Skip to content
  • Sat. Jun 7th, 2025
    • आमच्या बद्दल (About us)
    • गोपनीयता धोरण (Privacy Policy)
    • आमच्याशी संपर्क साधा (Contact us)
    agmarathi logo

    agmarathi.in

    शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनाविषयी अद्ययावत माहिती आणि बातम्या

    Home
    • मुख्य पृष्ठ
    • कृषि
    • पर्यावरण
    • ग्रामीण विकास
    • शाश्वत जीवन
    • अन्न आणि पोषण
      • पाककृती
    • सरकारी योजना
    • नोकऱ्या
    '
    agmarathi logo

    agmarathi.in

    शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनाविषयी अद्ययावत माहिती आणि बातम्या

    • मुख्य पृष्ठ
    • कृषि
    • पर्यावरण
    • ग्रामीण विकास
    • शाश्वत जीवन
    • अन्न आणि पोषण
      • पाककृती
    • सरकारी योजना
    • नोकऱ्या
    HomeFood and NutritionRecipesमिश्र भाज्यांचा रोल
    मिश्र भाज्यांचा रोल_Mix Vegetables Roll
    मिश्र भाज्यांचा रोल
    Recipes

    मिश्र भाज्यांचा रोल

    author
    By प्राची राजूरकर
    July 24, 2024July 24, 2024
    0 minutes, 11 seconds Read

    लहान मुलांसाठी नेहमी-नेहमी नाष्ट्यासाठी काय बनवायचं हा प्रश्न माझ्यासारख्या अनेक आईना पडला असतो, रोज रोज भाजी पोळी खायचापण मुल कंटाळा करतात, अशा वेळी त्याच भाजीपोळीला जरा वेगळ्या रुपात मुलांना खाऊ घालता आला तर किती छान! म्हणूनच वेगवेगळ्या भाज्यांना एकत्र करून आपण आज बनवणार आहोत मिश्र भाज्यांचा रोल. २० मिनिटात तयार होणारा आणि खायला चवदार अशा या रेसिपी साठी दोन व्यक्तीसाठी जर रोल बनवायचा आहे तर काय काय साहित्य लागेल ते बघूया.

    बनविण्यासाठी लागणारे साहित्य – मिश्र भाज्यांच्या रोल

    1. गाजर (Carrot) १ किसलेला
    2. शिमला मिरची (Bell pepper/ Capsicum) २ बारीक कापलेला
    3. पत्ता कोबी (Cabbage) किसलेला १ वाटी
    4. कांदा (Onion) २ बारीक कापलेला
    5. टमाटर (Tomato) १ बारीक कापलेला
    6. लसून (Garlic) ६ पाकळ्या बारीक कापलेल्या
    7. लाल तिखट (Red chili powder) -१ चमचा
    8. मीठ (Salt)-चवीप्रमाणे
    9. सोयासॉस (Soya sauce)-२ चमचे
    10. चिज क्यूब (Cheese cube) -३ किसलेला
    11. मैदा ( Maida/ all-purpose flour) १/२ वाटी
    12. कणिक ( Wheat flour)-१ वाटी
    13. तेल (Cooking oil) -३ चमचे
    14. दही (Curd) -१ चमचा

    बनविण्याची विधी- मिश्र भाज्यांचा रोल

    • सर्वप्रथम किसलेला गाजर,बारीक कापलेले पत्ताकोबी,शिमला मिर्ची,कांदा,टमाटर, आणि लसूण एकत्र करून घ्या.
    • आता शेगडी वर खोलगट कुकिंग पॅन ठेवून गरम झाला कि त्यात एक चमचा तेल घाला .तेल गरम झाले कि त्यात वर एकत्र केलेल्या भाज्या घालून नीट परतवून घ्या.
    • आता त्यात वरून २ चमचे सोयासॉस , १ चमचा लाल तिखट, १/२ चमचा मीठ घालून हळूहळू परतवून घ्या.
    • २-३ मिनिटे भाज्या परतवून झाल्यावर पॅन मधले मिश्रण एका भांड्यात काढून घ्या.
    • आता दुसरीकडे १ वाटी कणिक,१/२ वाटी मैदा,चिमुटभर मीठ ,व १ चमचा दही घालून पोळीसाठी भिजवतो तितका घट्टसर गोळा भिजवून घ्या.
    • थोडासा उंडा घेऊन त्याची पातळसर पोळी लाटून घ्या.
    • या पोळीला आता तव्यावर दोन्ही बाजूनी छान शेकून घ्या.
    • पोळीला ताटात काढून वर तयार केलेले मिश्रण पोळीवर एका बाजूला पसरवा.
    • वरून थोडा किसलेला चीझ घाला.
    • आता मिश्रण असलेली पोळी रोल प्रमाणि दुमडून घ्या.
    • रोल केलीली पोळी पुन्हा एकदा गरम तव्यावर शेकून घ्या.

    तुमचा गरमागरम मिश्र भाज्यांचा रोल तयार आहे.

    गरमागरम रोल टोमाटो सॉस बरोबर खायला एकदम छान वाटेल. हा रोल मुले, मोठी मंडळी नाश्त्याच्या स्वरूपात खाऊ शकतील, याशिवाय बच्चेकंपनीला तर हा मेनू डब्ब्यात मधल्या सुट्टीत खायला पण देऊ शकाल. त्याने दोन फायदे होतील एक म्हणजे रोज भाजी पोळी खाण्याचा कंटाळा करणारे मुले हा रोल आवडीने खाती आणि दुसरा म्हणजे यात भाज्यांचे प्रमाण भरपूर असल्याने या आहारामुळे रक्तदाब कमी होतो, हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका कमी होतो, डोळ्यांच्या आणि पचनाच्या समस्या कमी होतात आणि रक्तातील साखरेवर सकारात्मक प्रभाव पडतो, ज्यामुळे भूक लागण्यास मदत होते.

    तर करायचा ण मग हा मिश्र भाज्यांचा रोल आपल्या बच्चेकंपनी साठी!!

    आरोग्य आणि पोषण सूचना: या वेबसाइटवरील आरोग्य आणि पोषण माहिती सामान्य माहिती देण्यासाठी आहे. प्रत्येकाची पोषण गरज वेगवेगळी असू शकते. वैयक्तिक आहार सल्ल्यासाठी आपल्या आरोग्यतज्ञाचा सल्ला घ्या. आम्ही दिलेल्या माहितीची अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ही माहिती वैद्यकीय सल्ला नाही.

    Share this:

    • Post
    • Click to share on Reddit (Opens in new window)Reddit
    • Click to share on Telegram (Opens in new window)Telegram
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)WhatsApp

    Related

    Tags: Mix vegetables roll Recipes पाककृती भाज्यांचा रोल मराठी रेसिपीज
    author

    प्राची राजूरकर

    प्राची पर्यावरण शास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीधर असून त्यात संशोधन देखिल करीत आहे. याचबरोबर ती शिक्षणशास्त्रात पदवीधर असून कायद्याची देखील पदवीधर आहे. थोडक्यात सांगायचेच तर ती एक संशोधक, शिक्षण व कायदेतज्ञ आहे, आणि मुख्यत्वे ती वनीकरण क्षेत्रात निपुण असून एका जवाबदार पदावर कार्य करीत आहे. तिला विविध सरकारी योजनाबद्दलचे माहिती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवायला आवडते जे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी तसेच मोठ्या सामाजिक परीवर्तनासाठी फायदेशीर ठरेल.

    मशरूम ची सुक्की भाजी
    Previous

    मशरूम ची सुक्की भाजी- पावसाळ्यासाठी उत्तम रानभाजी

    शेवग्याच्या पानांचे पराठे
    Next

    शेवग्याच्या पानांचे पराठे- पौष्टिक मेजवानी

    Similar Posts

    बीटरूट चा पराठा
    Recipes

    बीटरूट चा पराठा – जीवनसत्त्वे आणि खनिजांनी परिपूर्ण

    author
    By प्राची राजूरकर
    August 6, 2024August 6, 2024
    करटोली ची भाजी_ Spiny gourd curry
    Recipes

    करटोली ची भाजी – आरोग्याचा खजिना

    author
    By प्राची राजूरकर
    August 13, 2024August 13, 2024

    Leave a ReplyCancel reply

    Subscribe via email!

    Subscribe to agmarathi newsletter

    Recent Posts

    • रात्रीचा सम्राट: घुबडाची अद्भुत कहाणी
    • मी आहे संपत्ती, समृद्धी आणि अढळ विश्वासाचे प्रतीक – मी आहे र्‍होडोडेंड्रॉन!
    • झिरो एनर्जी कूल चेंबर – फळे व भाजीपाला ताजे ठेवण्याचा कमी खर्चाचा उपाय
    • मी आहे बेस्ट आर्किटेक्ट! – सुगरण पक्ष्याचं अफलातून घरटे
    • वन्यप्राणी गणना बुद्ध पौर्णिमेलाच का करतात?
    • संत्रा बागेसाठी रोगमुक्त रोपे कोठे खरेदी करावी
    • कावळा आणि मुंग्यांचं नैसर्गिक हॉस्पिटल!
    • मेंढपाळाचा मुलगा ते UPSC अधिकारी : बिरदेव डोणे यांची जिद्दीची कहाणी
    • मातीचे गुणधर्म: शेतीसाठी माती किती उपयुक्त आहे हे कशावर ठरते?
    • देशी कोंबडी की देशी-टाईप? खरी ओळख, अंड्याची व मांसाची गुणवत्ता आणि बाजारातील फसवणूक उघड

    आम्हाला फॉलो करा

    • facebook
    • twitter
    • instagram
    • youtube
    Test

    प्रधानमंत्री सौरघऱ – मोफत वीज योजना: संपूर्ण माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया

    भारत सरकारने हरित उर्जेचा प्रचार आणि वीज बचतीसाठी १३ फेब्रुवारी...
    VIEW MORE
    Test

    ॲग्रीस्टॅक: शेतकऱ्यांच्या डिजिटल ओळख, मुख्य आव्हाने, आणि सहभागी होण्याची प्रक्रिया

    ॲग्री स्टॅक (Agri Stack) एक डिजिटल पायाभूत सुविधा आहे जी...
    VIEW MORE
    Test

    पीएम-कुसुम योजना: कॉम्पोनंट-ए – संपूर्ण माहिती

    पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान (PM-KUSUM / पीएम-कुसुम...
    VIEW MORE
    • आमच्या बद्दल (About us)
    • गोपनीयता धोरण (Privacy Policy)
    • आमच्याशी संपर्क साधा (Contact us)
    A theme by Gradient Themes ©