Skip to content
  • Wed. Jun 25th, 2025
    • आमच्या बद्दल (About us)
    • गोपनीयता धोरण (Privacy Policy)
    • आमच्याशी संपर्क साधा (Contact us)
    agmarathi logo

    agmarathi.in

    शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनाविषयी अद्ययावत माहिती आणि बातम्या

    Home
    • मुख्य पृष्ठ
    • कृषि
    • पर्यावरण
    • ग्रामीण विकास
    • शाश्वत जीवन
    • अन्न आणि पोषण
      • पाककृती
    • सरकारी योजना
    • नोकऱ्या
    '
    agmarathi logo

    agmarathi.in

    शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनाविषयी अद्ययावत माहिती आणि बातम्या

    • मुख्य पृष्ठ
    • कृषि
    • पर्यावरण
    • ग्रामीण विकास
    • शाश्वत जीवन
    • अन्न आणि पोषण
      • पाककृती
    • सरकारी योजना
    • नोकऱ्या
    HomeFood and NutritionRecipesउपवास स्पेशल- साबुदाणा वडा
    साबुदाणा वडा_Sabudana Vada
    साबुदाणा वडा
    Recipes

    उपवास स्पेशल- साबुदाणा वडा

    author
    By प्राची राजूरकर
    July 26, 2024July 26, 2024
    0 minutes, 5 seconds Read

    आषाढ श्रावण आला कि सुरु होतात उपवास. आणि उपवासात साबुदाणा वापरून केलेले पदार्थ न खाणारा व्यक्ती शोधून सापडणार नाही, स्वयंपाकघरातील पदार्थांमधला पांढराशुभ्र साबुदाणा अनेकांना आवडतो. साबुदाण्यापासून वेगवेगळे पदार्थ केले जातात. चला तर मग बनवूया साबुदाणा वडा.

    उपवासाच्या पदार्थांत विशेषकरून साबुदाण्याचा वापर केला जातो. हा साबुदाणा आरोग्याच्या दृष्टीनेही ते तितकाच फायदेशीर आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरात विविध प्रकारचे पदार्थ तयार करू शकता. विशेषतः त्याची खिचडी आणि खीर तयार केली जाते. अनेकांना उपवासाच्या वेळी याचे सेवन करायला आवडते. तर असाच एक उपवासाचा पदार्थ आपण आज बनवणार आहोत तो म्हणजे साबुदाणाचे वडे.

    आता हे वडे जर दोन व्यक्तींसाठी तयार करावयाचे झालेत तर काय काय साहित्य लागेल ते बघूया!

    बनविण्यासाठी लागणारे साहित्य- साबुदाणा वडा

    1. १ वाटी भिजवलेला साबुदाणा (SAGO PEARLS) ( साबुदाणा रात्रीच पाण्यात टाकून आणि त्यातील पाणी निथळून भिजत घालावा)
    2. ८-१० हिरवी मिरची( GREEN CHILLY )
    3. २- उकळलेले बटाटे ( BOILED POTATO)
    4. १ वाटी शेंगदाणा कुट( PEANUTS)
    5. १ लिंबू ( LEMON )
    6. १ चमचा मीठ (SALT)
    7. तेल तळण्यासाठी (OIL)

    बनविण्याची विधी – साबुदाणा वडा

    • सर्वप्रथम भिजलेला साबुदाणा एका पसरट भांड्यात काढावा.
    • आता त्यात २ उकळलेले बटाटे हाताने कुस्करून घालावे.
    • त्यात ८-१० वाटलेल्या हिरव्या मिरच्या घालाव्या (आपण इथे लाल तिखट वापरात नसल्याने हिरवी मिरची चे प्रमाण जास्त घेतले आहे आपापल्या चवीप्रमाणे मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता)
    • आता याच मिश्रणात १ वाटी शेंगदाणा कुट,१ चमचा मीठ व १ लीम्बुचा रस घालावा.
    • सर्व मिश्रण नीट एकजीव करावे.
    • आता हातावर छोटासा गोळा घेऊन त्याला वड्याचा आकार द्यावा.
    • वड्याला मधोमध चमच्याने छिद्र करावे.
    • शेगडी वर कढई चढवून कढईत तेल गरम करावे.
    • आता गरम तेलात सर्व वडे दोन्ही बाजूनी नीट टाळून घ्यावे.

    गरमागरम साबुदाणा वडे तयार आहेत. दह्याबरोबर खायला अगदी चवदार लागतील.

    साबुदाणा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे वजन वाढवण्यासाठी आणि मेंदूच्या विकासासाठी खूप चांगले मानले जाते. साबुदाण्याचे जर तुम्ही रोज सेवन केले तर तुम्ही अनेक समस्यांवर मात करू शकता. रोज साबुदाणा खाल्ल्याने हाडे मजबूत होण्याबरोबरच रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. साबुदाणा खाल्ल्याने शरीराचे वजन वाढते. यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज चांगल्या प्रमाणात असतात, जे वजन वाढवण्यास मदत करतात. जर तुमचे शरीर खूप दुबळे असेल तर तुमच्या आहारात साबुदाणा जरूर घ्या. यामुळे तुमचे शरीर फिट राहील.

    साबुदाणा खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. त्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते जे हाडांची वाढ आणि मजबूती वाढवते. याशिवाय साबुदाणा हा देखील लोहाचा चांगला स्रोत आहे. हे ऑस्टिओपोरोसिससारख्या हाडांची वाढ देखील कमी करू शकते. साबुदाणा खाल्ल्याने शारीरिक विकास तर होतोच, पण त्यामुळे मेंदूही सुधारतो. यामध्ये असलेले फोलेट मेंदूची दुरुस्ती करू शकते. यासोबतच मेंदूचे विकार दूर करण्यातही हे गुणकारी आहे.

    आरोग्य आणि पोषण सूचना:या वेबसाइटवरील आरोग्य आणि पोषण माहिती सामान्य माहिती देण्यासाठी आहे. प्रत्येकाची पोषण गरज वेगवेगळी असू शकते. वैयक्तिक आहार सल्ल्यासाठी आपल्या आरोग्यतज्ञाचा सल्ला घ्या. आम्ही दिलेल्या माहितीची अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ही माहिती वैद्यकीय सल्ला नाही.

    Share this:

    • Post
    • Click to share on Reddit (Opens in new window)Reddit
    • Click to share on Telegram (Opens in new window)Telegram
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)WhatsApp

    Related

    Tags: Recipes Sabudana Vada उपवास उपवास स्पेशल उपवासाचा पदार्थ पाककृती मराठी रेसिपीज साबुदाणा वडा
    author

    प्राची राजूरकर

    प्राची पर्यावरण शास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीधर असून त्यात संशोधन देखिल करीत आहे. याचबरोबर ती शिक्षणशास्त्रात पदवीधर असून कायद्याची देखील पदवीधर आहे. थोडक्यात सांगायचेच तर ती एक संशोधक, शिक्षण व कायदेतज्ञ आहे, आणि मुख्यत्वे ती वनीकरण क्षेत्रात निपुण असून एका जवाबदार पदावर कार्य करीत आहे. तिला विविध सरकारी योजनाबद्दलचे माहिती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवायला आवडते जे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी तसेच मोठ्या सामाजिक परीवर्तनासाठी फायदेशीर ठरेल.

    तिखट शेवया - Spicy Indian noodles
    Previous

    तिखट शेवया – आजीचे स्वादिष्ट नूडल्स

    महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद -MCAER
    Next

    भारतीय कृषी संशोधन व शिक्षण – ICAR व MCAER बद्दल माहिती

    Similar Posts

    स्वीट कॉर्न पकोडा_Sweet corn pakora
    Recipes

    स्वीट कॉर्न चे स्वादिष्ट आणि पौष्टिक असे पकोडे

    author
    By प्राची राजूरकर
    August 13, 2024August 13, 2024
    गव्हाच्या पिठाचा केक_Wheat Flour Cake
    Recipes

    गव्हाच्या पिठाचा केक – छोट्यांसाठी मेजवानी आणि मोठ्यांसाठी स्वादाची पर्वणी

    author
    By प्राची राजूरकर
    July 18, 2024July 18, 2024

    Leave a ReplyCancel reply

    Subscribe via email!

    Subscribe to agmarathi newsletter

    Recent Posts

    • रात्रीचा सम्राट: घुबडाची अद्भुत कहाणी
    • मी आहे संपत्ती, समृद्धी आणि अढळ विश्वासाचे प्रतीक – मी आहे र्‍होडोडेंड्रॉन!
    • झिरो एनर्जी कूल चेंबर – फळे व भाजीपाला ताजे ठेवण्याचा कमी खर्चाचा उपाय
    • मी आहे बेस्ट आर्किटेक्ट! – सुगरण पक्ष्याचं अफलातून घरटे
    • वन्यप्राणी गणना बुद्ध पौर्णिमेलाच का करतात?
    • संत्रा बागेसाठी रोगमुक्त रोपे कोठे खरेदी करावी
    • कावळा आणि मुंग्यांचं नैसर्गिक हॉस्पिटल!
    • मेंढपाळाचा मुलगा ते UPSC अधिकारी : बिरदेव डोणे यांची जिद्दीची कहाणी
    • मातीचे गुणधर्म: शेतीसाठी माती किती उपयुक्त आहे हे कशावर ठरते?
    • देशी कोंबडी की देशी-टाईप? खरी ओळख, अंड्याची व मांसाची गुणवत्ता आणि बाजारातील फसवणूक उघड

    आम्हाला फॉलो करा

    • facebook
    • twitter
    • instagram
    • youtube
    Test

    प्रधानमंत्री सौरघऱ – मोफत वीज योजना: संपूर्ण माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया

    भारत सरकारने हरित उर्जेचा प्रचार आणि वीज बचतीसाठी १३ फेब्रुवारी...
    VIEW MORE
    Test

    ॲग्रीस्टॅक: शेतकऱ्यांच्या डिजिटल ओळख, मुख्य आव्हाने, आणि सहभागी होण्याची प्रक्रिया

    ॲग्री स्टॅक (Agri Stack) एक डिजिटल पायाभूत सुविधा आहे जी...
    VIEW MORE
    Test

    पीएम-कुसुम योजना: कॉम्पोनंट-ए – संपूर्ण माहिती

    पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान (PM-KUSUM / पीएम-कुसुम...
    VIEW MORE
    • आमच्या बद्दल (About us)
    • गोपनीयता धोरण (Privacy Policy)
    • आमच्याशी संपर्क साधा (Contact us)
    A theme by Gradient Themes ©