutney
    Next

    ओल्या हळदीची चटणी – चटपटीत आणिआरोग्यदायी

    Similar Posts

    तिखट शेवया - Spicy Indian noodles
    Recipes

    तिखट शेवया – आजीचे स्वादिष्ट नूडल्स

    author
    By प्राची राजूरकर
    July 26, 2024July 26, 2024
    मिश्र कडधान्यांची उसळ_Mix Pulses Usal
    Recipes

    मिश्र कडधान्यांची उसळ – शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांची मेजवानी

    author
    By प्राची राजूरकर
    August 5, 2024August 5, 2024

    Leave a ReplyCancel reply

    Subscribe via email!

    Subscribe to agmarathi newsletter

    Recent Posts

    • रात्रीचा सम्राट: घुबडाची अद्भुत कहाणी
    • मी आहे संपत्ती, समृद्धी आणि अढळ विश्वासाचे प्रतीक – मी आहे र्‍होडोडेंड्रॉन!
    • झिरो एनर्जी कूल चेंबर – फळे व भाजीपाला ताजे ठेवण्याचा कमी खर्चाचा उपाय
    • मी आहे बेस्ट आर्किटेक्ट! – सुगरण पक्ष्याचं अफलातून घरटे
    • वन्यप्राणी गणना बुद्ध पौर्णिमेलाच का करतात?
    • संत्रा बागेसाठी रोगमुक्त रोपे कोठे खरेदी करावी
    • कावळा आणि मुंग्यांचं नैसर्गिक हॉस्पिटल!
    • मेंढपाळाचा मुलगा ते UPSC अधिकारी : बिरदेव डोणे यांची जिद्दीची कहाणी
    • मातीचे गुणधर्म: शेतीसाठी माती किती उपयुक्त आहे हे कशावर ठरते?
    • देशी कोंबडी की देशी-टाईप? खरी ओळख, अंड्याची व मांसाची गुणवत्ता आणि बाजारातील फसवणूक उघड

    आम्हाला फॉलो करा

    • facebook
    • twitter
    • instagram
    • youtube
    Test

    प्रधानमंत्री सौरघऱ – मोफत वीज योजना: संपूर्ण माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया

    भारत सरकारने हरित उर्जेचा प्रचार आणि वीज बचतीसाठी १३ फेब्रुवारी...
    VIEW MORE
    Test

    ॲग्रीस्टॅक: शेतकऱ्यांच्या डिजिटल ओळख, मुख्य आव्हाने, आणि सहभागी होण्याची प्रक्रिया

    ॲग्री स्टॅक (Agri Stack) एक डिजिटल पायाभूत सुविधा आहे जी...
    VIEW MORE
    Test

    पीएम-कुसुम योजना: कॉम्पोनंट-ए – संपूर्ण माहिती

    पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान (PM-KUSUM / पीएम-कुसुम...
    VIEW MORE
    • आमच्या बद्दल (About us)
    • गोपनीयता धोरण (Privacy Policy)
    • आमच्याशी संपर्क साधा (Contact us)
    A theme by Gradient Themes ©