तिखट शेवया
जुन्या काळात किंबहुना आजही उन्हाळ्याची चाहूल लागली कि घराघरात आपल्या आज्या, आई ,मावशी सुरु करतात शेवया तयार करण्याची लगबग! मग ते शेवयाचे ओले गहू दळून आणून त्याचं स्वच्छ पांढरया सपिठाच्या बनवलेल्या पांढरयाशुभ्र शेवया! खरंच या शेवयांची रंगतच काही न्यारी आहे! आणि शेवया हा तर आपला महाराष्ट्राचा, हक्काचा पारंपारिक पदार्थ! चला तर मग बनवूया स्वादिष्ट तिखट शेवया.
पण आजकाल या आधुनिक युगात मुलांना भूक लागली की सर्रास 2 मिनिट इंस्टंट नूडल्स देण्याची जणू प्रथाच पडली आहे. मुलांच्या माता सुद्धा त्यांचा हा हट्ट पुरवतात कारण इंस्टंट नूडल्स फक्त 2 मिनिटांत बनते ना! पण मंडळी खरंच पॅकेज्ड फूड (Packaged food) ही मुलांच्या आरोग्यासाठी चांगली आहे का? तर त्याचे उत्तर आहे नाही. जर तुमची मुले अति प्रमाणात इंस्टंट नूडल्स सारख्या मैद्याच्या पदार्थांचे सेवन करत असतील तर तुम्ही वेळीच त्याला आवर घातला पाहिजे. कारण इंस्टंट नूडल्स मध्ये जरी काही पोषक तत्वे आहेत असे सांगण्यात येत असले तरी ती पोषक तत्वे मुलांच्या आरोग्यासाठी योग्य नाहीत. शिवाय हा एक पाकीटबंद पदार्थ असून असे पदार्थ मुलांनी जास्त प्रमाणात खाणे हानिकारक ठरू शकते.
आता अनेक पालकांना असाही प्रश्न पडतो कि इंस्टंट नूडल्स नाही तर मग दुसरे काय? तर त्याचे उत्तर दडलंय आपल्या आजच्या या पदार्थात ! इंस्टंट नूडल्स ला पर्याय म्हणून झटपट अगदी १० मिनिटात तयार होणार्या आणि पौष्टीक्तेने परिपूर्ण अशा या तिखट शेवया आज आपण बनवूया!
या शेवया पौष्टिक, पचायला हलक्या आणि झटपट तयार होणाऱ्या सकाळच्या नाष्ट्याला अगदी उत्तम पर्याय आहे. याशिवाय डब्ब्यात, मधल्या सुट्टीत खायला सुद्धा देता येईल.
या शेवयांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्बोदके असतात जी शरीराला उर्जा देण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. शेवया बनवताना तुम्ही त्यात विविध प्रकारच्या भाज्या टाकू शकता. यामुळे त्यातील व्हिटॅमिन आणि प्रोटीन वाढते. याचा फायदा मानसिक आणि शारीरिक दोन्ही वाढीसाठी होतो. तुम्ही शेवयात तूप सुद्धा मिसळून मुलाला देऊ शकता. यामुळे त्याच्या विकासासाठी गरजेचे असणारे मेद त्याला त्यातून मिळेल. वर कृतीमध्ये सांगितलेल्या भाज्या शेवयांमध्ये तुम्ही टाकल्या तर त्यातून मुलाच्या त्वचेला फायदा होईल. वरील कृतीमध्ये आम्ही शक्य तितक्या पौष्टिक भाज्यांचा समावेश केला आहे यामुळे मुलाचे वजन वाढण्याचा धोका सुद्धा उद्भवणार नाही.
चला तर मग आजच बनवूया मग आपल्या बच्चेकंपनी साठी तिखट शेवया !
आरोग्य आणि पोषण सूचना: या वेबसाइटवरील आरोग्य आणि पोषण माहिती सामान्य माहिती देण्यासाठी आहे. प्रत्येकाची पोषण गरज वेगवेगळी असू शकते. वैयक्तिक आहार सल्ल्यासाठी आपल्या आरोग्यतज्ञाचा सल्ला घ्या. आम्ही दिलेल्या माहितीची अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ही माहिती वैद्यकीय सल्ला नाही.
मे महिना सुरू झाला की पावसाळ्यापूर्वीचं दमट वातावरण जाणवायला लागतं आणि त्याच वेळी एक अद्भुत निसर्गनाट्य घडू लागतं. संध्याकाळी झाडांवर… Read More
ग्वार/ गवार (Cluster Beans / Cyamopsis tetragonoloba) हे खरं तर एक साधंसं पीक वाटतं, ग्रामीण भागात सहजपणे घेतलं जातं. पण… Read More
भारताने पेट्रोलमध्ये इथेनॉलचे (Ethanol) 20% मिश्रण (E20) 2030 च्या उद्दिष्टापेक्षा पाच वर्ष आधी, म्हणजे 2025 मध्ये पूर्ण केलं आहे. पण… Read More