Recipes

उपवास स्पेशल-  कच्च्या केळीची भाजी

आपण खाण्यापिण्याच्या अनेक नियमांचे पालन करतो. आपल्या पूर्वजांनी सुद्धा आहाराचे अनेक नियम ठरवून दिले आहेत, त्याचाच एक भाग म्हणून आपण व्रतवैकल्य करताना सात्विक आहारावर भर देतो. आता सनासुदीचे  व्रतवैकल्याचे दिवस आहेत आणि अशा दिवसात बरेच लोक उपवास (Fasting) करतात तर अशाच उपवासाकरिता आज आपण कच्च्या केळीची भाजी (Unripe Banana Curry) बनवणार आहोत.

कच्च्या केळीची भाजी तुम्ही भगरीचा भात किवा साबुदाणा उसळ यासोबत सुद्धा खाऊ शकाल, आणि त्यासाठी लागणारे साहित्यही अगदी थोडेसेच! म्हणजेच थोडक्यात पण महत्वाची अशी हि आपली आजची रेसिपी आहे. आणि लगेच म्हणजे अगदी १० मिनिटात तयार होणारी हि सोप्पी रेसिपी आहे.

केळी हे जगभरात खाल्ले जाणारे फळ आहे. मात्र, आपण जास्त करून पिवळ्या रंगाची केळीच खातो परंतू तुम्हाला हे माहिती आहे का की, हिरव्या रंगाची केळी देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हिरव्या केळीत फारच कमी कॅलरी असतात, केळीमध्ये फायबर्स आढळतात त्यामुळे ती आपल्या आरोग्यासाठी फार लाभदायक आहे.

चला तर मग झटपट साहित्याकडे वळूया!

बनविण्यासाठी लागणारे साहित्य (२ व्यक्तीसाठी) – कच्च्या केळीची भाजी

  1. कच्ची केळी (Raw or unripe banana ) -५ (केळी व्यवस्थित सोलून व बारीक कापून घ्यावी)
  2. तेल ( Cooking oil)  -३ चमचे
  3. जिरे (Cumin seeds) -१/२ छोटा चमचा
  4. हिरवी मिरची (Green chilly) -४
  5. सैंधव मीठ (Rock salt )  -१/२ चमचा

बनविण्याची विधी – कच्च्या केळीची भाजी

  • सर्वप्रथम शेगडी वर कढई चढवून कढईत तीन चमचे तेल घाला.
  • तेल गरम झाले कि त्यात जिरे घाला.
  • जिरे तडतडू लागले कि हिरव्या मिरच्या तोडून घाला.
  • त्यानंतर त्यात १/२ चमचा सैंधव मीठ घाला.
  • त्यात सोलून  केलेली व बारीक कापलेली कच्ची केळी घाला.
  • मिश्रण व्यवस्थित परतून घ्या
  • कढई वर झाकण ठेवून ५ मिनिटे भाजी शिजू द्या
  • शेगडी बंद करून भाजी सर्व करा

गरमागरम कच्च्या केळाची भाजी उपवासासाठी खायला  तयार आहे.

आवडत असल्यास भाजीला आणखी लज्जतदार बनविण्यासाठी त्यात शेंगदाने (peanut) चा कुट घालू शकता.

कच्च्या केळीमध्ये पौष्टिक घटक मुबलक प्रमाणात असतात. यामध्ये कार्बोहायड्रेट्स (Carbohydrates) (मुख्यतः प्रतिरोधक स्टार्च), आहारातील तंतू (Dietary fiber), व्हिटॅमिन सी (Vitamin C) आणि व्हिटॅमिन बी 6 (Vitamin B6), तसेच पोटॅशियम (Potassium) आणि मॅग्नेशियम (Magnesium) सारखे खनिजे आहेत. हे घटक पचनासाठी उपयुक्त असतात, रक्तातील साखरेचे नियंत्रण करण्यास मदत करतात, वजन व्यवस्थापनात सहायक ठरतात, आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. आहारात कच्च्या केळीचा समावेश केल्याने आरोग्यासंबंधी अनेक फायदे मिळू शकतात.

आरोग्य आणि पोषण सूचना: या वेबसाइटवरील आरोग्य आणि पोषण माहिती सामान्य माहिती देण्यासाठी आहे. प्रत्येकाची पोषण गरज वेगवेगळी असू शकते. वैयक्तिक आहार सल्ल्यासाठी आपल्या आरोग्यतज्ञाचा सल्ला घ्या. आम्ही दिलेल्या माहितीची अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ही माहिती वैद्यकीय सल्ला नाही.

प्राची राजूरकर

प्राची पर्यावरण शास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीधर असून त्यात संशोधन देखिल करीत आहे. याचबरोबर ती शिक्षणशास्त्रात पदवीधर असून कायद्याची देखील पदवीधर आहे. थोडक्यात सांगायचेच तर ती एक संशोधक, शिक्षण व कायदेतज्ञ आहे, आणि मुख्यत्वे ती वनीकरण क्षेत्रात निपुण असून एका जवाबदार पदावर कार्य करीत आहे. तिला विविध सरकारी योजनाबद्दलचे माहिती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवायला आवडते जे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी तसेच मोठ्या सामाजिक परीवर्तनासाठी फायदेशीर ठरेल.

Share

Recent Posts

ओल्या हळदीची चटणी – चटपटीत आणिआरोग्यदायी

हळद या वनस्पतीचा वापर तिच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून भारतीय लोक स्वयंपाकात करतात. हळदीला आयुर्वेदामध्ये "हरिद्रा" म्हणतात. हळदीचा वापर… Read More

4 months ago

करटोली ची भाजी – आरोग्याचा खजिना

पावसाळा म्हणजे रानभाज्यांचा ऋतू. सगळीकडे रानभाजी महोत्सव सुरु होतात. याच पावसाळ्यात हमखास उपलब्ध  होणारी एक अत्यंत पौष्टिक अशी रानभाजी म्हणजेच… Read More

4 months ago

स्वीट कॉर्न चे स्वादिष्ट आणि पौष्टिक असे पकोडे

अनेक लोकांना स्वीट कॉर्न खायला आवडते. शहर असो वा गाव, बहुतेक लोकांना स्वीट कॉर्न कणीस खायला आवडते. लोक ते मोठ्या… Read More

4 months ago

This website uses cookies.