फार्म स्टे व्यवसाय कसा सुरू करावा?

कल्पना करा, एखाद्या शनिवार-रविवारी शहरातील कुटुंब शेतावर येतं, सकाळी पक्ष्यांच्या आवाजाने उठतं, दुपारी पिठलं-भाकरी खातं, आणि संध्याकाळी गावकऱ्यांसोबत शेकोटीजवळ बसून गप्पा मारतं.  हीच आहे “फार्म स्टे (Farm Stay)” ची जादू — साधेपणातला आनंद आणि निसर्गाशी नव्याने जोडला जाण्याचा अनुभव. आज ग्रामीण पर्यटन आणि शेतीपूरक उद्योग यांचा संगम म्हणजेच “फार्म स्टे व्यवसाय”. महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन धोरण […]

लडाख मधील आइस स्तुपा

लडाखचं नाव ऐकलं की आपल्याला आठवतात बर्फाच्छादित पर्वत, निळसर आकाश आणि हिमनद्यांचे भव्य दृश्य. अनेकांना वाटतं की इतकं थंड प्रदेश म्हणजे पाण्याची काही कमतरता नसावी. पण प्रत्यक्षात लडाख हे “थंड वाळवंट (Cold Desert)” आहे. येथे हवामान अत्यंत कोरडे असून, वार्षिक पर्जन्यमान १०० मिमी पेक्षा कमी आहे (IJSART, 2020). थंडी एवढी की हिवाळ्यात -२० अंशांपर्यंत तापमान […]

ग्रामीण भारतात अज़ीम प्रेमजीचं योगदान

भारतातील ग्रामीण समाज अजूनही अनेक मूलभूत आव्हानांशी झगडतो आहे – अपुरं शिक्षण, आरोग्य सुविधा, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि असुरक्षित उत्पन्न. सरकारी योजना व धोरणं मदत करतातच, पण त्यांचा परिणाम अनेकदा धीमा किंवा अपुरा ठरतो. अशा परिस्थितीत खाजगी परोपकारी उपक्रम महत्वाची भूमिका बजावतात. अज़ीम प्रेमजी (Azim Premji), IT उद्योगातील यशस्वी उद्योजक आणि विप्रो (Wipro) चे संस्थापक, […]

भारतात अजूनही इथेनॉल मुक्त पेट्रोल मिळतं का?

गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर आणि ग्राहकांमध्ये एकच चर्चा आहे — E20 पेट्रोल आलंय, पण यामुळे माझ्या गाडीचं माईलेज (Mileage) कमी होईल का? जुन्या इंजिनवर काही दुष्परिणाम तर नाहीत ना? भारत सरकारच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रम (Ethanol Blending Programme (EBP) मुळे हा प्रश्न अगदी घराघरात पोहोचला आहे. आधीच्या लेखात आपण भारताची इथेनॉल (Ethanol) उत्पादनातील वाटचाल, जागतिक […]

सत्तेवर नजर ठेवणं म्हणजे राष्ट्रभक्ती

१५ ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन — ध्वजारोहण, देशभक्तीपर गीतं, आणि अभिमानाने भरलेले क्षण. पण या वर्षी, सामाजिक माध्यमांवर फिरत असताना एक पोस्ट खूपच अंतर्मुख करणारी ठरली. इंटरनेट इन्फ्लुएन्सर नमान श्रीवास्तव यांनी लिहिलं होतं: “राजनीति में जाना ज़रूरी नहीं है, लेकिन राजनीति पर नज़र रखना हर नागरिक का कर्तव्य है।सिर्फ वोट देना ही लोकतंत्र नहीं […]

ग्रामीण भारतात रोजगाराच्या नव्या शक्यता: TCS Layoff च्या पार्श्वभूमीवर एक विचारमंथन

भारतातील अग्रगण्य IT सेवा कंपनी TCS (Tata Consultancy Services) ने अलीकडे 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची घोषणा केली. ही घटना देशाच्या एकूण रोजगार प्रणालीसाठी एक मोठा इशारा ठरते. नोकऱ्यांची ही अस्थिरता आपल्याला ग्रामीण भागात रोजगार निर्माण करण्याच्या नव्या संधी शोधण्याची गरज दाखवते. विशेषतः कृषी (Agriculture), अन्न प्रक्रिया (Food Processing), ग्रामोद्योग (Rural Enterprises), आणि कृषी-तंत्रज्ञान (AgriTech) […]

विहिरी गोलच का असतात?

आपण भारतात कुठेही गेलो, तरी बहुतांश ठिकाणी विहिरींचा आकार गोलसरच आढळतो. मग ती पारंपरिक विहीर असो, बोअरवेल असो, किंवा गावातील जुन्या विहिरी – सर्वच ठिकाणी एक सामान्य गोष्ट दिसते, ती म्हणजे विहिरीचा गोलाकार आकार. हे जाणीवपूर्वक होतं का? का विहिरी कधीच चौकोनी किंवा आयताकृती बांधल्या जात नाहीत? या प्रश्नाचं उत्तर विज्ञान, स्थापत्यशास्त्र आणि व्यवहारिक अनुभव […]

ग्रामीण भागातून आलेले भारतीय क्रिकेटपटू: संघर्ष, श्रम आणि शौर्याची कहाणी

भारतामध्ये क्रिकेट केवळ एक खेळ नाही तर एक भावना आहे. शहरांपासून ते खेड्यापर्यंत, प्रत्येक ठिकाणी क्रिकेटचा प्रभाव जाणवतो. मात्र, क्रिकेटसाठी लागणाऱ्या सुविधा, मैदानं, प्रशिक्षण यांची सोय बहुतेकदा शहरी भागांमध्ये जास्त असते. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील खेळाडूंनी आपल्या मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचणे ही खरोखरच प्रेरणादायी बाब आहे. खालील यादीमध्ये अशा काही भारतीय क्रिकेटपटूंचा […]

UPI सेवा अडखळली, पण ग्रामीण भारतात डिजिटल व्यवहारांचा वेग कायम!

“Transaction failed. Please try again later.” असा मेसेज मोबाइलवर झळकला की, आपण पुन्हा एकदा डोळ्यांत आशा आणि मनात शंका घेऊन ‘रिट्राय’ बटण दाबतो. गेल्या काही दिवसांत UPI वापरात अडचणी आल्याचं अनेकांनी अनुभवलं. मार्च मध्ये सिस्टीम ९५ मिनिटं थांबली होती, तर एप्रिलमध्ये जवळपास पाच तास सेवा ८०% यशदराखाली कार्यरत होती. पण या सगळ्या गोंधळात एक गोष्ट […]

ग्रामीण सशक्तीकरणाचे शिल्पकार: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

१४ एप्रिल हा दिवस आपण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांची जयंती म्हणून साजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते, तर समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ आणि दूरदृष्टीचे राष्ट्रनेते  होते. त्यांनी शेती, ग्रामीण विकास आणि स्त्री सक्षमीकरण या क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले. या लेखात आपण त्यांच्या या महत्त्वपूर्ण […]