Skip to content
  • Sat. May 10th, 2025
    • आमच्या बद्दल (About us)
    • गोपनीयता धोरण (Privacy Policy)
    • आमच्याशी संपर्क साधा (Contact us)
    agmarathi logo

    agmarathi.in

    शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनाविषयी अद्ययावत माहिती आणि बातम्या

    Home
    • मुख्य पृष्ठ
    • कृषि
    • पर्यावरण
    • ग्रामीण विकास
    • शाश्वत जीवन
    • अन्न आणि पोषण
      • पाककृती
    • सरकारी योजना
    • नोकऱ्या
    '
    agmarathi logo

    agmarathi.in

    शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनाविषयी अद्ययावत माहिती आणि बातम्या

    • मुख्य पृष्ठ
    • कृषि
    • पर्यावरण
    • ग्रामीण विकास
    • शाश्वत जीवन
    • अन्न आणि पोषण
      • पाककृती
    • सरकारी योजना
    • नोकऱ्या
    HomeFood and NutritionRecipesतिखट शेवया – आजीचे स्वादिष्ट नूडल्स
    तिखट शेवया - Spicy Indian noodles
    तिखट शेवया
    Recipes

    तिखट शेवया – आजीचे स्वादिष्ट नूडल्स

    author
    By प्राची राजूरकर
    July 26, 2024July 26, 2024
    0 minutes, 11 seconds Read

    जुन्या काळात किंबहुना आजही उन्हाळ्याची चाहूल लागली कि घराघरात आपल्या आज्या, आई ,मावशी सुरु करतात शेवया तयार करण्याची लगबग! मग ते शेवयाचे ओले गहू दळून आणून त्याचं स्वच्छ पांढरया सपिठाच्या बनवलेल्या पांढरयाशुभ्र शेवया! खरंच या शेवयांची रंगतच काही न्यारी आहे! आणि शेवया हा तर आपला महाराष्ट्राचा, हक्काचा पारंपारिक पदार्थ! चला तर मग बनवूया स्वादिष्ट तिखट शेवया.

    पण आजकाल या आधुनिक युगात मुलांना भूक लागली की सर्रास 2 मिनिट इंस्टंट नूडल्स देण्याची जणू प्रथाच पडली आहे. मुलांच्या माता सुद्धा त्यांचा हा हट्ट पुरवतात कारण इंस्टंट नूडल्स फक्त 2 मिनिटांत बनते ना! पण मंडळी खरंच पॅकेज्ड फूड (Packaged food) ही मुलांच्या आरोग्यासाठी चांगली आहे का? तर त्याचे उत्तर आहे नाही. जर तुमची मुले अति प्रमाणात इंस्टंट नूडल्स सारख्या मैद्याच्या पदार्थांचे सेवन करत असतील तर तुम्ही वेळीच त्याला आवर घातला पाहिजे. कारण इंस्टंट नूडल्स मध्ये जरी काही पोषक तत्वे आहेत असे सांगण्यात येत असले तरी ती पोषक तत्वे मुलांच्या आरोग्यासाठी योग्य नाहीत. शिवाय हा एक पाकीटबंद पदार्थ असून असे पदार्थ मुलांनी जास्त प्रमाणात खाणे हानिकारक ठरू शकते.

    आता अनेक पालकांना असाही प्रश्न पडतो कि इंस्टंट नूडल्स नाही तर मग दुसरे काय? तर त्याचे उत्तर दडलंय आपल्या आजच्या या पदार्थात ! इंस्टंट नूडल्स ला पर्याय म्हणून झटपट अगदी १० मिनिटात तयार होणार्या आणि पौष्टीक्तेने परिपूर्ण अशा या तिखट शेवया आज आपण बनवूया!

    बनविण्यासाठी लागणारे साहित्य- तिखट शेवया

    1. घरी बनवलेल्या शेवया -१ वाटी
    2. गाजर (carrot) १/२ बारीक कापलेला
    3. शिमला मिरची (bell pepper/capsicum) १ बारीक कापलेला
    4. फुल कोबी (cabbage) कापलेला १/२ वाटी
    5. कांदा(onion) १ बारीक कापलेला
    6. टमाटर(tomato) १ बारीक कापलेला
    7. लसून( garlic) ६ पाकळ्या बारीक कापलेल्या
    8. कोथिंबीर-१/२ छोटी वाटी
    9. हिरवी मिरची -२
    10. कढीपत्ता ५-१० पाने
    11. १/२ छोटा चमचा जिरे ( cumin seeds)
    12. १/२ छोटा चमचा मोहरी ( mustard seeds)
    13. शेंगदाणे -१ चमचा
    14. लाल तिखट (red chilly powder) -१ चमचा
    15. मीठ (salt)-चवीप्रमाणे
    16. तेल (cooking oil) -३ चमचे

    बनविण्याची विधी -तिखट शेवया

    • सर्वप्रथम कढई थोडेसे तेल घालून शेवया लालसर भाजून घ्याव्या व एका ताटात काढून घ्याव्या
    • त्यानंतर कढई मध्ये ३ चमचे तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, लसून, कढीपत्ता,शेंगदाणे घालून थोडावेळ फोडणी तडतडू द्यावी. त्यानंतर बारीक कापलेला कांदा ,टमाटर घालून परतून घ्यावा.
    • त्यानंतर त्या मिश्रणात हळद ,लालतिखट, व मिठ घालून व्यवस्थितपणे एकत्रित करून घ्यावे.आणि चांगले परतवून घ्यावे.
    • कढई तल्या मिश्रणाला तेल सुटू लागले कि त्यात १ ग्लास पाणी ओतावे .
    • आता या फोडणी घातलेल्या पाण्याला चांगली उकळी आल्यावर त्यात भाजून घेतलेल्या शेवया टाकाव्या.
    • सर्व मिश्रण नीट परतून घ्यावे.
    • मंद आचेवर ५ मिनिटे कढई वर झाकून ठेवून शेवया शिजू द्याव्या.
    • ५ मिनिटांनी शेगडी बंद करून झाकण बाजूला करावे.
    • गरमागरम शेवया वरून कोथिंबीर घालून मुलांना खायला द्याव्या.

    या शेवया पौष्टिक, पचायला हलक्या आणि झटपट तयार होणाऱ्या सकाळच्या नाष्ट्याला अगदी उत्तम पर्याय आहे. याशिवाय डब्ब्यात, मधल्या सुट्टीत खायला सुद्धा देता येईल.

    या शेवयांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्बोदके असतात जी शरीराला उर्जा देण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. शेवया बनवताना तुम्ही त्यात विविध प्रकारच्या भाज्या टाकू शकता. यामुळे त्यातील व्हिटॅमिन आणि प्रोटीन वाढते. याचा फायदा मानसिक आणि शारीरिक दोन्ही वाढीसाठी होतो. तुम्ही शेवयात तूप सुद्धा मिसळून मुलाला देऊ शकता. यामुळे त्याच्या विकासासाठी गरजेचे असणारे मेद त्याला त्यातून मिळेल. वर कृतीमध्ये सांगितलेल्या भाज्या शेवयांमध्ये तुम्ही टाकल्या तर त्यातून मुलाच्या त्वचेला फायदा होईल. वरील कृतीमध्ये आम्ही शक्य तितक्या पौष्टिक भाज्यांचा समावेश केला आहे यामुळे मुलाचे वजन वाढण्याचा धोका सुद्धा उद्भवणार नाही.

    चला तर मग आजच बनवूया मग आपल्या बच्चेकंपनी साठी तिखट शेवया !

    आरोग्य आणि पोषण सूचना: या वेबसाइटवरीलआरोग्य आणिपोषण माहिती सामान्य माहिती देण्यासाठी आहे. प्रत्येकाची पोषण गरज वेगवेगळी असू शकते. वैयक्तिक आहार सल्ल्यासाठी आपल्या आरोग्यतज्ञाचा सल्ला घ्या. आम्ही दिलेल्या माहितीची अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ही माहिती वैद्यकीय सल्ला नाही.

    Share this:

    • Post
    • Click to share on Reddit (Opens in new window)Reddit
    • Click to share on Telegram (Opens in new window)Telegram
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)WhatsApp

    Related

    Tags: Recipes Spicy Noodles इंस्टंट नूडल्स तिखट शेवया पाककृती मराठी रेसिपीज
    author

    प्राची राजूरकर

    प्राची पर्यावरण शास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीधर असून त्यात संशोधन देखिल करीत आहे. याचबरोबर ती शिक्षणशास्त्रात पदवीधर असून कायद्याची देखील पदवीधर आहे. थोडक्यात सांगायचेच तर ती एक संशोधक, शिक्षण व कायदेतज्ञ आहे, आणि मुख्यत्वे ती वनीकरण क्षेत्रात निपुण असून एका जवाबदार पदावर कार्य करीत आहे. तिला विविध सरकारी योजनाबद्दलचे माहिती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवायला आवडते जे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी तसेच मोठ्या सामाजिक परीवर्तनासाठी फायदेशीर ठरेल.

    शेवग्याच्या पानांचे पराठे
    Previous

    शेवग्याच्या पानांचे पराठे- पौष्टिक मेजवानी

    साबुदाणा वडा_Sabudana Vada
    Next

    उपवास स्पेशल- साबुदाणा वडा

    Similar Posts

    मिश्र भाज्यांचा रोल_Mix Vegetables Roll
    Recipes

    मिश्र भाज्यांचा रोल

    author
    By प्राची राजूरकर
    July 24, 2024July 24, 2024
    शेवग्याच्या पानांचे पराठे
    Recipes

    शेवग्याच्या पानांचे पराठे- पौष्टिक मेजवानी

    author
    By प्राची राजूरकर
    July 26, 2024July 26, 2024

    Leave a ReplyCancel reply

    Subscribe via email!

    Subscribe to agmarathi newsletter

    Recent Posts

    • रात्रीचा सम्राट: घुबडाची अद्भुत कहाणी
    • मी आहे संपत्ती, समृद्धी आणि अढळ विश्वासाचे प्रतीक – मी आहे र्‍होडोडेंड्रॉन!
    • झिरो एनर्जी कूल चेंबर – फळे व भाजीपाला ताजे ठेवण्याचा कमी खर्चाचा उपाय
    • मी आहे बेस्ट आर्किटेक्ट! – सुगरण पक्ष्याचं अफलातून घरटे
    • वन्यप्राणी गणना बुद्ध पौर्णिमेलाच का करतात?
    • संत्रा बागेसाठी रोगमुक्त रोपे कोठे खरेदी करावी
    • कावळा आणि मुंग्यांचं नैसर्गिक हॉस्पिटल!
    • मेंढपाळाचा मुलगा ते UPSC अधिकारी : बिरदेव डोणे यांची जिद्दीची कहाणी
    • मातीचे गुणधर्म: शेतीसाठी माती किती उपयुक्त आहे हे कशावर ठरते?
    • देशी कोंबडी की देशी-टाईप? खरी ओळख, अंड्याची व मांसाची गुणवत्ता आणि बाजारातील फसवणूक उघड

    आम्हाला फॉलो करा

    • facebook
    • twitter
    • instagram
    • youtube
    Test

    प्रधानमंत्री सौरघऱ – मोफत वीज योजना: संपूर्ण माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया

    भारत सरकारने हरित उर्जेचा प्रचार आणि वीज बचतीसाठी १३ फेब्रुवारी...
    VIEW MORE
    Test

    ॲग्रीस्टॅक: शेतकऱ्यांच्या डिजिटल ओळख, मुख्य आव्हाने, आणि सहभागी होण्याची प्रक्रिया

    ॲग्री स्टॅक (Agri Stack) एक डिजिटल पायाभूत सुविधा आहे जी...
    VIEW MORE
    Test

    पीएम-कुसुम योजना: कॉम्पोनंट-ए – संपूर्ण माहिती

    पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान (PM-KUSUM / पीएम-कुसुम...
    VIEW MORE
    • आमच्या बद्दल (About us)
    • गोपनीयता धोरण (Privacy Policy)
    • आमच्याशी संपर्क साधा (Contact us)
    A theme by Gradient Themes ©