उडणारी खार – झाडांवरून उडणारी ही गूढ वनवासी!

बालमित्रांनो, आपल्या आजूबाजूला झाडांवरून सरसर चढणारी, टूणटूण उड्या मारणारी छोटीशी खार आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. रामायणात रामाला रामसेतू बांधताना मदत करणारी आणि तिच्या पाठीवर रामाच्या आशीर्वादाची पाच बोटं उमटलेली गोष्ट आपण आजीच्या तोंडून ऐकली असेल. पण तुम्हाला माहिती आहे का, याच खारुताईच्या कुटुंबात एक अशीही खार आहे जी खरंच “उडते”? हो, खरीखुरी उडणारी खार! चला […]

मी आहे व्हिसलर्स ऑफ द वूड्स – ढोल, शिट्टी वाजवणारा जंगली कुत्रा!

तुम्हाला कुत्रे आवडतात का? आणि हो, भुंकणाऱ्या कुत्र्यांना आपण सगळेच ओळखतो. पण कधी अशा कुत्र्यांविषयी ऐकलं आहे का जे शिट्टीसारखा आवाज काढतात? हे कुत्रे पाळीव नसून, जंगलात राहणारे, टोकाचे शिकारी असलेले आणि खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांना आपण म्हणतो – ढोल, उर्फ व्हिसलिंग डॉग, उर्फ आशियाई जंगली कुत्रा (Cuon alpinus). वाघ, बिबट्या, अस्वल यांसारख्या मोठ्या मांसाहारी […]

पावसाचा दूत: माझं नाव पावश्या!

मी काही डोक्याला ताप नाहीये – मी आहे पावसाचा संदेशवहक! मित्रांनो, मला काहीजण “डोक्याला ताप” पक्षी म्हणतात, पण खरं सांगू का? मी तर असा खास पक्षी आहे जो पावसाची चाहूल देतो. चला, आज मी स्वतःबद्दल तुम्हाला सांगतो. माझी ओळख मराठीत मला पावश्या म्हणतात, इंग्रजीत Brain Fever Bird किंवा Common Hawk-Cuckoo, आणि माझं शास्त्रीय नाव आहे […]

रात्रीचा सम्राट: घुबडाची अद्भुत कहाणी

बालमित्रांनो, हॅरी पॉटर (Harry Potter) मालिकेत जादूच्या जगात दूत म्हणून काम करणारा घुबड तुम्ही पाहिला असेलच. विनी द पू (Winnie-the-Pooh) मध्ये घुबडाचे पात्र ज्ञानाचे प्रतिनिधित्व करते, हेही तुम्हाला माहिती आहेच! पण “काय रे घुबडतोंड्या!” असं उपहासाने कोणी तरी म्हणताना ऐकलंय ना? काही लोक तर मला अशुभही मानतात. पण हे सगळं चुकीचं आहे बरं का! मी […]

मी आहे संपत्ती, समृद्धी आणि अढळ विश्वासाचे प्रतीक – मी आहे र्‍होडोडेंड्रॉन!

बालमित्रांनो, उन्हाळ्याच्या सुट्टीत जर तुम्ही थंड हवामान असलेल्या उंच डोंगराळ भागात फिरायला गेलात, आणि लालभडक फुलांच्या गुच्छांनी डवरलेलं एखादं झाड पाहिलंत, तर ते नक्कीच र्‍होडोडेंड्रॉन  (Rhododendron) असू शकतं! माझं नाव थोडं कठीण वाटेल, पण गोष्ट मात्र खूप मजेदार आहे. माझी ओळख: र्‍होडोडेंड्रॉन म्हणजे काय? र्‍होडोडेंड्रॉन  (Rhododendron) या शब्दाची उत्पत्ती ग्रीक भाषेतून झाली आहे. ‘Rhodon’ म्हणजे […]

मी आहे बेस्ट आर्किटेक्ट! – सुगरण पक्ष्याचं अफलातून घरटे

“खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला,देख पिलासाठी जीव तिने झाडाले टांगला…” मराठी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या या ओळी तुम्ही ऐकल्या आहेत का? या कवितेत त्यांनी सुगरण – म्हणजेच Weaver Bird – या छोट्या पण अफलातून पक्ष्याचे सुंदर वर्णन केले आहे. खरंच, या पक्ष्याचा उल्लेख करताना ‘कलाकार’ हा शब्द अगदी योग्य ठरतो! सुगरण म्हणजे निसर्गातला सर्वोत्तम आर्किटेक्ट. सुगरण […]

वन्यप्राणी गणना बुद्ध पौर्णिमेलाच का करतात?

बालमित्रांनो, येत्या १२ मे रोजी आपण बुद्ध पौर्णिमा साजरी करणार आहोत. हा दिवस केवळ धार्मिकच नाही, तर निसर्ग आणि विज्ञानाच्या दृष्टिकोनातूनही फार महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी संपूर्ण भारतभर वन्यप्राणी गणना केली जाते. पण का? चला, यामागील कारणं आणि या दिवसाचे महत्त्व समजून घेऊया. बुद्ध पौर्णिमा: एक त्रिधातुक महोत्सव भगवान गौतम बुद्ध – थोडक्यात […]

कावळा आणि मुंग्यांचं नैसर्गिक हॉस्पिटल!

एकदा एका जंगलात एक मोठा हत्ती निवांत चालत होता. इतक्यात एका छोट्याशा मुंगीने त्याला चावलं… आणि त्या एका चाव्याने इतका मोठा गोंधळ उडाला की हत्ती थरथरला आणि आजूबाजूचं जंगल हादरलं! हत्ती गडगडला खरा, पण त्याच वेळी इतर प्राणीही थक्क झाले — इतकीशी मुंगी आणि एवढा परिणाम? तेव्हापासून जंगलातील मुंग्यांची एक खास ओळख तयार झाली — […]

माझ्या नावात फिश आहे… पण मी फिश नाही! — जेलीफिश

“सारा समंदर मुझे जेलीफिश के नाम से जानता है… और इस समंदर में मेरी वही हैसियत है जो जंगल में शेर की होती है!” हा डायलॉग “कालीचरण” या हिंदी सिनेमात शोभेल, पण तो जर एखादी जेलीफिश म्हणाली, तर कोणाला आश्चर्य वाटणार नाही! कारण जेलीफिश दिसायला जितकी सुंदर आणि आकर्षक, तितकीच ती कधी कधी घातकही असते. […]

सागवान: झाड मजबूत, काम जबरदस्त!

वा! काय सुंदर फर्निचर होत त्या जुन्या बंगल्यातल! नक्कीच सागवान असणार! असे वाक्य कधी ना कधी आपल्या कानावर पडतच असतील. कारण अगदी पुरातन काळापासून साग या वृक्षाला ओळखल्या जाते त्याच्या मजबुतीसाठी. भारतात २,००० हून अधिक वर्षांपासून सागाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. बालमित्रांनो, झाडाचे महत्त्व सांगणारा एक सुंदर संस्कृत श्लोक असा आहे: “दशकूपसमा वापी, […]