Skip to content
  • Sat. May 10th, 2025
    • आमच्या बद्दल (About us)
    • गोपनीयता धोरण (Privacy Policy)
    • आमच्याशी संपर्क साधा (Contact us)
    agmarathi logo

    agmarathi.in

    शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनाविषयी अद्ययावत माहिती आणि बातम्या

    Home
    • मुख्य पृष्ठ
    • कृषि
    • पर्यावरण
    • ग्रामीण विकास
    • शाश्वत जीवन
    • अन्न आणि पोषण
      • पाककृती
    • सरकारी योजना
    • नोकऱ्या
    '
    agmarathi logo

    agmarathi.in

    शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनाविषयी अद्ययावत माहिती आणि बातम्या

    • मुख्य पृष्ठ
    • कृषि
    • पर्यावरण
    • ग्रामीण विकास
    • शाश्वत जीवन
    • अन्न आणि पोषण
      • पाककृती
    • सरकारी योजना
    • नोकऱ्या
    HomeFood and NutritionRecipesस्वीट कॉर्न चे स्वादिष्ट आणि पौष्टिक असे पकोडे
    स्वीट कॉर्न पकोडा_Sweet corn pakora
    Sweet corn pakora
    Recipes

    स्वीट कॉर्न चे स्वादिष्ट आणि पौष्टिक असे पकोडे

    author
    By प्राची राजूरकर
    August 13, 2024August 13, 2024
    0 minutes, 5 seconds Read

    अनेक लोकांना स्वीट कॉर्न खायला आवडते. शहर असो वा गाव, बहुतेक लोकांना स्वीट कॉर्न कणीस खायला आवडते. लोक ते मोठ्या उत्साहाने खातात. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असल्या तरी, काही लोक ते भाजून खातात, तर काही लोक ते उकळवून किंवा वेगवेगळ्या स्नॅक्समध्ये मिसळून खातात. चला तर मग बनवूया स्वीट कॉर्न चे पकोडे!

    स्वीट कॉर्नमध्ये व्हिटॅमिन ए, बी, ई सारखे अँटिऑक्सिडेंट, खनिज आणि पौष्टिक गुणधर्म असतात, जे अनेक आरोग्य समस्यांवर मात करण्यास मदत करतात.आणि अशाच या स्वीट कॉर्न चा काहीसा चटपटीत पदार्थ बनवला तर बच्चे कंपनी च काय तर मोठी मंडळी देखील पुन्हा पुन्हा मागून खातील हा पदार्थ! हो मग आज आपणबनवणार आहोत स्वीट कॉर्न चे चटपटीत ,स्वादिष्ट आणि पौष्टिक असे पकोडे! जे सकाळच्या किवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट पदार्थ आणि तोही झटपट बनणारा, आणि टोमाटो च्या चटणी किवा सॉस बरोबर खाण्यास एकदम भारी!

    तर हे स्वीट कॉर्न चे पकोडे बनवायला आपल्याला काय काय साहित्य लागेल ते बघा.

    बनविण्यासाठी लागणारे साहित्य- स्वीट कॉर्न चे पकोडे

    1. स्वीट कॉर्ण-१ (स्वीट कॉर्ण चे दाणे सोलून मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यावे)
    2. तांदळाचे पीठ -१/२ वाटी
    3. बेसन -१ चमचा
    4. हिरवी मिरची -४ बारीक कापलेली
    5. कांदा -१ बारीक कापलेला
    6. कढीपत्ता-२ पाने
    7. कोथिंबीर -४-५ काड्या बारीक कापलेला
    8. मीठ -१ चमचा
    9. ओवा -चिमुटभर
    10. तीळ-१/२ छोटा चमचा
    11. हिंग -चिमुटभर
    12. जिरे पावडर १/२ चमचा
    13. हळद -१/२ चमचा
    14. लाल तिखट -१ चमचा
    15. तेल तळण्याकरिता

    बनविण्याची विधी- स्वीट कॉर्न चे पकोडे

    • सर्वप्रथम मिक्सर मधून जाडसर वाटून घेतलेले स्वीट कॉर्न चे दाणे एका मोठ्या पातेल्यात काढून घ्यावे.
    • आता त्यात वर दिलेल्या प्रमाणात तांदळाचे पीठ,बेसन,बारीक कापलेला कांदा,हिरवी मिरची ,कढीपत्ता,कोथिंबीर, तिखट, हळद, मीठ,ओवा,तीळ,हिंग,जिरे पावडर घालून मिश्रण चांगले एकजीव करावे.
    • आता कढई त तेल गरम करून त्यात वरील मिश्रणाचे छोटे छोटे पकोडे तळून घ्यावेत.
    • गरमागरम पकोडे टोमाटो ची चटणी किवा सास सोबत सर्व करावे.

    स्वीट कॉर्न खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. स्वीट कॉर्नचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. कारण स्वीट कॉर्नमध्ये व्हिटॅमिन ए, बी, ई सारखे अँटिऑक्सिडेंट, खनिज आणि पौष्टिक गुणधर्म असतात, जे अनेक आरोग्य समस्यांवर मात करण्यास मदत करतात. यासोबतच यामध्ये फायबरचे प्रमाणही आढळते, जे याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते. स्वीट कॉर्नमध्ये खनिज क्षारही पुरेशा प्रमाणात आढळतात.

    स्वीट कॉर्नचे सेवन केल्याने आरोग्याशी संबंधित अनेक आजार बरे होण्यास मदत होते. स्वीट कॉर्नमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्सचे गुणधर्म आढळतात, जे डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतात.स्वीट कॉर्नमध्ये भरपूर लोह, व्हिटॅमिन बी 12 आणि फॉलिक आम्ल असते, जे रक्तक्षय दूर करण्यास मदत करते.

    Share this:

    • Post
    • Click to share on Reddit (Opens in new window)Reddit
    • Click to share on Telegram (Opens in new window)Telegram
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)WhatsApp

    Related

    Tags: Recipes Sweet corn Sweet Corn Pakora पाककृती मराठी रेसिपीज स्वीट कॉर्न स्वीट कॉर्न चे पकोडे
    author

    प्राची राजूरकर

    प्राची पर्यावरण शास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीधर असून त्यात संशोधन देखिल करीत आहे. याचबरोबर ती शिक्षणशास्त्रात पदवीधर असून कायद्याची देखील पदवीधर आहे. थोडक्यात सांगायचेच तर ती एक संशोधक, शिक्षण व कायदेतज्ञ आहे, आणि मुख्यत्वे ती वनीकरण क्षेत्रात निपुण असून एका जवाबदार पदावर कार्य करीत आहे. तिला विविध सरकारी योजनाबद्दलचे माहिती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवायला आवडते जे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी तसेच मोठ्या सामाजिक परीवर्तनासाठी फायदेशीर ठरेल.

    बीटरूट चा पराठा
    Previous

    बीटरूट चा पराठा – जीवनसत्त्वे आणि खनिजांनी परिपूर्ण

    करटोली ची भाजी_ Spiny gourd curry
    Next

    करटोली ची भाजी – आरोग्याचा खजिना

    Similar Posts

    मशरूम ची सुक्की भाजी
    Recipes

    मशरूम ची सुक्की भाजी- पावसाळ्यासाठी उत्तम रानभाजी

    author
    By प्राची राजूरकर
    July 20, 2024July 23, 2024
    Masoor Dal Recipe
    Recipes

    फोडणीची अक्खी मसूर: पौष्टिकता आणि स्वादाचा एकत्रित आनंद

    author
    By प्राची राजूरकर
    July 14, 2024July 14, 2024

    Leave a ReplyCancel reply

    Subscribe via email!

    Subscribe to agmarathi newsletter

    Recent Posts

    • रात्रीचा सम्राट: घुबडाची अद्भुत कहाणी
    • मी आहे संपत्ती, समृद्धी आणि अढळ विश्वासाचे प्रतीक – मी आहे र्‍होडोडेंड्रॉन!
    • झिरो एनर्जी कूल चेंबर – फळे व भाजीपाला ताजे ठेवण्याचा कमी खर्चाचा उपाय
    • मी आहे बेस्ट आर्किटेक्ट! – सुगरण पक्ष्याचं अफलातून घरटे
    • वन्यप्राणी गणना बुद्ध पौर्णिमेलाच का करतात?
    • संत्रा बागेसाठी रोगमुक्त रोपे कोठे खरेदी करावी
    • कावळा आणि मुंग्यांचं नैसर्गिक हॉस्पिटल!
    • मेंढपाळाचा मुलगा ते UPSC अधिकारी : बिरदेव डोणे यांची जिद्दीची कहाणी
    • मातीचे गुणधर्म: शेतीसाठी माती किती उपयुक्त आहे हे कशावर ठरते?
    • देशी कोंबडी की देशी-टाईप? खरी ओळख, अंड्याची व मांसाची गुणवत्ता आणि बाजारातील फसवणूक उघड

    आम्हाला फॉलो करा

    • facebook
    • twitter
    • instagram
    • youtube
    Test

    प्रधानमंत्री सौरघऱ – मोफत वीज योजना: संपूर्ण माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया

    भारत सरकारने हरित उर्जेचा प्रचार आणि वीज बचतीसाठी १३ फेब्रुवारी...
    VIEW MORE
    Test

    ॲग्रीस्टॅक: शेतकऱ्यांच्या डिजिटल ओळख, मुख्य आव्हाने, आणि सहभागी होण्याची प्रक्रिया

    ॲग्री स्टॅक (Agri Stack) एक डिजिटल पायाभूत सुविधा आहे जी...
    VIEW MORE
    Test

    पीएम-कुसुम योजना: कॉम्पोनंट-ए – संपूर्ण माहिती

    पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान (PM-KUSUM / पीएम-कुसुम...
    VIEW MORE
    • आमच्या बद्दल (About us)
    • गोपनीयता धोरण (Privacy Policy)
    • आमच्याशी संपर्क साधा (Contact us)
    A theme by Gradient Themes ©