आता पाऊस पडू लागलाय, पावसाळा म्हणजे रानभाज्यांचा ऋतू! अनेक प्रकारच्या रानभाज्या आपल्याला पावसाळ्यात बघायला मिळतात, त्यापैकीच एक आणि प्रथिनांचा उत्तम स्त्रोत असलेली एक रानभाजी म्हणजेच भूछत्र किवा मशरूम (Mushroom)! अनेक प्रकारचे मशरूम बाजारात उपलब्ध आहेत, त्यापैकीच एक म्हणजे बटण मशरूम (Button Mushroom)! चला जाणून घेऊया या रेसिपीचा वापर करून स्वादिष्ट पण पौष्टिक मशरूम ची सुक्की भाजी […]
गहू हे धन्य आज पृथ्वीवरील अन्नाच्या महत्वाच्या स्त्रोतापैकी एक आहे. गव्हात 75 ते 80% कर्बोदके, 9 ते 18% प्रथिने, फायबर, अनेक जीवनसत्त्वे (विशेषत: ब जीवनसत्त्वे), कॅल्शियम, लोह आणि अनेक मॅक्रो- आणि सूक्ष्म पोषक घटक असतात. गहू हा मधुर, थंड, पचावयास जड, कफकारक, बलकारक, व जुलाबावर गुणकारी आहे. गहू म्हंटल आपल्या डोळ्यासमोर चपाती, पराठा येतो. पण […]
आपण खाण्यापिण्याच्या अनेक नियमांचे पालन करतो. आपल्या पूर्वजांनी सुद्धा आहाराचे अनेक नियम ठरवून दिले आहेत, त्याचाच एक भाग म्हणून आपण व्रतवैकल्य करताना सात्विक आहारावर भर देतो. आता सनासुदीचे व्रतवैकल्याचे दिवस आहेत आणि अशा दिवसात बरेच लोक उपवास (Fasting) करतात तर अशाच उपवासाकरिता आज आपण कच्च्या केळीची भाजी (Unripe Banana Curry) बनवणार आहोत. कच्च्या केळीची भाजी […]
गवार शेंगाची शेंगदाणे वापरून करता येणारी अगदी चवदार आणि पौष्टिक अशी भाजीची रेसिपी आज आपण शिकणार आहोत. या भाजीतले महत्वाचे दोन घटक जे मी आधीच सांगितलेत ते म्हणजे गवार शेंगा (Cyamopsis tetragonoloba /Guar bean / Cluster beans) आणि शेंगदाणे (Arachis hypogaea / Groundnuts)! आता गवार बद्दल सांगायचं झाल तर गवार ही शेंगवर्गीय भाजी असून कोवळ्या […]
मसूर डाळ (Red Lentils/ Masoor Dal) ज्याला लाल मसूर म्हणूनही ओळखले जाते, भारतीय पाककृतीमध्ये त्याच्या अफाट पौष्टिक मूल्यांमुळे आणि उपचारात्मक फायद्यांमुळे खूप लोकप्रिय आहे. एक वाटी मसूर डाळ आपल्या दैनंदिन महत्त्वाच्या पोषक तत्वांची गरज भागवण्यासाठी पुरेशी आहे. झटपट शिजणारी आणि गोडसर चवीची मसूर डाळ ही प्रथिनांनी (Protein) भरपूर आणि लोह (Iron), तांबे (Copper), मॅग्नेशियम (Magnesium) […]
आज आपण बनविणार आहोत मक्याचे पीठ आणि पालक एकत्रित करून बनविले जाणारे पौष्टिक असे धपाटे. हा पदार्थ लहान मुलांना दुपारच्या सुट्टीत खाण्यासाठी डब्यात द्यायला किवा नाष्ट्यासाठी एकदम उत्तम आणि करायला अगदी सोप्पा! मका आणि पालक, दोन्हीही आपल्या आहारात महत्वाचे स्थान मिळवणाऱ्या पोषक तत्त्वांनी परिपूर्ण घटक आहेत. मक्याच्या गोडसर चवीमुळे आणि पालकाच्या पोषणमूल्यामुळे बनवलेले धपाटे हे […]
अनेक जणांना गव्हाच्या पिठाची किंवा ग्लूटेन ची ऍलर्जी (Gluten Allergy) असते, म्हणून त्यांना गहू आणि गव्हाच्या उत्पादनांना पर्याय शोधणे आवश्यक आहे. बाजरी (Pearl millet) हा यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. भारतात, बाजरी ही बाजरी खिचडी, बाजरीची रोटी, बाजरी लापशी, उकडपेंडी आणि इतर सारख्या अनेक पारंपारिक स्वादिष्ट पाककृतींचा मुख्य घटक आहे. चला तर मग, जाणून घेऊया बाजरीच्या […]
सणासुदीचा काळ असो किंवा घरगुती कार्यक्रम, लाडवांचा साज कधीही कमी पडत नाही. महाराष्ट्रातील पारंपरिक मिठाईंपैकी नाचणी आणि फूटाण्याचे लाडू खास आहेत. हे लाडू स्वादिष्ट तर असतातच, पण त्यात पौष्टिकतेचा खजिनाही भरलेला असतो. नाचणी हे कॅल्शियम, आयर्न आणि फायबरने समृद्ध धान्य आहे, तर फूटाणे प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. विशेष म्हणजे, या लाडवांची रेसिपी अतिशय सोपी आणि […]
आहारातील निवडी त्यांना आकार देणाऱ्या संस्कृतीप्रमाणेच वैविध्यपूर्ण असतात. व्हेगन आणि व्हेजिटेरियन डाएट / आहार (Vegan and Vegetarian diets) हे वनस्पती-आधारित शाकाहारी आहार प्रकार आहेत. या आहारातील जीवनशैलींना त्यांचे संभाव्य आरोग्य फायदे, नैतिक विचार आणि पर्यावरणीय टिकाव यासाठी लोकप्रियता मिळाली आहे. चला मूळ, मुख्य फरक, सावधगिरी आणि व्हेगन आणि व्हेजिटेरियन आहारासंबंधी वारंवार विचारले जाणारे प्रश्न जाणून […]
आजच्या वेगवान जगात, जेथे काळजीपेक्षा सोयींना अधिक प्राधान्य दिले जाते, तेथे अन्न उत्पादनाची लेबले (Packaged Food Labels) वाचण्याचे महत्त्व दुर्लक्षित करणे सोपे आहे. तथापि, या पॅकेज्ड फूड लेबल्स मध्ये भरपूर माहिती आहे जी आपल्या आरोग्यावर लक्षणीय परिणाम करू शकते. पौष्टिक सामग्रीपासून ते घटक सूची आणि ऍलर्जीन माहितीपर्यंत, आपण वापरत असलेल्या पदार्थांमध्ये काय आहे हे समजून […]