शेवग्याच्या पानांचे पराठे
शेवग्याच्या पानांचे पराठे

शेवग्याच्या पानांचे पराठे- पौष्टिक मेजवानी

आपला देश फळं, भाज्या यांच्याबाबतीत खूप समृद्ध आहे. मांसाहाराच्या तुलनेत इथं शाकाहाराला  (Vegetarian Food) ला अधिक प्राधान्य दिलं जातं. आयुर्वेदासारखी (Ayurveda) अनमोल देणगीही आपल्याला लाभली आहे. आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या अनेक भाज्यांचे औषधी गुणधर्म आता जगालाही पटले असून, जगभर त्याचा प्रसार होत आहे. आपल्या परसदारी अनेक प्रकारची झाडे असतात पण बऱ्याचवेळा आपल्याला त्यांचे महत्व लक्षात येत नाही. असाच एक बहुगुणी वृक्ष म्हणजे शेवगा (Moringa oleifera / Drumstick tree )! चला तर मग बनवूया शेवग्याच्या पानांचे पराठे.

विशेष म्हणजे आपला देश शेवग्याचा अर्थात मोरिंगाचा सर्वात मोठा उत्पादक आहे. शेवग्याच्या शेंगा आपण भाजीसाठी वापरतो पण याच्या पानातही अनेक औषधी गुणधर्म असतात. तुम्हाला महिती आहे का शेवग्याच्या पानांमुळे थकवा आणि अशक्तपणा दूर होत शरीराला उर्जा मिळते. कारण या पानांमध्ये भरपूर लोह व व्हिटॅमिन-ए (Iron and Vitamin A) असते.

आज आपण जे पराठे  बनवणार आहोत ते चवदार तर आहेच  आणि त्याचे  आरोग्यदायी फायदे तर मोठ्यापासून लहाना पर्यंत सगळ्यांसाठी अगदी फायदेशीर ! आणि हे पराठे म्हणजे तुम्ही नाश्त्याला, जेवणात किवा अगदी रात्रीच्या जेवणातही खाऊ शकता. तर आता बनवूयात शेवग्याच्या पानांचे पराठे. अगदी कमी साहित्यात आणि  झटपट १५ मिनिटात तयार होणारे.

आता साहित्य काय लागणार ते बघुया !

बनविण्यासाठी लागणारे साहित्य – शेवग्याच्या पानांचे  पराठे

  1. स्वच्छ धुतलेली शेवग्याची हिरवी पाने (fresh moringa leaves) -१ वाटी
  2. गव्हाचे पीठ (wheat flour)- -२ वाटी (गव्हाचे  पीठ जर वापरायचे नसेल तर बाजरी किवा नाचणीचे  पीठ देखील वापरू शकता)
  3. आले लसून वाटलेले ( ginger garlic paste ) १/२ छोटा चमचा
  4. लाल तिखट (red chilly powder) -१ चमचा
  5. हळद (turmeric powder) १/२ छोटा चमचा
  6. मीठ (salt)-चवीप्रमाणे
  7. तेल (cooking oil) -३ चमचे

बनविण्याची विधी – शेवग्याच्या पानांचे  पराठे

  • सर्वप्रथम स्वच्छ धुतलेली शेवग्याची हिरवी पाने (Fresh moringa leaves), गव्हाचे पीठ, वाटलेले आले लसून, लाल तिखट, हळद, मीठ हे सर्व साहित्य वर दिलेल्या प्रमाणात घेऊन एकत्र करा.
  • आता या मिश्रणाचा थोडे थोडे पाणी घालून घट्ट गोळा बांधून घ्या.
  • पोळपाटावर पोळीप्रमाणे लाटून तव्यावर थोडे तेल सोडून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या
  • गरमागरम पराठे तयार आहेत.

दह्याबरोबर किवा टमाटर च्या चटणीबरोबर सर्व करा ज्यामुळे हे शेवग्याचे पराठे खायला अधिक लज्जतदार वाटतील.

शेवग्याच्या शेंगांबरोबरच पानं, फुलंदेखील खाण्यासाठी वापरली जातात. शेवग्यामध्ये प्रथिनं (Proteins) , अमीनो अॅसिडस् (Amini acids), बीटा-कॅरोटीन (Beta-carotene) आणि वेगवेगळ्या प्रकारचे फिनॉलिक (Phenolic) असतात जे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात. शेवग्यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम (Calcium) असते. – मुलांसाठी याचा खूपच फायदा होतो. यामुळं हाडं आणि दात मजबूत होतात. रोगप्रतिकार शक्ती (Immunity) वाढविण्यासाठीदेखील शेवगा उपयुक्त ठरतो. त्वचेसाठीही (Skin) शेवगा खूप फायदेशीर आहे.

कृपया येथे मोरिंगा बद्दल अधिक जाणून घ्या: Tamil Nadu Agricultural University

आरोग्य आणि पोषण सूचना: या वेबसाइटवरील आरोग्य आणि पोषण माहिती सामान्य माहिती देण्यासाठी आहे. प्रत्येकाची पोषण गरज वेगवेगळी असू शकते. वैयक्तिक आहार सल्ल्यासाठी आपल्या आरोग्यतज्ञाचा सल्ला घ्या. आम्ही दिलेल्या माहितीची अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ही माहिती वैद्यकीय सल्ला नाही.

author

प्राची राजूरकर

प्राची पर्यावरण शास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीधर असून त्यात संशोधन देखिल करीत आहे. याचबरोबर ती शिक्षणशास्त्रात पदवीधर असून कायद्याची देखील पदवीधर आहे. थोडक्यात सांगायचेच तर ती एक संशोधक, शिक्षण व कायदेतज्ञ आहे, आणि मुख्यत्वे ती वनीकरण क्षेत्रात निपुण असून एका जवाबदार पदावर कार्य करीत आहे. तिला विविध सरकारी योजनाबद्दलचे माहिती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवायला आवडते जे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी तसेच मोठ्या सामाजिक परीवर्तनासाठी फायदेशीर ठरेल.

Similar Posts

Leave a Reply