Skip to content
  • Sat. May 10th, 2025
    • आमच्या बद्दल (About us)
    • गोपनीयता धोरण (Privacy Policy)
    • आमच्याशी संपर्क साधा (Contact us)
    agmarathi logo

    agmarathi.in

    शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनाविषयी अद्ययावत माहिती आणि बातम्या

    Home
    • मुख्य पृष्ठ
    • कृषि
    • पर्यावरण
    • ग्रामीण विकास
    • शाश्वत जीवन
    • अन्न आणि पोषण
      • पाककृती
    • सरकारी योजना
    • नोकऱ्या
    '
    agmarathi logo

    agmarathi.in

    शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनाविषयी अद्ययावत माहिती आणि बातम्या

    • मुख्य पृष्ठ
    • कृषि
    • पर्यावरण
    • ग्रामीण विकास
    • शाश्वत जीवन
    • अन्न आणि पोषण
      • पाककृती
    • सरकारी योजना
    • नोकऱ्या
    HomeFood and NutritionRecipesउपवास स्पेशल- कच्च्या केळीची भाजी
    कच्च्या केळीची भाजी
    कच्च्या केळीची भाजी
    Recipes

    उपवास स्पेशल- कच्च्या केळीची भाजी

    author
    By प्राची राजूरकर
    July 16, 2024July 26, 2024
    0 minutes, 9 seconds Read

    आपण खाण्यापिण्याच्या अनेक नियमांचे पालन करतो. आपल्या पूर्वजांनी सुद्धा आहाराचे अनेक नियम ठरवून दिले आहेत, त्याचाच एक भाग म्हणून आपण व्रतवैकल्य करताना सात्विक आहारावर भर देतो. आता सनासुदीचे व्रतवैकल्याचे दिवस आहेत आणि अशा दिवसात बरेच लोक उपवास (Fasting) करतात तर अशाच उपवासाकरिता आज आपण कच्च्या केळीची भाजी (Unripe Banana Curry) बनवणार आहोत.

    कच्च्या केळीची भाजी तुम्ही भगरीचा भात किवा साबुदाणा उसळ यासोबत सुद्धा खाऊ शकाल, आणि त्यासाठी लागणारे साहित्यही अगदी थोडेसेच! म्हणजेच थोडक्यात पण महत्वाची अशी हि आपली आजची रेसिपी आहे. आणि लगेच म्हणजे अगदी १० मिनिटात तयार होणारी हि सोप्पी रेसिपी आहे.

    केळी हे जगभरात खाल्ले जाणारे फळ आहे. मात्र, आपण जास्त करून पिवळ्या रंगाची केळीच खातो परंतू तुम्हाला हे माहिती आहे का की, हिरव्या रंगाची केळी देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हिरव्या केळीत फारच कमी कॅलरी असतात, केळीमध्ये फायबर्स आढळतात त्यामुळे ती आपल्या आरोग्यासाठी फार लाभदायक आहे.

    चला तर मग झटपट साहित्याकडे वळूया!

    बनविण्यासाठी लागणारे साहित्य (२ व्यक्तीसाठी) – कच्च्या केळीची भाजी

    1. कच्ची केळी (Raw or unripe banana ) -५ (केळी व्यवस्थित सोलून व बारीक कापून घ्यावी)
    2. तेल ( Cooking oil) -३ चमचे
    3. जिरे (Cumin seeds) -१/२ छोटा चमचा
    4. हिरवी मिरची (Green chilly) -४
    5. सैंधव मीठ (Rock salt ) -१/२ चमचा

    बनविण्याची विधी – कच्च्या केळीची भाजी

    • सर्वप्रथम शेगडी वर कढई चढवून कढईत तीन चमचे तेल घाला.
    • तेल गरम झाले कि त्यात जिरे घाला.
    • जिरे तडतडू लागले कि हिरव्या मिरच्या तोडून घाला.
    • त्यानंतर त्यात १/२ चमचा सैंधव मीठ घाला.
    • त्यात सोलून केलेली व बारीक कापलेली कच्ची केळी घाला.
    • मिश्रण व्यवस्थित परतून घ्या
    • कढई वर झाकण ठेवून ५ मिनिटे भाजी शिजू द्या
    • शेगडी बंद करून भाजी सर्व करा

    गरमागरम कच्च्या केळाची भाजी उपवासासाठी खायला तयार आहे.

    कच्च्या केळीची भाजी Unripe banana curry

    आवडत असल्यास भाजीला आणखी लज्जतदार बनविण्यासाठी त्यात शेंगदाने (peanut) चा कुट घालू शकता.

    कच्च्या केळीमध्ये पौष्टिक घटक मुबलक प्रमाणात असतात. यामध्ये कार्बोहायड्रेट्स (Carbohydrates) (मुख्यतः प्रतिरोधक स्टार्च), आहारातील तंतू (Dietary fiber), व्हिटॅमिन सी (Vitamin C) आणि व्हिटॅमिन बी 6 (Vitamin B6), तसेच पोटॅशियम (Potassium) आणि मॅग्नेशियम (Magnesium) सारखे खनिजे आहेत. हे घटक पचनासाठी उपयुक्त असतात, रक्तातील साखरेचे नियंत्रण करण्यास मदत करतात, वजन व्यवस्थापनात सहायक ठरतात, आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. आहारात कच्च्या केळीचा समावेश केल्याने आरोग्यासंबंधी अनेक फायदे मिळू शकतात.

    आरोग्य आणि पोषण सूचना: या वेबसाइटवरील आरोग्य आणि पोषण माहिती सामान्य माहिती देण्यासाठी आहे. प्रत्येकाची पोषण गरज वेगवेगळी असू शकते. वैयक्तिक आहार सल्ल्यासाठी आपल्या आरोग्यतज्ञाचा सल्ला घ्या. आम्ही दिलेल्या माहितीची अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ही माहिती वैद्यकीय सल्ला नाही.

    Share this:

    • Post
    • Click to share on Reddit (Opens in new window)Reddit
    • Click to share on Telegram (Opens in new window)Telegram
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)WhatsApp

    Related

    Tags: Unripe Banana उपवास उपवास स्पेशल उपवासाचा पदार्थ कच्च्या केळीची भाजी केळी पाककृती मराठी रेसिपीज
    author

    प्राची राजूरकर

    प्राची पर्यावरण शास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीधर असून त्यात संशोधन देखिल करीत आहे. याचबरोबर ती शिक्षणशास्त्रात पदवीधर असून कायद्याची देखील पदवीधर आहे. थोडक्यात सांगायचेच तर ती एक संशोधक, शिक्षण व कायदेतज्ञ आहे, आणि मुख्यत्वे ती वनीकरण क्षेत्रात निपुण असून एका जवाबदार पदावर कार्य करीत आहे. तिला विविध सरकारी योजनाबद्दलचे माहिती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवायला आवडते जे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी तसेच मोठ्या सामाजिक परीवर्तनासाठी फायदेशीर ठरेल.

    गावर शेंगाची भाजी
    Previous

    गवार शेंगाची शेंगदाणे टाकून चविष्ट भाजी

    गव्हाच्या पिठाचा केक_Wheat Flour Cake
    Next

    गव्हाच्या पिठाचा केक – छोट्यांसाठी मेजवानी आणि मोठ्यांसाठी स्वादाची पर्वणी

    Similar Posts

    मका पालक चे स्वादिष्ट आणि पौष्टिक धपाटे
    Recipes

    मका-पालकचे धपाटे: पौष्टिकता आणि चव यांची अनोखी मेजवानी

    author
    By प्राची राजूरकर
    July 7, 2024July 14, 2024
    साबुदाणा वडा_Sabudana Vada
    Recipes

    उपवास स्पेशल- साबुदाणा वडा

    author
    By प्राची राजूरकर
    July 26, 2024July 26, 2024

    Leave a ReplyCancel reply

    Subscribe via email!

    Subscribe to agmarathi newsletter

    Recent Posts

    • रात्रीचा सम्राट: घुबडाची अद्भुत कहाणी
    • मी आहे संपत्ती, समृद्धी आणि अढळ विश्वासाचे प्रतीक – मी आहे र्‍होडोडेंड्रॉन!
    • झिरो एनर्जी कूल चेंबर – फळे व भाजीपाला ताजे ठेवण्याचा कमी खर्चाचा उपाय
    • मी आहे बेस्ट आर्किटेक्ट! – सुगरण पक्ष्याचं अफलातून घरटे
    • वन्यप्राणी गणना बुद्ध पौर्णिमेलाच का करतात?
    • संत्रा बागेसाठी रोगमुक्त रोपे कोठे खरेदी करावी
    • कावळा आणि मुंग्यांचं नैसर्गिक हॉस्पिटल!
    • मेंढपाळाचा मुलगा ते UPSC अधिकारी : बिरदेव डोणे यांची जिद्दीची कहाणी
    • मातीचे गुणधर्म: शेतीसाठी माती किती उपयुक्त आहे हे कशावर ठरते?
    • देशी कोंबडी की देशी-टाईप? खरी ओळख, अंड्याची व मांसाची गुणवत्ता आणि बाजारातील फसवणूक उघड

    आम्हाला फॉलो करा

    • facebook
    • twitter
    • instagram
    • youtube
    Test

    प्रधानमंत्री सौरघऱ – मोफत वीज योजना: संपूर्ण माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया

    भारत सरकारने हरित उर्जेचा प्रचार आणि वीज बचतीसाठी १३ फेब्रुवारी...
    VIEW MORE
    Test

    ॲग्रीस्टॅक: शेतकऱ्यांच्या डिजिटल ओळख, मुख्य आव्हाने, आणि सहभागी होण्याची प्रक्रिया

    ॲग्री स्टॅक (Agri Stack) एक डिजिटल पायाभूत सुविधा आहे जी...
    VIEW MORE
    Test

    पीएम-कुसुम योजना: कॉम्पोनंट-ए – संपूर्ण माहिती

    पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान (PM-KUSUM / पीएम-कुसुम...
    VIEW MORE
    • आमच्या बद्दल (About us)
    • गोपनीयता धोरण (Privacy Policy)
    • आमच्याशी संपर्क साधा (Contact us)
    A theme by Gradient Themes ©