करटोली ची भाजी – आरोग्याचा खजिना

पावसाळा म्हणजे रानभाज्यांचा ऋतू. सगळीकडे रानभाजी महोत्सव सुरु होतात. याच पावसाळ्यात हमखास उपलब्ध  होणारी एक अत्यंत पौष्टिक अशी रानभाजी म्हणजेच करटोली. करटोली या वनस्पतीला ‘कारटोली’, ‘काटवल’, ‘कंटोळा’, ‘कंटोली’, ‘रानकारली’, ‘कर्कोटकी’, ‘करटुली़’ अशीही स्थानिक नावे आहेत. या रानभाजीचे शास्त्रीय नाव मोमॉर्डिका डायोइका (Momordica dioica) असे असून इंग्रजी भाषेत करटोलीला ‘वाइल्ड करेला फ्रूट’ (Wild Karela Fruit) असे […]