Skip to content
  • Sat. May 10th, 2025
    • आमच्या बद्दल (About us)
    • गोपनीयता धोरण (Privacy Policy)
    • आमच्याशी संपर्क साधा (Contact us)
    agmarathi logo

    agmarathi.in

    शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनाविषयी अद्ययावत माहिती आणि बातम्या

    Home
    • मुख्य पृष्ठ
    • कृषि
    • पर्यावरण
    • ग्रामीण विकास
    • शाश्वत जीवन
    • अन्न आणि पोषण
      • पाककृती
    • सरकारी योजना
    • नोकऱ्या
    '
    agmarathi logo

    agmarathi.in

    शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनाविषयी अद्ययावत माहिती आणि बातम्या

    • मुख्य पृष्ठ
    • कृषि
    • पर्यावरण
    • ग्रामीण विकास
    • शाश्वत जीवन
    • अन्न आणि पोषण
      • पाककृती
    • सरकारी योजना
    • नोकऱ्या
    HomeFood and NutritionRecipesबीटरूट चा पराठा – जीवनसत्त्वे आणि खनिजांनी परिपूर्ण
    बीटरूट चा पराठा
    बीटरूट चा पराठा
    Recipes

    बीटरूट चा पराठा – जीवनसत्त्वे आणि खनिजांनी परिपूर्ण

    author
    By प्राची राजूरकर
    August 6, 2024August 6, 2024
    0 minutes, 9 seconds Read

    जसे जीवन अनेक रंगानी भरलेले असते त्याचप्रमाणे जर आपल्या आहारात रंगसंगती साधता आली तर किती छान होईल ना! आज आपण बनवूया असाच रंगीत आणि पौष्टिक पराठा, हो पण कुठला कृत्रिम रंग न टाकता बर का! तुम्हाला वाटत असेल की मी यावर गंमत करत आहे आणि कोणत्याही कृत्रिम रंगांशिवाय रंगीत पराठा बनविणे अशक्य आहे. परंतु पौष्टिक, लोहसमृद्ध आणि सहज उपलब्ध बीटरूटसह (Beta vulgaris or Beetroot) हे शक्य आहे. तर, आज आपण बीटरूट चा पराठा बनवणार आहोत.

    निरोगी असण्यासोबतच बीट त्याच्या सुंदर लाल रंगामुळेही लोकप्रिय आहे. बीटरूटच्या विशेष चवीमुळे सॅलड्साठी त्याला सगळ्यांची पसंती असते. बीट चवदार असण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. हा बीटरूट चा पराठा सगळ्या वयोगटांसाठी खाण्यास एकदम उत्तम आणि पौष्टीक सुद्धा. झटपट २० मिनिटात तयारही होतो.आता दोन व्यक्तींसाठी पराठा बनवायला काय काय साहित्य लागेल ते बघूया.

    बनविण्यासाठी लागणारे साहित्य- बीटरूट चा पराठा

    1. बीट( beetroot) -२ (मिक्सर मधून बारीक वाटून घेतलेले )
    2. हिंग (asafetida) -चिमुटभर
    3. गव्हाचे पीठ (wheat flour)- -२ वाटी (गव्हाचे पीठ जर वापरायचे नसेल तर बाजरी किवा नाचणीचे पीठ देखील वापरू शकता)
    4. आले लसून वाटलेले ( ginger garlic paste ) १/२ छोटा चमचा
    5. लाल तिखट (red chili powder) -१ चमचा
    6. हळद (turmeric powder) १/२ छोटा चमचा
    7. मीठ (salt)- चवीप्रमाणे
    8. तेल (cooking oil) -३ चमचे

    बनविण्याची विधी- बीटरूट चा पराठा

    • सर्वप्रथम मिक्सर मधून बारीक वाटून घेतलेले बीट, गव्हाचे पीठ, वाटलेले आले लसून, लाल तिखट, हळद, हिंग व मीठ हे सर्व साहित्य वर दिलेल्या प्रमाणात घेऊन एकत्र करा.
    • आता या मिश्रणाचा थोडे थोडे पाणी घालून घट्ट गोळा बांधून घ्या.
    • पोळपाटावर पोळीप्रमाणे लाटून तव्यावर थोडे तेल सोडून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या
    • गरमागरम पराठे तयार आहेत.
    • दह्याबरोबर किवा टमाटर च्या चटणीबरोबर सर्व करा ज्यामुळे हे पराठे खायला अधिक लज्जतदार वाटतील.

    बीटचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिन योग्य राहते आणि त्वचा चमकदार आणि सुंदर राहते. बीटमध्ये कॅलरीज कमी असतात आणि जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारख्या पोषक तत्व भरपूर असतात. बीट हे बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे, पोटॅशियम, तांबे आणि मॅग्नेशियम यांचा उत्कृष्ट स्रोत आहे. पोषक तत्वांनी समृद्ध बीट उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. बीटरूटमध्ये भरपूर फायबर आढळते, ज्याचे सेवन केल्याने पचनक्रिया बरोबर राहते आणि बद्धकोष्ठतासारख्या अनेक गंभीर समस्या कमी होतात.बीटचे नियमित सेवन केल्याने मधुमेह आणि हृदयाशी संबंधित जुनाट आजारांचा धोका देखील कमी होतो.

    आरोग्य आणि पोषण सूचना:या वेबसाइटवरील आरोग्य आणि पोषण माहिती सामान्य माहिती देण्यासाठी आहे. प्रत्येकाची पोषण गरज वेगवेगळी असू शकते. वैयक्तिक आहार सल्ल्यासाठी आपल्या आरोग्यतज्ञाचा सल्ला घ्या. आम्ही दिलेल्या माहितीची अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ही माहिती वैद्यकीय सल्ला नाही.

    Share this:

    • Post
    • Click to share on Reddit (Opens in new window)Reddit
    • Click to share on Telegram (Opens in new window)Telegram
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)WhatsApp

    Related

    Tags: Beetroot Paratha Recipes पराठा पाककृती बीटरूट मराठी रेसिपीज
    author

    प्राची राजूरकर

    प्राची पर्यावरण शास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीधर असून त्यात संशोधन देखिल करीत आहे. याचबरोबर ती शिक्षणशास्त्रात पदवीधर असून कायद्याची देखील पदवीधर आहे. थोडक्यात सांगायचेच तर ती एक संशोधक, शिक्षण व कायदेतज्ञ आहे, आणि मुख्यत्वे ती वनीकरण क्षेत्रात निपुण असून एका जवाबदार पदावर कार्य करीत आहे. तिला विविध सरकारी योजनाबद्दलचे माहिती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवायला आवडते जे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी तसेच मोठ्या सामाजिक परीवर्तनासाठी फायदेशीर ठरेल.

    मिश्र कडधान्यांची उसळ_Mix Pulses Usal
    Previous

    मिश्र कडधान्यांची उसळ – शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांची मेजवानी

    स्वीट कॉर्न पकोडा_Sweet corn pakora
    Next

    स्वीट कॉर्न चे स्वादिष्ट आणि पौष्टिक असे पकोडे

    Similar Posts

    करटोली ची भाजी_ Spiny gourd curry
    Recipes

    करटोली ची भाजी – आरोग्याचा खजिना

    author
    By प्राची राजूरकर
    August 13, 2024August 13, 2024
    शेवग्याच्या पानांचे पराठे
    Recipes

    शेवग्याच्या पानांचे पराठे- पौष्टिक मेजवानी

    author
    By प्राची राजूरकर
    July 26, 2024July 26, 2024

    Leave a ReplyCancel reply

    Subscribe via email!

    Subscribe to agmarathi newsletter

    Recent Posts

    • रात्रीचा सम्राट: घुबडाची अद्भुत कहाणी
    • मी आहे संपत्ती, समृद्धी आणि अढळ विश्वासाचे प्रतीक – मी आहे र्‍होडोडेंड्रॉन!
    • झिरो एनर्जी कूल चेंबर – फळे व भाजीपाला ताजे ठेवण्याचा कमी खर्चाचा उपाय
    • मी आहे बेस्ट आर्किटेक्ट! – सुगरण पक्ष्याचं अफलातून घरटे
    • वन्यप्राणी गणना बुद्ध पौर्णिमेलाच का करतात?
    • संत्रा बागेसाठी रोगमुक्त रोपे कोठे खरेदी करावी
    • कावळा आणि मुंग्यांचं नैसर्गिक हॉस्पिटल!
    • मेंढपाळाचा मुलगा ते UPSC अधिकारी : बिरदेव डोणे यांची जिद्दीची कहाणी
    • मातीचे गुणधर्म: शेतीसाठी माती किती उपयुक्त आहे हे कशावर ठरते?
    • देशी कोंबडी की देशी-टाईप? खरी ओळख, अंड्याची व मांसाची गुणवत्ता आणि बाजारातील फसवणूक उघड

    आम्हाला फॉलो करा

    • facebook
    • twitter
    • instagram
    • youtube
    Test

    प्रधानमंत्री सौरघऱ – मोफत वीज योजना: संपूर्ण माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया

    भारत सरकारने हरित उर्जेचा प्रचार आणि वीज बचतीसाठी १३ फेब्रुवारी...
    VIEW MORE
    Test

    ॲग्रीस्टॅक: शेतकऱ्यांच्या डिजिटल ओळख, मुख्य आव्हाने, आणि सहभागी होण्याची प्रक्रिया

    ॲग्री स्टॅक (Agri Stack) एक डिजिटल पायाभूत सुविधा आहे जी...
    VIEW MORE
    Test

    पीएम-कुसुम योजना: कॉम्पोनंट-ए – संपूर्ण माहिती

    पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान (PM-KUSUM / पीएम-कुसुम...
    VIEW MORE
    • आमच्या बद्दल (About us)
    • गोपनीयता धोरण (Privacy Policy)
    • आमच्याशी संपर्क साधा (Contact us)
    A theme by Gradient Themes ©