Skip to content
  • Sat. May 10th, 2025
    • आमच्या बद्दल (About us)
    • गोपनीयता धोरण (Privacy Policy)
    • आमच्याशी संपर्क साधा (Contact us)
    agmarathi logo

    agmarathi.in

    शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनाविषयी अद्ययावत माहिती आणि बातम्या

    Home
    • मुख्य पृष्ठ
    • कृषि
    • पर्यावरण
    • ग्रामीण विकास
    • शाश्वत जीवन
    • अन्न आणि पोषण
      • पाककृती
    • सरकारी योजना
    • नोकऱ्या
    '
    agmarathi logo

    agmarathi.in

    शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनाविषयी अद्ययावत माहिती आणि बातम्या

    • मुख्य पृष्ठ
    • कृषि
    • पर्यावरण
    • ग्रामीण विकास
    • शाश्वत जीवन
    • अन्न आणि पोषण
      • पाककृती
    • सरकारी योजना
    • नोकऱ्या
    HomeFood and NutritionRecipesमशरूम ची सुक्की भाजी- पावसाळ्यासाठी उत्तम रानभाजी
    मशरूम ची सुक्की भाजी
    मशरूम ची सुक्की भाजी
    Recipes

    मशरूम ची सुक्की भाजी- पावसाळ्यासाठी उत्तम रानभाजी

    author
    By प्राची राजूरकर
    July 20, 2024July 23, 2024
    0 minutes, 10 seconds Read

    आता पाऊस पडू लागलाय, पावसाळा म्हणजे रानभाज्यांचा ऋतू! अनेक प्रकारच्या रानभाज्या आपल्याला पावसाळ्यात बघायला मिळतात, त्यापैकीच एक आणि प्रथिनांचा उत्तम स्त्रोत असलेली एक रानभाजी म्हणजेच भूछत्र किवा मशरूम (Mushroom)! अनेक प्रकारचे मशरूम बाजारात उपलब्ध आहेत, त्यापैकीच एक म्हणजे बटण मशरूम (Button Mushroom)! चला जाणून घेऊया या रेसिपीचा वापर करून स्वादिष्ट पण पौष्टिक मशरूम ची सुक्की भाजी कशी बनवायची.

    मशरूम खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मशरूममध्ये अत्यंत कमी कॅलरी असतात, सोबतच त्याच्यात अनेक पोषणतत्व असतात. मशरुम करी, सलाड, सूप आणि भाजी बनवूनही खाता येतं. इतकंच नाही, तर मशरूम स्नॅक्स म्हणूनही खाता येतात. विशेष म्हणजे मशरूम अनेक आजारांवर एखाद्या औषधापेक्षा कमी नाहीये. तर मग बनवायची न आज या बटण मशरूम ची सुक्की भाजी!

    भाजी अगदी १०-१५ मिनिटात तयार होते कारण या मशरूम ला खूप जास्तवेळ शिजवायची गरज नाही कारण मुळातच ते अगदी लवचिक आणि मऊ असतात म्हणून पटकन शिजतात. बघुयात मग या भाजीला साहित्य काय लागेल ते.

    बनविण्यासाठी लागणारे साहित्य (२ व्यक्तीसाठी )- मशरूम ची सुक्की भाजी

    • १५-२० मशरूम (Button mushroom)
    • १ कांदा (Onion)
    • १ टमाटर(tomato)
    • १/२ छोटा चमचा जिरे (Cumin seeds)
    • १/२ छोटा चमचा मोहरी (Mustard) s
    • १ छोटा चमचा लाल तिखट (Red chili powder)
    • १/२ छोटा चमचा हळद (Turmeric powder)
    • २-३ लसून पाकळ्या (Garlic)
    • तेल गरजेनुसार (Cooking oil)
    • मीठ चवीनुसार
    • कोथिंबीर

    बनविण्याची विधी- मशरूम ची सुक्की भाजी

    • सर्वप्रथम मशरूम धुवून बारीक कापून घ्या,बाकी साहित्य जसे कि कांदा ,टोमाटो धुवून बारीक कापून घ्या
    • शेगडी वर कढई चढवून कढईकाढे गरम झाली कि त्यात तीन चमचे तेल ओता.
    • तेल गरम झाल्यावर त्यात जिरे मोहरी घालून चांगले तडतडू द्या.
    • त्यांनतर त्यात बारीक कापलेले कांदे, टोमाटो, लसून व मशरूम घालून नीट परता.
    • ५ मिनिटे वाफेवर आतील मिश्रण शिजू द्या.
    • त्यानंतर वरून १ छोटा चमचा लाल तिखट, १/२ छोटा चमचा हळद, चविनुसार मीठ घालून परत ५ मिनिटे भाजी शिजू द्या.
    • ५ मिनिटांनी शेगडी बंद करा

    गरमागरम मशरूम ची सुक्की भाजी तयार आहे. वरून कापलेली कोशिंबीर घालून सर्व्ह करा.

    मशरूम चांगले कोलेस्ट्रॉल किंवा एचडीएल (Good cholesterol / High-density lipoprotein (HDL)) सुधारू शकते आणि ट्रायग्लिसेराईड्स (Triglyceride) कमी करू शकते, ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. मशरूममध्ये भरपूर प्रमाणात सेलेनियम आढळते. हे नैसर्गिक सेलेनियम शरीराला आतून निरोगी ठेवते.

    मशरूमचे नियमित सेवन केल्याने तुमचा थकवा आणि नैराश्य कमी होईल ज्यामुळे तुम्हाला दर्जेदार जीवन मिळेल. शिवाय मशरूममध्ये फायबर असल्याने, त्यांच्या सेवनाने पोट बराच काळ भरल्यासारखे वाटते आणि भूकही लवकर लागत नाही. मशरूममध्ये ‘व्हिटामिन डी’ मुबलक प्रमाणात आढळते. दररोज मशरूम खाल्ल्याने शरीराला आवश्यक तितके ‘व्हिटामिन डी’ नैसर्गिकरित्या मिळू शकते. मशरूम ही एक खाण्यास चविष्ट आणि बनवण्यास अतिशय सोपी भाजी आहे. यातील पौष्टिकता टिकवण्यासाठी मशरूम कुठल्याही प्रकारे शिजवणे फायदेशीर ठरते.

    आरोग्य आणि पोषण सूचना: या वेबसाइटवरील आरोग्य आणि पोषण माहिती सामान्य माहिती देण्यासाठी आहे. प्रत्येकाची पोषण गरज वेगवेगळी असू शकते. वैयक्तिक आहार सल्ल्यासाठी आपल्या आरोग्यतज्ञाचा सल्ला घ्या. आम्ही दिलेल्या माहितीची अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ही माहिती वैद्यकीय सल्ला नाही.

    Share this:

    • Post
    • Click to share on Reddit (Opens in new window)Reddit
    • Click to share on Telegram (Opens in new window)Telegram
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)WhatsApp

    Related

    Tags: Button Mushroom Mushroom Recipes पाककृती बटण मशरूम भाजी मराठी रेसिपीज मशरूम रानभाज्या
    author

    प्राची राजूरकर

    प्राची पर्यावरण शास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीधर असून त्यात संशोधन देखिल करीत आहे. याचबरोबर ती शिक्षणशास्त्रात पदवीधर असून कायद्याची देखील पदवीधर आहे. थोडक्यात सांगायचेच तर ती एक संशोधक, शिक्षण व कायदेतज्ञ आहे, आणि मुख्यत्वे ती वनीकरण क्षेत्रात निपुण असून एका जवाबदार पदावर कार्य करीत आहे. तिला विविध सरकारी योजनाबद्दलचे माहिती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवायला आवडते जे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी तसेच मोठ्या सामाजिक परीवर्तनासाठी फायदेशीर ठरेल.

    Single-use plastic bottles
    Previous

    एकदाच वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक बाटल्या पुन्हा वापरू नयेत का?

    मिश्र भाज्यांचा रोल_Mix Vegetables Roll
    Next

    मिश्र भाज्यांचा रोल

    Similar Posts

    बीटरूट चा पराठा
    Recipes

    बीटरूट चा पराठा – जीवनसत्त्वे आणि खनिजांनी परिपूर्ण

    author
    By प्राची राजूरकर
    August 6, 2024August 6, 2024
    साबुदाणा वडा_Sabudana Vada
    Recipes

    उपवास स्पेशल- साबुदाणा वडा

    author
    By प्राची राजूरकर
    July 26, 2024July 26, 2024

    Leave a ReplyCancel reply

    Subscribe via email!

    Subscribe to agmarathi newsletter

    Recent Posts

    • रात्रीचा सम्राट: घुबडाची अद्भुत कहाणी
    • मी आहे संपत्ती, समृद्धी आणि अढळ विश्वासाचे प्रतीक – मी आहे र्‍होडोडेंड्रॉन!
    • झिरो एनर्जी कूल चेंबर – फळे व भाजीपाला ताजे ठेवण्याचा कमी खर्चाचा उपाय
    • मी आहे बेस्ट आर्किटेक्ट! – सुगरण पक्ष्याचं अफलातून घरटे
    • वन्यप्राणी गणना बुद्ध पौर्णिमेलाच का करतात?
    • संत्रा बागेसाठी रोगमुक्त रोपे कोठे खरेदी करावी
    • कावळा आणि मुंग्यांचं नैसर्गिक हॉस्पिटल!
    • मेंढपाळाचा मुलगा ते UPSC अधिकारी : बिरदेव डोणे यांची जिद्दीची कहाणी
    • मातीचे गुणधर्म: शेतीसाठी माती किती उपयुक्त आहे हे कशावर ठरते?
    • देशी कोंबडी की देशी-टाईप? खरी ओळख, अंड्याची व मांसाची गुणवत्ता आणि बाजारातील फसवणूक उघड

    आम्हाला फॉलो करा

    • facebook
    • twitter
    • instagram
    • youtube
    Test

    प्रधानमंत्री सौरघऱ – मोफत वीज योजना: संपूर्ण माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया

    भारत सरकारने हरित उर्जेचा प्रचार आणि वीज बचतीसाठी १३ फेब्रुवारी...
    VIEW MORE
    Test

    ॲग्रीस्टॅक: शेतकऱ्यांच्या डिजिटल ओळख, मुख्य आव्हाने, आणि सहभागी होण्याची प्रक्रिया

    ॲग्री स्टॅक (Agri Stack) एक डिजिटल पायाभूत सुविधा आहे जी...
    VIEW MORE
    Test

    पीएम-कुसुम योजना: कॉम्पोनंट-ए – संपूर्ण माहिती

    पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान (PM-KUSUM / पीएम-कुसुम...
    VIEW MORE
    • आमच्या बद्दल (About us)
    • गोपनीयता धोरण (Privacy Policy)
    • आमच्याशी संपर्क साधा (Contact us)
    A theme by Gradient Themes ©