फोडणीची अक्खी मसूर
मसूर डाळ (Red Lentils/ Masoor Dal) ज्याला लाल मसूर म्हणूनही ओळखले जाते, भारतीय पाककृतीमध्ये त्याच्या अफाट पौष्टिक मूल्यांमुळे आणि उपचारात्मक फायद्यांमुळे खूप लोकप्रिय आहे. एक वाटी मसूर डाळ आपल्या दैनंदिन महत्त्वाच्या पोषक तत्वांची गरज भागवण्यासाठी पुरेशी आहे. झटपट शिजणारी आणि गोडसर चवीची मसूर डाळ ही प्रथिनांनी (Protein) भरपूर आणि लोह (Iron), तांबे (Copper), मॅग्नेशियम (Magnesium) , आणि फॉलेटसारख्या (Folate,) आवश्यक पोषक घटकांनी समृद्ध आहे. तर अशा या पौष्टीक्तेत भर घालणाऱ्या मसूर डाळीचा पदार्थ आपण बनवणार आहोत.
फोडणीची अक्खी मसूर म्हणजेच मसूर डाळीला फोडणी घालून बनवलेला पदार्थ, यालाच पंजाब प्रांतात दाल मखनी (Dal Makhani) म्हणून सुद्धा ओळखले जाते, परंतु दाल मखनी मध्ये मसूर डाळीच्या सोबत इतर काही डाळीचा सुद्धा वापर करतात, पण आज आपण केवळ अक्खी मसूर वापरून हि रेसिपी (Masoor Dal Recipe) बनवणार आहोत. अगदी आपल्या खास महाराष्ट्रीयन पद्धतीने! आणि तेही फक्त २०-२५ मिनिटांमध्ये!
चला तर मग सुरु करूयात !
अशी हि चवदार फोडणीची अक्खी मसूर तयार आहे.हि गरमागरम अक्खी मसूर चपाती, भाकरी किवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता.
भारतातील विविध राज्यांमध्ये लाल मसूरची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते, विशेषतः उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आणि बिहारमध्ये. भारतीय पाककृतींमध्ये लाल मसूरचा वापर विविध प्रकारच्या डिशेसमध्ये केला जातो, ज्यामुळे ही डाळ भारतीय आहारात महत्त्वपूर्ण स्थान मिळवते.
फोडणीची अक्खी मसूर अतिशय पौष्टिक असून याद्वारा तुम्हाला ॲनिमिया विरुद्ध लढण्यात, वजन कमी होण्यास, पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत होते. मसूर रक्तातील लाल रक्तपेशींची संख्या वाढवते, जी अशक्तपणा टाळण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे. हि डाळ खाल्ल्याने त्वचेवर चमक येते. यातील प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्सच्या उपस्थितीमुळे केस मजबूत केस गळणे कमी होईल.
मसूरची ही रेसिपी चविष्ट असून बनवायला सोपी आहे, आणि फक्त २०-२५ मिनिटांत तयार होते. ती ग्लूटन-फ्री असण्यामुळे ही आरोग्यदायी पर्याय आहे. अशा प्रकारे, फोडणीची अक्खी मसूर ही पौष्टिक आणि स्वादिष्ट डिश आपल्या मेनूमध्ये समाविष्ट करायला हवी.
आरोग्य आणि पोषण सूचना: या वेबसाइटवरील आरोग्य आणि पोषण माहिती सामान्य माहिती देण्यासाठी आहे. प्रत्येकाची पोषण गरज वेगवेगळी असू शकते. वैयक्तिक आहार सल्ल्यासाठी आपल्या आरोग्यतज्ञाचा सल्ला घ्या. आम्ही दिलेल्या माहितीची अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ही माहिती वैद्यकीय सल्ला नाही.
उन्हाळ्यात थंड शीतपेयाची बाटली उघडणे आपल्यासाठी सामान्य गोष्ट आहे. लग्नसमारंभ, वाढदिवस, हॉटेल, चित्रपटगृह किंवा प्रवास; शीतपेये सहज उपलब्ध असतात. पण… Read More
भारताच्या ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची परिस्थिती जवळजवळ सारखीच असते. घरात शेती, पावसावर अवलंबून उत्पन्न, आणि शिक्षण म्हणजे आयुष्य बदलण्याची एकमेव… Read More
आजच्या जागतिक घडामोडींमुळे इराण पुन्हा चर्चेत आहे. अर्थव्यवस्था, ऊर्जा संसाधने आणि भू-राजकारण या विषयांबरोबरच इराणच्या शेतीबद्दलही उत्सुकता वाढली आहे. पहिल्या… Read More