ओल्या हळदीची चटणी_Turmeric Root Chutney
ओल्या हळदीची चटणी

ओल्या हळदीची चटणी – चटपटीत आणिआरोग्यदायी

हळद या वनस्पतीचा वापर तिच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून भारतीय लोक स्वयंपाकात करतात. हळदीला आयुर्वेदामध्ये “हरिद्रा” म्हणतात. हळदीचा वापर खाद्यपदार्थाला पिवळा रंग व चव आणण्या व्यतिरीक्त धामिर्क कार्यामध्येही करतात. या रेसिपीचा वापर करून स्वादिष्ट ओल्या हळदीची चटणी कशी बनवायची जाणून घेऊया.

हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो म्हणूनच मराठी मध्ये पी हळद आणि हो गोरी अशी म्हण देखील पडली आहे,हळद  ही जंतुनाशक आहे. अशी हि बहुगुणी हळद ही वनस्पती बारमाही आहे त्यामुळे आपल्या परसदारात किवा एखाद्या कुंडीत किंवा अगदी मोठ्या प्रमाणात शेतजमिनीवर लागवड करून तुम्ही हळदीचे उत्पादन घेऊ शकता. किवा बाजारात तर ओल्या हळदीचे कंद विकायला असतातच, तर अशाच या बहुगुणी ओल्या हळदीची चटणी आपण बनवणार आहोत आज.

या  चटणी मुळे जेवणाची रंगत तर वाढेलच याचबरोबर आरोग्यदायी फायदे पण मिळतील, आणि तेही छोट्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच! तर बनवूया मग आज हि ओल्या हळदीची चटणी.  अगदी १० मिनिटात तयार होणारी.

बनविण्यासाठी लागणारे साहित्य – ओल्या हळदीच्या चटणी

  1. ओली हळद (कंद) (raw turmeric / turmeric root / unprocessed rhizome of the turmeric plant) -२०० ग्राम
  2. लिंबू (lemon) -४
  3. मीठ(salt)  -१ १/२ चमचा
  4. हिरवी मिरची(green chilly)  -४ते५
  5. जिरे (cumin seeds) -१ चमचा
  6. मोहरी(mustard seeds)  -१ चमचा
  7. तेल (edible oil) -१ चमचा

बनविण्याची विधी- ओल्या हळदीची चटणी  

  • सर्वप्रथम ओली हळद ( हि आले (ginger) सारखी दिसते ) स्वच्छ धुवून व सोलून घ्यावी.
  • त्यानंतर तिचे छोटे छोटे काप करून हे काप मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यावे.
  • त्यानंतर जाडसर वाटलेली हळद एका पातेल्यात काढून घ्यावी.
  • आता एका कढईत १ चमचा तेल घालून गरम करावे.
  • गरम झालेल्या तेलत बारीक कापलेली मिरची जिरे मोहरी घालून तडतडू द्यावी व gas बंद करावा.
  • आता त्या तेलात जाडसर वाटून घेतलेली हळद घालून मिश्रण निट परतवून घ्यावे
  • त्यानंतर त्या मिश्रणात मीठ घालून वरून लिंबाचा रस पिळावा व निट एकत्र करून घ्यावे.
  • आपली चटपटीत ओल्या हळदीची चटणी तयार आहे.

जेवणात किंवा नाश्त्याच्या पदार्था बरोबर खायला अगदी उत्तम !

हळद चुर्ण  गरम पाण्याबरोबर घेतल्याने ह्रदविकार, मधुमेह, कर्करोग, मेंदुचे विकार होण्यापासुन प्रतिबंध होतो. पचनक्रिया सुधारते. त्याच प्रमाणे दुधामध्ये हळद टाकून घेतल्या नंतर रोगप्रतिकार शक्ती वाढते. जखम झाल्यास त्यावर हळद लावली असता रक्तस्त्राव बंद होतो. हळकुंड पासून हळद तयार होते. हळदीने अंग चोळल्याने अंगावरील मळ, मृत त्वचा निघून जाते व वर्ण उजळतो. हिंदू संस्कुतीत लग्नाच्या वेळी वर, वधूला हळद लावतात. हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते.

भारत हा हळदीचा जगातील सर्वात मोठा उत्पादक, ग्राहक आणि निर्यातदार देश आहे. सन २०२२-२३ मध्ये भारतात ३.२४ लाख हेक्टर क्षेत्र हळद लागवडीखाली होते आणि ११.६१ लाख टन (जागतिक हळद उत्पादनाच्या ७५% पेक्षा जास्त) उत्पादन होते. भारतात हळदीच्या ३० हून अधिक जाती पिकवल्या जातात आणि देशातील २० हून अधिक राज्यांमध्ये त्याची लागवड केली जाते. महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू ही हळदीचे सर्वाधिक उत्पादन करणारी राज्ये आहेत.

author

प्राची राजूरकर

प्राची पर्यावरण शास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीधर असून त्यात संशोधन देखिल करीत आहे. याचबरोबर ती शिक्षणशास्त्रात पदवीधर असून कायद्याची देखील पदवीधर आहे. थोडक्यात सांगायचेच तर ती एक संशोधक, शिक्षण व कायदेतज्ञ आहे, आणि मुख्यत्वे ती वनीकरण क्षेत्रात निपुण असून एका जवाबदार पदावर कार्य करीत आहे. तिला विविध सरकारी योजनाबद्दलचे माहिती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवायला आवडते जे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी तसेच मोठ्या सामाजिक परीवर्तनासाठी फायदेशीर ठरेल.

Similar Posts

Leave a Reply