आजचा शेतकरी मोठ्या संकटातून जातोय. रासायनिक खतं, कीटकनाशके, पाणी-वीज यांचा खर्च दिवसेंदिवस वाढतोय; पण पिकांचे भाव मात्र जागच्या जागीच आहेत. मातीची सुपीकता घटतेय, पावसाचा अंदाज चुकतोय, कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी. या सगळ्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न अस्थिर झाले आहे. याशिवाय, रसायनांनी पिकवलेल्या अन्नामध्ये अवशेष राहतात. तो अन्नधान्य व भाजीपाला ग्राहकांपर्यंत पोहोचतो आणि दीर्घकाळात मधुमेह, हृदयविकार, कर्करोग […]