बालमित्रांनो, हॅरी पॉटर (Harry Potter) मालिकेत जादूच्या जगात दूत म्हणून काम करणारा घुबड तुम्ही पाहिला असेलच. विनी द पू (Winnie-the-Pooh) मध्ये घुबडाचे पात्र ज्ञानाचे प्रतिनिधित्व करते, हेही तुम्हाला माहिती आहेच! पण “काय रे घुबडतोंड्या!” असं उपहासाने कोणी तरी म्हणताना ऐकलंय ना? काही लोक तर मला अशुभही मानतात. पण हे सगळं चुकीचं आहे बरं का! मी […]
बालमित्रांनो, उन्हाळ्याच्या सुट्टीत जर तुम्ही थंड हवामान असलेल्या उंच डोंगराळ भागात फिरायला गेलात, आणि लालभडक फुलांच्या गुच्छांनी डवरलेलं एखादं झाड पाहिलंत, तर ते नक्कीच र्होडोडेंड्रॉन (Rhododendron) असू शकतं! माझं नाव थोडं कठीण वाटेल, पण गोष्ट मात्र खूप मजेदार आहे. माझी ओळख: र्होडोडेंड्रॉन म्हणजे काय? र्होडोडेंड्रॉन (Rhododendron) या शब्दाची उत्पत्ती ग्रीक भाषेतून झाली आहे. ‘Rhodon’ म्हणजे […]
“खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला,देख पिलासाठी जीव तिने झाडाले टांगला…” मराठी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या या ओळी तुम्ही ऐकल्या आहेत का? या कवितेत त्यांनी सुगरण – म्हणजेच Weaver Bird – या छोट्या पण अफलातून पक्ष्याचे सुंदर वर्णन केले आहे. खरंच, या पक्ष्याचा उल्लेख करताना ‘कलाकार’ हा शब्द अगदी योग्य ठरतो! सुगरण म्हणजे निसर्गातला सर्वोत्तम आर्किटेक्ट. सुगरण […]
बालमित्रांनो, येत्या १२ मे रोजी आपण बुद्ध पौर्णिमा साजरी करणार आहोत. हा दिवस केवळ धार्मिकच नाही, तर निसर्ग आणि विज्ञानाच्या दृष्टिकोनातूनही फार महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी संपूर्ण भारतभर वन्यप्राणी गणना केली जाते. पण का? चला, यामागील कारणं आणि या दिवसाचे महत्त्व समजून घेऊया. बुद्ध पौर्णिमा: एक त्रिधातुक महोत्सव भगवान गौतम बुद्ध – थोडक्यात […]
एकदा एका जंगलात एक मोठा हत्ती निवांत चालत होता. इतक्यात एका छोट्याशा मुंगीने त्याला चावलं… आणि त्या एका चाव्याने इतका मोठा गोंधळ उडाला की हत्ती थरथरला आणि आजूबाजूचं जंगल हादरलं! हत्ती गडगडला खरा, पण त्याच वेळी इतर प्राणीही थक्क झाले — इतकीशी मुंगी आणि एवढा परिणाम? तेव्हापासून जंगलातील मुंग्यांची एक खास ओळख तयार झाली — […]
“सारा समंदर मुझे जेलीफिश के नाम से जानता है… और इस समंदर में मेरी वही हैसियत है जो जंगल में शेर की होती है!” हा डायलॉग “कालीचरण” या हिंदी सिनेमात शोभेल, पण तो जर एखादी जेलीफिश म्हणाली, तर कोणाला आश्चर्य वाटणार नाही! कारण जेलीफिश दिसायला जितकी सुंदर आणि आकर्षक, तितकीच ती कधी कधी घातकही असते. […]
वा! काय सुंदर फर्निचर होत त्या जुन्या बंगल्यातल! नक्कीच सागवान असणार! असे वाक्य कधी ना कधी आपल्या कानावर पडतच असतील. कारण अगदी पुरातन काळापासून साग या वृक्षाला ओळखल्या जाते त्याच्या मजबुतीसाठी. भारतात २,००० हून अधिक वर्षांपासून सागाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. बालमित्रांनो, झाडाचे महत्त्व सांगणारा एक सुंदर संस्कृत श्लोक असा आहे: “दशकूपसमा वापी, […]
बालमित्रांनो, परत एकदा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक भन्नाट, मजेशीर आणि थोडं गूढ असं जंगलातलं रहस्य! तुम्ही नक्कीच ऐकलं असेल ना – राजा-राणीच्या गोष्टी, परीकथा, चिऊ-काऊच्या धमाल कथा, आणि अर्थातच… भुतांच्या गोष्टी! पण, आज आपण ज्या झाडाची ओळख करून घेणार आहोत, ते खरंच “भुतासारखं” दिसतं! होय होय, हे काही भुताचे झाड नाही, पण ते […]
साप! साप! म्हटलं की सर्वांना भीती वाटायला लागते. कारण सर्वांना असं वाटतं की हा साप नक्कीच विषारी असणार आणि साप चावला तर इजा होईल. म्हणून बहुतेक सर्व लोक सापापासून चार हात लांब राहण्यास प्राधान्य देतात. सापांना सरपटणारा प्राणी म्हटलं जातं, म्हणजेच ते जमिनीवर किंवा झाडांवर सरकतात. तुम्ही “फ्लाइंग सिख” ऐकलं असेल, पण कधी “फ्लाइंग स्नेक […]
मित्रांनो, जसे आपण आपला वाढदिवस आनंदाने साजरा करतो, तसेच आपण ज्या पृथ्वीवर राहतो, तिच्या संरक्षणासाठी एक खास दिवस साजरा करायला नको का? हाच तो “जागतिक वसुंधरा दिन” (Earth Day) जो २२ एप्रिल रोजी साजरा केला जातो. वसुंधरा दिन साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे पर्यावरण संवर्धनासाठी जागरूकता निर्माण करणे, लोकांना पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रेरित करणे आणि पृथ्वीच्या […]