Skip to content
  • Sat. May 10th, 2025
    • आमच्या बद्दल (About us)
    • गोपनीयता धोरण (Privacy Policy)
    • आमच्याशी संपर्क साधा (Contact us)
    agmarathi logo

    agmarathi.in

    शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनाविषयी अद्ययावत माहिती आणि बातम्या

    Home
    • मुख्य पृष्ठ
    • कृषि
    • पर्यावरण
    • ग्रामीण विकास
    • शाश्वत जीवन
    • अन्न आणि पोषण
      • पाककृती
    • सरकारी योजना
    • नोकऱ्या
    '
    agmarathi logo

    agmarathi.in

    शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनाविषयी अद्ययावत माहिती आणि बातम्या

    • मुख्य पृष्ठ
    • कृषि
    • पर्यावरण
    • ग्रामीण विकास
    • शाश्वत जीवन
    • अन्न आणि पोषण
      • पाककृती
    • सरकारी योजना
    • नोकऱ्या
    HomeFood and NutritionRecipesमिश्र कडधान्यांची उसळ – शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांची मेजवानी
    मिश्र कडधान्यांची उसळ_Mix Pulses Usal
    मिश्र कडधान्यांची उसळ
    Recipes

    मिश्र कडधान्यांची उसळ – शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांची मेजवानी

    author
    By प्राची राजूरकर
    August 5, 2024August 5, 2024
    0 minutes, 16 seconds Read

    तर आज वेगवेगळी कडधान्ये एकत्र करून आपण बनवूयात मिश्र कडधान्यांची उसळ. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वाना खाता येण्यासारखी आणि छोट्या मोठ्या भुकेसाठी एकदम उत्तम पर्याय!

    आपण सर्वाना कडधान्यांचे पौष्टिकत्व तर माहितीच आहे. प्रत्येक कडधान्याची आपापली एक खासियत असते तसाच एक वेगळा आरोग्यदायी फायदा असतो आणि वेगवेगळी कडधान्ये जर एकत्र केली तर आपल्याला पौष्टिकतेचा एक जम्बो पॅक च मिळेल की!

    कडधान्ये भिजवून किंवा मोड आणून खाण्याची पध्दत खरोखरच आरोग्यदायी आहे; त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते. क जीवनसत्व तर भिजवल्यानंतर व मोड आल्यानंतरच तयार होते. कडधान्यांना भिजवून खाल्ल्याने कडधान्यांचा वातूळपणा कमी होतो लोह व कॅल्शियमचे शोषण चांगले होते.

    महाराष्ट्रात कडधान्यांना मोड आणून (Sprouting Pulses) खाण्याची जुनी आणि चांगली परंपरा आहे. त्यामुळे काही विशिष्ट विकरे उत्तेजीत होतात आणि त्यांच्यामुळे चांगले बदल घडवून येतात.

    मिश्र कडधान्यांची उसळ साठी आपल्याला काय काय साहित्य लागेल ते बघूया.

    बनविण्यासाठी लागणारे साहित्य- मिश्र कडधान्यांची उसळ

    2 वाटी मिश्र कडधान्ये – यात मुग (Moong), मटकी (Moth Beans), वाटाणे (Dried peas), बरबटी (Yardlong bean) व चने (Chickpea) प्रत्येकी १/२ वाटीपेक्षा थोडा कमी या प्रमानात घ्यायचे व रात्रभर पाण्यात भिजू द्यायचे –

    • कांदा (onion) -१ बारीक कापलेला
    • टमाटर (Tomato)-१ बारीक कापलेला
    • हिरवी मिरची(green chilly) -२ बारीक कापलेली
    • कोशिंबीर (coriander)-३-४ काड्या बारीक कापलेली
    • लसून(garlic) – ४-५ पाकळ्या बारीक कापलेला
    • लाल तिखट (Red chilly powder) -१ टेबलस्पून
    • कढीपत्ता ५-१० पाने
    • १/२ छोटा चमचा जिरे ( cumin seeds)
    • १/२ छोटा चमचा मोहरी ( mustard seeds)
    • मीठ (Salt)- १/२ टेबलस्पून
    • हळद (Turmeric powder)- चिमुटभर
    • तेल(oil) -गरजेप्रमाणे

    बनविण्याची विधी – मिश्र कडधान्यांची उसळ

    • सर्वप्रथम प्रेशर कुकर gas वर चढवा
    • कुकर गरम झाला कि त्यात तीन चमचे तेल घालून तेल गरम होऊ द्या
    • तेल गरम झाल्यावर त्यात जिरे मोहरी टाकून तडतडू द्या.
    • त्यानंतर वरील साहित्य जसे कि बारीक कापलेले कांदा,टोमाटो,कोशिंबीर,लसून, कढीपत्ता सर्व साहित्य कुकरमध्ये घालून २ मिनिट तेलात शिजू द्या.
    • त्यानंतर १ चमचा तिखट आणि १/२ चमचा मीठ व चिमुटभर हळद घालून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मंद आचेवर शिजवा.
    • मिश्रणाला तेल सुटू लागले कि त्यात निथळत ठेवलेले मिश्र कडधान्ये टाका.
    • सर्व मिश्रण चमच्याने व्यवस्थित परतवून घ्या.
    • त्यात १/२ ग्लास पाणी घाला.
    • त्यानंतर कुकरचे झाकण लावून १ शिट्टी होऊ द्या’
    • कुकर थंड झाल्यावर झाकण उघडा.
    • अधिक चवीसाठी वरून थोडासा तूप किवा बटर घाला.

    अशी हि चवदार मिश्र कडधान्यांची उसळ तयार आहे.हि गरमागरम उसळ चपाती, भाकरी किवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. किंवा मुलांच्या डब्ब्यात द्यायला, नाहीतर नाष्ट्यात खाण्यासाठी अतिशय योग्य.

    कडधान्य रात्रभर भिजवत ठेवली तर त्यातील टॅनीन (Tannins) आणि फायटीक अॅसीडचे (Phytic acid) प्रमाण कमी होते. कडधान्यातील फायबर मुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते. मिश्रित कडधान्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त असते म्हणून ते सर्व शाकाहारी लोकांसाठी खूप चांगले असते. मिश्रित कडधान्ये फोलेटचा चांगला स्रोत आहेत, ते पाचक आरोग्य राखतात आणि आपली उर्जा पातळी वाढवतात.

    Share this:

    • Post
    • Click to share on Reddit (Opens in new window)Reddit
    • Click to share on Telegram (Opens in new window)Telegram
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)WhatsApp

    Related

    Tags: Recipes उसळ कडधान्यांची उसळ कडधान्ये पाककृती प्रथिने मराठी रेसिपीज
    author

    प्राची राजूरकर

    प्राची पर्यावरण शास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीधर असून त्यात संशोधन देखिल करीत आहे. याचबरोबर ती शिक्षणशास्त्रात पदवीधर असून कायद्याची देखील पदवीधर आहे. थोडक्यात सांगायचेच तर ती एक संशोधक, शिक्षण व कायदेतज्ञ आहे, आणि मुख्यत्वे ती वनीकरण क्षेत्रात निपुण असून एका जवाबदार पदावर कार्य करीत आहे. तिला विविध सरकारी योजनाबद्दलचे माहिती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवायला आवडते जे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी तसेच मोठ्या सामाजिक परीवर्तनासाठी फायदेशीर ठरेल.

    स्वीट कोर्न चा उपमा_ Sweet corn upma
    Previous

    फायबर युक्त स्वीट कॉर्न चा उपमा

    बीटरूट चा पराठा
    Next

    बीटरूट चा पराठा – जीवनसत्त्वे आणि खनिजांनी परिपूर्ण

    Similar Posts

    मिश्र भाज्यांचा रोल_Mix Vegetables Roll
    Recipes

    मिश्र भाज्यांचा रोल

    author
    By प्राची राजूरकर
    July 24, 2024July 24, 2024
    साबुदाणा वडा_Sabudana Vada
    Recipes

    उपवास स्पेशल- साबुदाणा वडा

    author
    By प्राची राजूरकर
    July 26, 2024July 26, 2024

    Leave a ReplyCancel reply

    Subscribe via email!

    Subscribe to agmarathi newsletter

    Recent Posts

    • रात्रीचा सम्राट: घुबडाची अद्भुत कहाणी
    • मी आहे संपत्ती, समृद्धी आणि अढळ विश्वासाचे प्रतीक – मी आहे र्‍होडोडेंड्रॉन!
    • झिरो एनर्जी कूल चेंबर – फळे व भाजीपाला ताजे ठेवण्याचा कमी खर्चाचा उपाय
    • मी आहे बेस्ट आर्किटेक्ट! – सुगरण पक्ष्याचं अफलातून घरटे
    • वन्यप्राणी गणना बुद्ध पौर्णिमेलाच का करतात?
    • संत्रा बागेसाठी रोगमुक्त रोपे कोठे खरेदी करावी
    • कावळा आणि मुंग्यांचं नैसर्गिक हॉस्पिटल!
    • मेंढपाळाचा मुलगा ते UPSC अधिकारी : बिरदेव डोणे यांची जिद्दीची कहाणी
    • मातीचे गुणधर्म: शेतीसाठी माती किती उपयुक्त आहे हे कशावर ठरते?
    • देशी कोंबडी की देशी-टाईप? खरी ओळख, अंड्याची व मांसाची गुणवत्ता आणि बाजारातील फसवणूक उघड

    आम्हाला फॉलो करा

    • facebook
    • twitter
    • instagram
    • youtube
    Test

    प्रधानमंत्री सौरघऱ – मोफत वीज योजना: संपूर्ण माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया

    भारत सरकारने हरित उर्जेचा प्रचार आणि वीज बचतीसाठी १३ फेब्रुवारी...
    VIEW MORE
    Test

    ॲग्रीस्टॅक: शेतकऱ्यांच्या डिजिटल ओळख, मुख्य आव्हाने, आणि सहभागी होण्याची प्रक्रिया

    ॲग्री स्टॅक (Agri Stack) एक डिजिटल पायाभूत सुविधा आहे जी...
    VIEW MORE
    Test

    पीएम-कुसुम योजना: कॉम्पोनंट-ए – संपूर्ण माहिती

    पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान (PM-KUSUM / पीएम-कुसुम...
    VIEW MORE
    • आमच्या बद्दल (About us)
    • गोपनीयता धोरण (Privacy Policy)
    • आमच्याशी संपर्क साधा (Contact us)
    A theme by Gradient Themes ©