Skip to content
  • Wed. Jun 25th, 2025
    • आमच्या बद्दल (About us)
    • गोपनीयता धोरण (Privacy Policy)
    • आमच्याशी संपर्क साधा (Contact us)
    agmarathi logo

    agmarathi.in

    शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनाविषयी अद्ययावत माहिती आणि बातम्या

    Home
    • मुख्य पृष्ठ
    • कृषि
    • पर्यावरण
    • ग्रामीण विकास
    • शाश्वत जीवन
    • अन्न आणि पोषण
      • पाककृती
    • सरकारी योजना
    • नोकऱ्या
    '
    agmarathi logo

    agmarathi.in

    शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनाविषयी अद्ययावत माहिती आणि बातम्या

    • मुख्य पृष्ठ
    • कृषि
    • पर्यावरण
    • ग्रामीण विकास
    • शाश्वत जीवन
    • अन्न आणि पोषण
      • पाककृती
    • सरकारी योजना
    • नोकऱ्या
    HomeFood and NutritionRecipesबाजरीच्या पिठाची उकडपेंडी: स्वादिष्ट, 15 मिनिटात तयार, ग्लूटनफ्री
    Bajarichya Pithachi Ukadpendi- Dish
    बाजरीच्या पिठाची उकडपेंडी
    Recipes

    बाजरीच्या पिठाची उकडपेंडी: स्वादिष्ट, 15 मिनिटात तयार, ग्लूटनफ्री

    author
    By प्राची राजूरकर
    July 7, 2024July 14, 2024
    0 minutes, 10 seconds Read

    अनेक जणांना गव्हाच्या पिठाची किंवा ग्लूटेन ची ऍलर्जी (Gluten Allergy) असते, म्हणून त्यांना गहू आणि गव्हाच्या उत्पादनांना पर्याय शोधणे आवश्यक आहे. बाजरी (Pearl millet) हा यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. भारतात, बाजरी ही बाजरी खिचडी, बाजरीची रोटी, बाजरी लापशी, उकडपेंडी आणि इतर सारख्या अनेक पारंपारिक स्वादिष्ट पाककृतींचा मुख्य घटक आहे. चला तर मग, जाणून घेऊया बाजरीच्या पिठाची उकडपेंडी ची ही खास, सोपी रेसिपी!

    आधी बाजरी विषयी आणखी जाणून घेऊया

    जीवनसत्त्वे आणि खनिजांनी भरलेले, बाजरीचे फायदे अत्यंत प्रभावशाली आहेत. बाजरीचा उगम आफ्रिकेत झाला आणि त्यानंतर भारतात त्याची ओळख झाली. या पिकाच्या लहान बिया पांढऱ्या, राखाडी, पिवळ्या, तपकिरी आणि निळसर-जांभळ्या रंगात उपलब्ध असतात. बाजरीची चव किंचित गोडसर असते.

    Pearl millet_Bajri
    Pearl millet / Bajari, Image credit: https://commons.wikimedia.org/wiki/File:Pearl_millet.png

    बाजरीचे आरोग्यासाठी फायदे

    1. ग्लूटेन-मुक्त पर्याय
    2. वजन पाहणाऱ्यांसाठी बाजरी
    3. बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते
    4. रक्तदाबाची पातळी राखते
    5. मधुमेहामध्ये इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी करते
    6. 6 छोट्या बाळांसाठी एक परिपूर्ण अन्न
    7. अँटिऑक्सिडंट्स चे भरपूर प्रमाण.
    8. हाडांची ताकद सुधारते
    9. हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले अन्न
    10. सुधारित दृष्टी आणि डोळ्यांचे आरोग्य
    11. तुमच्या शरीराला अनिमियापासून वाचवते
    12. त्वचे साठी उपयुक्त

    तर अशा या अनेक फायदे असणारा बाजरी चा स्वादिष्ट पदार्थ आपण बनवणार आहोत आणि या पदार्थात शेंगदाणे, दही, कढीपत्ता ,जिरे यासारखे इतरही पौष्टिक घटक थोड्या- थोड्या प्रमाणात आहेतच! तर पदार्थ तर नक्कीच चविष्ट आणि पौष्टिक बनणार यात शंकाच नाही तर वळूया आपल्या आजच्या रेसिपी कडे.

    पदार्थ बनविण्यासाठी लागणारा वेळ -१५ मिनिटे

    साहित्य ( 2 व्यक्तीसाठी) – बाजरीच्या पिठाची उकड्पेंडी

    • १ वाटी बाजरीचे पीठ
    • १ कांदा
    • १ टमाटर
    • २ छोटे चमचे दही
    • १/२ छोटा चमचा जिरे
    • १/२ छोटा चमचा मोहरी
    • १ छोटा चमचा लाल तिखट
    • १/२ छोटा चमचा हळद
    • २-३ लसून पाकळ्या
    • तेल गरजेनुसार
    • मीठ चवीनुसार
    • कोथिंबीर
    • कढीपत्ता ५-६ पाने
    • शेंगदाणे चवीनुसार

    व्यक्तीसंख्येनुसार साहित्याचे प्रमाण वाढवावे

    बनविण्याची विधी – बाजरीच्या पिठाची उकड्पेंडी

    प्रथम पण मध्ये तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, लसून, कढीपत्ता,शेंगदाणे घालून थोडावेळ फोडणी तडतडू द्यावी.

    त्यानंतर बारीक कापलेला कांदा ,टमाटर घालून परतून घ्यावा.

    Bajarichya Pithachi Ukadpendi Recipe 1
    Bajarichya Pithachi Ukadpendi Recipe 2

    त्यानंतर त्या मिश्रणात हळद ,लालतिखट,मिठ व बाजरीचे पीठ घालून व्यवस्थितपणे एकत्रित करून घ्यावे.आणि चांगले लालसर भाजून घ्यावे.

    भाजल्यानंतर मीठ व दही व थोडेसे पाणी घालून व्यवस्थित एकत्र करावे.

    त्यानंतर कढई वर झाकण ठेवून मंद आचेवर वाफ निघेपर्यंत आतील मिश्रण शिजू द्यावे.

    पाच मिनिटांनी झाकण काढून आतील मिश्रण व्यवस्थित फिरवून घ्यावे. शेगडी (Stove) बंद करावी.

    वरून कोथिंबीर कांदा घालून अत्यंत पौष्टिक अशी गरमागरम उकड्पेंडी खाण्यासाठी तयार आहे!

    Bajarichya Pithachi Ukadpendi- Dish
    बाजरीच्या पिठाची उकडपेंडी

    आरोग्य आणि पोषण सूचना: या वेबसाइटवरील आरोग्य आणि पोषण माहिती सामान्य माहिती देण्यासाठी आहे. प्रत्येकाची पोषण गरज वेगवेगळी असू शकते. वैयक्तिक आहार सल्ल्यासाठी आपल्या आरोग्यतज्ञाचा सल्ला घ्या. आम्ही दिलेल्या माहितीची अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ही माहिती वैद्यकीय सल्ला नाही.

    Share this:

    • Post
    • Click to share on Reddit (Opens in new window)Reddit
    • Click to share on Telegram (Opens in new window)Telegram
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)WhatsApp

    Related

    Tags: Gluten-free Recipes उकड्पेंडी ग्लूटनफ्री पाककृती बाजरी मराठी रेसिपीज
    author

    प्राची राजूरकर

    प्राची पर्यावरण शास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीधर असून त्यात संशोधन देखिल करीत आहे. याचबरोबर ती शिक्षणशास्त्रात पदवीधर असून कायद्याची देखील पदवीधर आहे. थोडक्यात सांगायचेच तर ती एक संशोधक, शिक्षण व कायदेतज्ञ आहे, आणि मुख्यत्वे ती वनीकरण क्षेत्रात निपुण असून एका जवाबदार पदावर कार्य करीत आहे. तिला विविध सरकारी योजनाबद्दलचे माहिती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवायला आवडते जे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी तसेच मोठ्या सामाजिक परीवर्तनासाठी फायदेशीर ठरेल.

    Nachni and Futanyache Ladu
    Previous

    स्वादिष्ट आणि आरोग्यदायी: नाचणी-फुटाण्याचे झटपट लाडू

    मका पालक चे स्वादिष्ट आणि पौष्टिक धपाटे
    Next

    मका-पालकचे धपाटे: पौष्टिकता आणि चव यांची अनोखी मेजवानी

    Similar Posts

    शेवग्याच्या पानांचे पराठे
    Recipes

    शेवग्याच्या पानांचे पराठे- पौष्टिक मेजवानी

    author
    By प्राची राजूरकर
    July 26, 2024July 26, 2024
    साबुदाणा वडा_Sabudana Vada
    Recipes

    उपवास स्पेशल- साबुदाणा वडा

    author
    By प्राची राजूरकर
    July 26, 2024July 26, 2024

    Leave a ReplyCancel reply

    Subscribe via email!

    Subscribe to agmarathi newsletter

    Recent Posts

    • रात्रीचा सम्राट: घुबडाची अद्भुत कहाणी
    • मी आहे संपत्ती, समृद्धी आणि अढळ विश्वासाचे प्रतीक – मी आहे र्‍होडोडेंड्रॉन!
    • झिरो एनर्जी कूल चेंबर – फळे व भाजीपाला ताजे ठेवण्याचा कमी खर्चाचा उपाय
    • मी आहे बेस्ट आर्किटेक्ट! – सुगरण पक्ष्याचं अफलातून घरटे
    • वन्यप्राणी गणना बुद्ध पौर्णिमेलाच का करतात?
    • संत्रा बागेसाठी रोगमुक्त रोपे कोठे खरेदी करावी
    • कावळा आणि मुंग्यांचं नैसर्गिक हॉस्पिटल!
    • मेंढपाळाचा मुलगा ते UPSC अधिकारी : बिरदेव डोणे यांची जिद्दीची कहाणी
    • मातीचे गुणधर्म: शेतीसाठी माती किती उपयुक्त आहे हे कशावर ठरते?
    • देशी कोंबडी की देशी-टाईप? खरी ओळख, अंड्याची व मांसाची गुणवत्ता आणि बाजारातील फसवणूक उघड

    आम्हाला फॉलो करा

    • facebook
    • twitter
    • instagram
    • youtube
    Test

    प्रधानमंत्री सौरघऱ – मोफत वीज योजना: संपूर्ण माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया

    भारत सरकारने हरित उर्जेचा प्रचार आणि वीज बचतीसाठी १३ फेब्रुवारी...
    VIEW MORE
    Test

    ॲग्रीस्टॅक: शेतकऱ्यांच्या डिजिटल ओळख, मुख्य आव्हाने, आणि सहभागी होण्याची प्रक्रिया

    ॲग्री स्टॅक (Agri Stack) एक डिजिटल पायाभूत सुविधा आहे जी...
    VIEW MORE
    Test

    पीएम-कुसुम योजना: कॉम्पोनंट-ए – संपूर्ण माहिती

    पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान (PM-KUSUM / पीएम-कुसुम...
    VIEW MORE
    • आमच्या बद्दल (About us)
    • गोपनीयता धोरण (Privacy Policy)
    • आमच्याशी संपर्क साधा (Contact us)
    A theme by Gradient Themes ©