ॲग्रीस्टॅक: शेतकऱ्यांच्या डिजिटल ओळख, मुख्य आव्हाने, आणि सहभागी होण्याची प्रक्रिया

ॲग्री स्टॅक (Agri Stack) एक डिजिटल पायाभूत सुविधा आहे जी भारतीय शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमतेची सुधारणा करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या डिजिटल ओळखपत्र (Digital ID) तयार केला जातो, ज्याद्वारे त्यांना विविध सरकारी योजना आणि सेवा वापरणे सुलभ होईल. महाराष्ट्र सरकारने राज्यातील १.१९ कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र  प्रदान करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. […]