बालमित्रांनो, परत एकदा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक भन्नाट, मजेशीर आणि थोडं गूढ असं जंगलातलं रहस्य! तुम्ही नक्कीच ऐकलं असेल ना – राजा-राणीच्या गोष्टी, परीकथा, चिऊ-काऊच्या धमाल कथा, आणि अर्थातच… भुतांच्या गोष्टी! पण, आज आपण ज्या झाडाची ओळख करून घेणार आहोत, ते खरंच “भुतासारखं” दिसतं! होय होय, हे काही भुताचे झाड नाही, पण ते […]
साप! साप! म्हटलं की सर्वांना भीती वाटायला लागते. कारण सर्वांना असं वाटतं की हा साप नक्कीच विषारी असणार आणि साप चावला तर इजा होईल. म्हणून बहुतेक सर्व लोक सापापासून चार हात लांब राहण्यास प्राधान्य देतात. सापांना सरपटणारा प्राणी म्हटलं जातं, म्हणजेच ते जमिनीवर किंवा झाडांवर सरकतात. तुम्ही “फ्लाइंग सिख” ऐकलं असेल, पण कधी “फ्लाइंग स्नेक […]
मित्रांनो, जसे आपण आपला वाढदिवस आनंदाने साजरा करतो, तसेच आपण ज्या पृथ्वीवर राहतो, तिच्या संरक्षणासाठी एक खास दिवस साजरा करायला नको का? हाच तो “जागतिक वसुंधरा दिन” (Earth Day) जो २२ एप्रिल रोजी साजरा केला जातो. वसुंधरा दिन साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे पर्यावरण संवर्धनासाठी जागरूकता निर्माण करणे, लोकांना पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रेरित करणे आणि पृथ्वीच्या […]
धरती, आकाश, पाताळ, स्वर्ग ह्या सगळ्या कल्पना आपल्याला माहिती आहेत, पण या पृथ्वीवर असणाऱ्या एका झाडाला स्वर्गाचे झाड म्हणून ओळखले जाते, हे तुम्हाला माहिती आहे का? कदाचित तुम्ही सर्वांनी हे झाड पहिले देखील असेल. अगदी आपल्या परिचयाचे, आपल्या परिसरात आढळणारे, कधीतरी ह्या झाडाला कडुलिंबाचेच झाड आहे असे समजून गोंधळात टाकणारे, उंचच उंच असा हा महावृक्ष! […]
“चिऊताई चिऊताई दार उघड!” “चिऊताई ये, दाणा खा, पाणी पी, भुर्रर उडून जा…” बालपणी आपण सर्वांनी हे गाणे ऐकले आणि आपल्या घराभोवती फडफडणाऱ्या चिमण्यांची गर्दी पाहतच मोठे झालो. पण आज हीच चिऊताई आपल्यापासून दूर होत चालली आहे. चिमण्यांची संख्या झपाट्याने घटत आहे आणि त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. जागतिक चिमणी दिन (World Sparrow Day) […]
वाघ, सिंह हे मोठे प्राणी तर सर्वांच्या चांगल्या परिचयाचे आहेत. पण थोडा पाऊस पडून गेल्यावर नदीकिनारी, किंवा एखाद्या डबक्यातून येणारा डराव, डराव हा आवाज ऐकला कि आपसूकच आपला कुतूहल जाग होत… हो ना हा तर आपल्या परीचयातला पिटुकला प्राणी म्हणजेच आपले बेडूकराव! लहानपणी गोष्टींच्या किंवा शाळांच्या पुस्तकात बेडकांची गोष्ट किंवा कविता ज्याने वाचली नाही असा […]
मुलं हि देवाघरची फुल असतात. अतिशय निरागस आणि गोंडस! पृथ्वीतलावर देखील असे अनेक सुंदर प्राणी, पशु-पक्षी यांच्या प्रजाती आहेत. पण त्यापैकीच एक तिशय वेगळी आणि सुंदर प्रजाती मुलांनो तुम्हाला माहिती आहे का? या पृथ्वीतलावर आणि विशेषतः भारतात तुमच्यासारखीच अगदी गोंडस दिसणारी एक प्रजाती आहे! कोणती आहे बरं ती प्रजाती? ही प्रजाती म्हणजेच डॉल्फिन्स! होय, डॉल्फिन […]
हळद या वनस्पतीचा वापर तिच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून भारतीय लोक स्वयंपाकात करतात. हळदीला आयुर्वेदामध्ये “हरिद्रा” म्हणतात. हळदीचा वापर खाद्यपदार्थाला पिवळा रंग व चव आणण्या व्यतिरीक्त धामिर्क कार्यामध्येही करतात. या रेसिपीचा वापर करून स्वादिष्ट ओल्या हळदीची चटणी कशी बनवायची जाणून घेऊया. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्त शुद्ध होते, त्वचेचा रंग उजळतो म्हणूनच मराठी मध्ये पी हळद आणि […]
पावसाळा म्हणजे रानभाज्यांचा ऋतू. सगळीकडे रानभाजी महोत्सव सुरु होतात. याच पावसाळ्यात हमखास उपलब्ध होणारी एक अत्यंत पौष्टिक अशी रानभाजी म्हणजेच करटोली. करटोली या वनस्पतीला ‘कारटोली’, ‘काटवल’, ‘कंटोळा’, ‘कंटोली’, ‘रानकारली’, ‘कर्कोटकी’, ‘करटुली़’ अशीही स्थानिक नावे आहेत. या रानभाजीचे शास्त्रीय नाव मोमॉर्डिका डायोइका (Momordica dioica) असे असून इंग्रजी भाषेत करटोलीला ‘वाइल्ड करेला फ्रूट’ (Wild Karela Fruit) असे […]
अनेक लोकांना स्वीट कॉर्न खायला आवडते. शहर असो वा गाव, बहुतेक लोकांना स्वीट कॉर्न कणीस खायला आवडते. लोक ते मोठ्या उत्साहाने खातात. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असल्या तरी, काही लोक ते भाजून खातात, तर काही लोक ते उकळवून किंवा वेगवेगळ्या स्नॅक्समध्ये मिसळून खातात. चला तर मग बनवूया स्वीट कॉर्न चे पकोडे! स्वीट कॉर्नमध्ये व्हिटॅमिन ए, बी, […]