ओल्या हळदीची चटणी
हळद या वनस्पतीचा वापर तिच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून भारतीय लोक स्वयंपाकात करतात. हळदीला आयुर्वेदामध्ये “हरिद्रा” म्हणतात. हळदीचा वापर खाद्यपदार्थाला पिवळा रंग व चव आणण्या व्यतिरीक्त धामिर्क कार्यामध्येही करतात. या रेसिपीचा वापर करून स्वादिष्ट ओल्या हळदीची चटणी कशी बनवायची जाणून घेऊया.
हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्त शुद्ध होते, त्वचेचा रंग उजळतो म्हणूनच मराठी मध्ये पी हळद आणि हो गोरी अशी म्हण देखील पडली आहे,हळद ही जंतुनाशक आहे. अशी हि बहुगुणी हळद ही वनस्पती बारमाही आहे त्यामुळे आपल्या परसदारात किवा एखाद्या कुंडीत किंवा अगदी मोठ्या प्रमाणात शेतजमिनीवर लागवड करून तुम्ही हळदीचे उत्पादन घेऊ शकता. किवा बाजारात तर ओल्या हळदीचे कंद विकायला असतातच, तर अशाच या बहुगुणी ओल्या हळदीची चटणी आपण बनवणार आहोत आज.
या चटणी मुळे जेवणाची रंगत तर वाढेलच याचबरोबर आरोग्यदायी फायदे पण मिळतील, आणि तेही छोट्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच! तर बनवूया मग आज हि ओल्या हळदीची चटणी. अगदी १० मिनिटात तयार होणारी.
जेवणात किंवा नाश्त्याच्या पदार्था बरोबर खायला अगदी उत्तम !
हळद चुर्ण गरम पाण्याबरोबर घेतल्याने ह्रदविकार, मधुमेह, कर्करोग, मेंदुचे विकार होण्यापासुन प्रतिबंध होतो. पचनक्रिया सुधारते. त्याच प्रमाणे दुधामध्ये हळद टाकून घेतल्या नंतर रोगप्रतिकार शक्ती वाढते. जखम झाल्यास त्यावर हळद लावली असता रक्तस्त्राव बंद होतो. हळकुंड पासून हळद तयार होते. हळदीने अंग चोळल्याने अंगावरील मळ, मृत त्वचा निघून जाते व वर्ण उजळतो. हिंदू संस्कुतीत लग्नाच्या वेळी वर, वधूला हळद लावतात. हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते.
भारत हा हळदीचा जगातील सर्वात मोठा उत्पादक, ग्राहक आणि निर्यातदार देश आहे. सन २०२२-२३ मध्ये भारतात ३.२४ लाख हेक्टर क्षेत्र हळद लागवडीखाली होते आणि ११.६१ लाख टन (जागतिक हळद उत्पादनाच्या ७५% पेक्षा जास्त) उत्पादन होते. भारतात हळदीच्या ३० हून अधिक जाती पिकवल्या जातात आणि देशातील २० हून अधिक राज्यांमध्ये त्याची लागवड केली जाते. महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू ही हळदीचे सर्वाधिक उत्पादन करणारी राज्ये आहेत.
"Income Tax", "ITR", "ITR Filing", "ITR Filing Deadline" - जुलै महिना आला की हे शब्द गुगल वर सर्वाधिक शोधले जातात.… Read More
भारतातील अग्रगण्य IT सेवा कंपनी TCS (Tata Consultancy Services) ने अलीकडे 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची घोषणा केली. ही घटना… Read More
आज आरोग्य आणि पोषण या विषयांमध्ये लोकांचा रस झपाट्याने वाढत आहे. या प्रवाहात “व्हे प्रोटीन”/ (Whey Protein) हा शब्द अनेकदा… Read More