Skip to content
  • Fri. May 9th, 2025
    • आमच्या बद्दल (About us)
    • गोपनीयता धोरण (Privacy Policy)
    • आमच्याशी संपर्क साधा (Contact us)
    agmarathi logo

    agmarathi.in

    शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनाविषयी अद्ययावत माहिती आणि बातम्या

    Home
    • मुख्य पृष्ठ
    • कृषि
    • पर्यावरण
    • ग्रामीण विकास
    • शाश्वत जीवन
    • अन्न आणि पोषण
      • पाककृती
    • सरकारी योजना
    • नोकऱ्या
    '
    agmarathi logo

    agmarathi.in

    शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनाविषयी अद्ययावत माहिती आणि बातम्या

    • मुख्य पृष्ठ
    • कृषि
    • पर्यावरण
    • ग्रामीण विकास
    • शाश्वत जीवन
    • अन्न आणि पोषण
      • पाककृती
    • सरकारी योजना
    • नोकऱ्या
    HomeFood and NutritionRecipesशेवग्याच्या पानांचे पराठे- पौष्टिक मेजवानी
    शेवग्याच्या पानांचे पराठे
    शेवग्याच्या पानांचे पराठे
    Recipes

    शेवग्याच्या पानांचे पराठे- पौष्टिक मेजवानी

    author
    By प्राची राजूरकर
    July 26, 2024July 26, 2024
    0 minutes, 17 seconds Read

    आपला देश फळं, भाज्या यांच्याबाबतीत खूप समृद्ध आहे. मांसाहाराच्या तुलनेत इथं शाकाहाराला (Vegetarian Food) ला अधिक प्राधान्य दिलं जातं. आयुर्वेदासारखी (Ayurveda) अनमोल देणगीही आपल्याला लाभली आहे. आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या अनेक भाज्यांचे औषधी गुणधर्म आता जगालाही पटले असून, जगभर त्याचा प्रसार होत आहे. आपल्या परसदारी अनेक प्रकारची झाडे असतात पण बऱ्याचवेळा आपल्याला त्यांचे महत्व लक्षात येत नाही. असाच एक बहुगुणी वृक्ष म्हणजे शेवगा (Moringa oleifera / Drumstick tree )! चला तर मग बनवूया शेवग्याच्या पानांचे पराठे.

    विशेष म्हणजे आपला देश शेवग्याचा अर्थात मोरिंगाचा सर्वात मोठा उत्पादक आहे. शेवग्याच्या शेंगा आपण भाजीसाठी वापरतो पण याच्या पानातही अनेक औषधी गुणधर्म असतात. तुम्हाला महिती आहे का शेवग्याच्या पानांमुळे थकवा आणि अशक्तपणा दूर होत शरीराला उर्जा मिळते. कारण या पानांमध्ये भरपूर लोह व व्हिटॅमिन-ए (Iron and Vitamin A) असते.

    आज आपण जे पराठे बनवणार आहोत ते चवदार तर आहेच आणि त्याचे आरोग्यदायी फायदे तर मोठ्यापासून लहाना पर्यंत सगळ्यांसाठी अगदी फायदेशीर ! आणि हे पराठे म्हणजे तुम्ही नाश्त्याला, जेवणात किवा अगदी रात्रीच्या जेवणातही खाऊ शकता. तर आता बनवूयात शेवग्याच्या पानांचे पराठे. अगदी कमी साहित्यात आणि झटपट १५ मिनिटात तयार होणारे.

    आता साहित्य काय लागणार ते बघुया !

    बनविण्यासाठी लागणारे साहित्य – शेवग्याच्या पानांचे पराठे

    1. स्वच्छ धुतलेली शेवग्याची हिरवी पाने (fresh moringa leaves) -१ वाटी
    2. गव्हाचे पीठ (wheat flour)- -२ वाटी (गव्हाचे पीठ जर वापरायचे नसेल तर बाजरी किवा नाचणीचे पीठ देखील वापरू शकता)
    3. आले लसून वाटलेले ( ginger garlic paste ) १/२ छोटा चमचा
    4. लाल तिखट (red chilly powder) -१ चमचा
    5. हळद (turmeric powder) १/२ छोटा चमचा
    6. मीठ (salt)-चवीप्रमाणे
    7. तेल (cooking oil) -३ चमचे

    बनविण्याची विधी – शेवग्याच्या पानांचे पराठे

    • सर्वप्रथम स्वच्छ धुतलेली शेवग्याची हिरवी पाने (Fresh moringa leaves), गव्हाचे पीठ, वाटलेले आले लसून, लाल तिखट, हळद, मीठ हे सर्व साहित्य वर दिलेल्या प्रमाणात घेऊन एकत्र करा.
    • आता या मिश्रणाचा थोडे थोडे पाणी घालून घट्ट गोळा बांधून घ्या.
    • पोळपाटावर पोळीप्रमाणे लाटून तव्यावर थोडे तेल सोडून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या
    • गरमागरम पराठे तयार आहेत.

    दह्याबरोबर किवा टमाटर च्या चटणीबरोबर सर्व करा ज्यामुळे हे शेवग्याचे पराठे खायला अधिक लज्जतदार वाटतील.

    शेवग्याच्या शेंगांबरोबरच पानं, फुलंदेखील खाण्यासाठी वापरली जातात. शेवग्यामध्ये प्रथिनं (Proteins) , अमीनो अॅसिडस् (Amini acids), बीटा-कॅरोटीन (Beta-carotene) आणि वेगवेगळ्या प्रकारचे फिनॉलिक (Phenolic) असतात जे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात. शेवग्यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम (Calcium) असते. – मुलांसाठी याचा खूपच फायदा होतो. यामुळं हाडं आणि दात मजबूत होतात. रोगप्रतिकार शक्ती (Immunity) वाढविण्यासाठीदेखील शेवगा उपयुक्त ठरतो. त्वचेसाठीही (Skin) शेवगा खूप फायदेशीर आहे.

    कृपया येथे मोरिंगा बद्दल अधिक जाणून घ्या: Tamil Nadu Agricultural University

    आरोग्य आणि पोषण सूचना:या वेबसाइटवरील आरोग्य आणि पोषण माहिती सामान्य माहिती देण्यासाठी आहे. प्रत्येकाची पोषण गरज वेगवेगळी असू शकते. वैयक्तिक आहार सल्ल्यासाठी आपल्या आरोग्यतज्ञाचा सल्ला घ्या. आम्ही दिलेल्या माहितीची अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ही माहिती वैद्यकीय सल्ला नाही.

    Share this:

    • Post
    • Click to share on Reddit (Opens in new window)Reddit
    • Click to share on Telegram (Opens in new window)Telegram
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)WhatsApp

    Related

    Tags: Drumstick tree Moringa oleifera Recipes पराठा पाककृती मराठी रेसिपीज शेवगा
    author

    प्राची राजूरकर

    प्राची पर्यावरण शास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीधर असून त्यात संशोधन देखिल करीत आहे. याचबरोबर ती शिक्षणशास्त्रात पदवीधर असून कायद्याची देखील पदवीधर आहे. थोडक्यात सांगायचेच तर ती एक संशोधक, शिक्षण व कायदेतज्ञ आहे, आणि मुख्यत्वे ती वनीकरण क्षेत्रात निपुण असून एका जवाबदार पदावर कार्य करीत आहे. तिला विविध सरकारी योजनाबद्दलचे माहिती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवायला आवडते जे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी तसेच मोठ्या सामाजिक परीवर्तनासाठी फायदेशीर ठरेल.

    मिश्र भाज्यांचा रोल_Mix Vegetables Roll
    Previous

    मिश्र भाज्यांचा रोल

    तिखट शेवया - Spicy Indian noodles
    Next

    तिखट शेवया – आजीचे स्वादिष्ट नूडल्स

    Similar Posts

    तिखट शेवया - Spicy Indian noodles
    Recipes

    तिखट शेवया – आजीचे स्वादिष्ट नूडल्स

    author
    By प्राची राजूरकर
    July 26, 2024July 26, 2024
    बीटरूट चा पराठा
    Recipes

    बीटरूट चा पराठा – जीवनसत्त्वे आणि खनिजांनी परिपूर्ण

    author
    By प्राची राजूरकर
    August 6, 2024August 6, 2024

    Leave a ReplyCancel reply

    Subscribe via email!

    Subscribe to agmarathi newsletter

    Recent Posts

    • रात्रीचा सम्राट: घुबडाची अद्भुत कहाणी
    • मी आहे संपत्ती, समृद्धी आणि अढळ विश्वासाचे प्रतीक – मी आहे र्‍होडोडेंड्रॉन!
    • झिरो एनर्जी कूल चेंबर – फळे व भाजीपाला ताजे ठेवण्याचा कमी खर्चाचा उपाय
    • मी आहे बेस्ट आर्किटेक्ट! – सुगरण पक्ष्याचं अफलातून घरटे
    • वन्यप्राणी गणना बुद्ध पौर्णिमेलाच का करतात?
    • संत्रा बागेसाठी रोगमुक्त रोपे कोठे खरेदी करावी
    • कावळा आणि मुंग्यांचं नैसर्गिक हॉस्पिटल!
    • मेंढपाळाचा मुलगा ते UPSC अधिकारी : बिरदेव डोणे यांची जिद्दीची कहाणी
    • मातीचे गुणधर्म: शेतीसाठी माती किती उपयुक्त आहे हे कशावर ठरते?
    • देशी कोंबडी की देशी-टाईप? खरी ओळख, अंड्याची व मांसाची गुणवत्ता आणि बाजारातील फसवणूक उघड

    आम्हाला फॉलो करा

    • facebook
    • twitter
    • instagram
    • youtube
    Test

    प्रधानमंत्री सौरघऱ – मोफत वीज योजना: संपूर्ण माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया

    भारत सरकारने हरित उर्जेचा प्रचार आणि वीज बचतीसाठी १३ फेब्रुवारी...
    VIEW MORE
    Test

    ॲग्रीस्टॅक: शेतकऱ्यांच्या डिजिटल ओळख, मुख्य आव्हाने, आणि सहभागी होण्याची प्रक्रिया

    ॲग्री स्टॅक (Agri Stack) एक डिजिटल पायाभूत सुविधा आहे जी...
    VIEW MORE
    Test

    पीएम-कुसुम योजना: कॉम्पोनंट-ए – संपूर्ण माहिती

    पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान (PM-KUSUM / पीएम-कुसुम...
    VIEW MORE
    • आमच्या बद्दल (About us)
    • गोपनीयता धोरण (Privacy Policy)
    • आमच्याशी संपर्क साधा (Contact us)
    A theme by Gradient Themes ©