Skip to content
  • Sat. May 10th, 2025
    • आमच्या बद्दल (About us)
    • गोपनीयता धोरण (Privacy Policy)
    • आमच्याशी संपर्क साधा (Contact us)
    agmarathi logo

    agmarathi.in

    शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनाविषयी अद्ययावत माहिती आणि बातम्या

    Home
    • मुख्य पृष्ठ
    • कृषि
    • पर्यावरण
    • ग्रामीण विकास
    • शाश्वत जीवन
    • अन्न आणि पोषण
      • पाककृती
    • सरकारी योजना
    • नोकऱ्या
    '
    agmarathi logo

    agmarathi.in

    शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनाविषयी अद्ययावत माहिती आणि बातम्या

    • मुख्य पृष्ठ
    • कृषि
    • पर्यावरण
    • ग्रामीण विकास
    • शाश्वत जीवन
    • अन्न आणि पोषण
      • पाककृती
    • सरकारी योजना
    • नोकऱ्या
    HomeFood and NutritionRecipesफोडणीची अक्खी मसूर: पौष्टिकता आणि स्वादाचा एकत्रित आनंद
    Masoor Dal Recipe
    फोडणीची अक्खी मसूर
    Recipes

    फोडणीची अक्खी मसूर: पौष्टिकता आणि स्वादाचा एकत्रित आनंद

    author
    By प्राची राजूरकर
    July 14, 2024July 14, 2024
    0 minutes, 16 seconds Read

    मसूर डाळ (Red Lentils/ Masoor Dal) ज्याला लाल मसूर म्हणूनही ओळखले जाते, भारतीय पाककृतीमध्ये त्याच्या अफाट पौष्टिक मूल्यांमुळे आणि उपचारात्मक फायद्यांमुळे खूप लोकप्रिय आहे. एक वाटी मसूर डाळ आपल्या दैनंदिन महत्त्वाच्या पोषक तत्वांची गरज भागवण्यासाठी पुरेशी आहे. झटपट शिजणारी आणि गोडसर चवीची मसूर डाळ ही प्रथिनांनी (Protein) भरपूर आणि लोह (Iron), तांबे (Copper), मॅग्नेशियम (Magnesium) , आणि फॉलेटसारख्या (Folate,) आवश्यक पोषक घटकांनी समृद्ध आहे. तर अशा या पौष्टीक्तेत भर घालणाऱ्या मसूर डाळीचा पदार्थ आपण बनवणार आहोत.

    फोडणीची अक्खी मसूर म्हणजेच मसूर डाळीला फोडणी घालून बनवलेला पदार्थ, यालाच पंजाब प्रांतात दाल मखनी (Dal Makhani) म्हणून सुद्धा ओळखले जाते, परंतु दाल मखनी मध्ये मसूर डाळीच्या सोबत इतर काही डाळीचा सुद्धा वापर करतात, पण आज आपण केवळ अक्खी मसूर वापरून हि रेसिपी (Masoor Dal Recipe) बनवणार आहोत. अगदी आपल्या खास महाराष्ट्रीयन पद्धतीने! आणि तेही फक्त २०-२५ मिनिटांमध्ये!

    चला तर मग सुरु करूयात !

    बनवण्यास लागणारे साहित्य (२ व्यक्तींसाठी)-फोडणीची अक्खी मसूर

    • अक्खी मसूर(Red Lentils) -१ मोठी वाटी
    • कांदा (onion) -१ बारीक कापलेला
    • टमाटर (Tomato)-१ बारीक कापलेला
    • हिरवी मिरची(green chilly) -२ बारीक कापलेली
    • कोशिंबीर (coriander)-३-४ काड्या बारीक कापलेली
    • लसून(garlic) – ४-५ पाकळ्या बारीक कापलेला
    • लाल तिखट (Red chili powder) -१ टेबलस्पून
    • मीठ (Salt)- १/२ टेबलस्पून
    • हळद (Turmeric powder)- चिमुटभर
    • तेल(oil) -गरजेप्रमाणे

    बनविण्याची विधी- फोडणीची अक्खी मसूर

    • सर्वप्रथम १ वाटी मसूर मध्ये दोन वाट्या पाणी घालून १० मिनिटे भिजत ठेवा.
    • १० मिनिटांनी भिजलेली मसूर पाण्यातून काढून चाळणीत निथळत ठेवा,
    • त्यानंतर प्रेशर कुकर gas वर चढवा
    • कुकर गरम झाला कि त्यात तीन चमचे तेल घालून तेल गरम होऊ द्या
    • तेल गरम झाल्यावर त्यात जिरे मोहरी टाकून तडतडू द्या.
    • त्यानंतर वरील साहित्य जसे कि बारीक कापलेले कांदा,टोमाटो,कोशिंबीर,लसून सर्व साहित्य कुकरमध्ये घालून २ मिनिट तेलात शिजू द्या.
    • त्यानंतर १ चमचा तिखट आणि १/२ चमचा मीठ व चिमुटभर हळद घालून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मंद आचेवर शिजवा.
    • मिश्रणाला तेल सुटू लागले कि त्यात निथळत ठेवलेली अक्खी मसूर टाका.
    • सर्व मिश्रण चमच्याने व्यवस्थित परतवून घ्या.
    • त्यात १/२ ग्लास पाणी घाला.
    • त्यानंतर कुकरचे झाकण लावून १ शिट्टी होऊ द्या’
    • कुकर थंड झाल्यावर झाकण उघडा.
    • अधिक चवीसाठी वरून थोडासा तूप किवा बटर घाला.

    अशी हि चवदार फोडणीची अक्खी मसूर तयार आहे.हि गरमागरम अक्खी मसूर चपाती, भाकरी किवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता.

    Masoor Dal Recipe

    भारतातील विविध राज्यांमध्ये लाल मसूरची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते, विशेषतः उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आणि बिहारमध्ये. भारतीय पाककृतींमध्ये लाल मसूरचा वापर विविध प्रकारच्या डिशेसमध्ये केला जातो, ज्यामुळे ही डाळ भारतीय आहारात महत्त्वपूर्ण स्थान मिळवते.

    फोडणीची अक्खी मसूर अतिशय पौष्टिक असून याद्वारा तुम्हाला ॲनिमिया विरुद्ध लढण्यात, वजन कमी होण्यास, पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत होते. मसूर रक्तातील लाल रक्तपेशींची संख्या वाढवते, जी अशक्तपणा टाळण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे. हि डाळ खाल्ल्याने त्वचेवर चमक येते. यातील प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्सच्या उपस्थितीमुळे केस मजबूत केस गळणे कमी होईल.

    मसूरची ही रेसिपी चविष्ट असून बनवायला सोपी आहे, आणि फक्त २०-२५ मिनिटांत तयार होते. ती ग्लूटन-फ्री असण्यामुळे ही आरोग्यदायी पर्याय आहे. अशा प्रकारे, फोडणीची अक्खी मसूर ही पौष्टिक आणि स्वादिष्ट डिश आपल्या मेनूमध्ये समाविष्ट करायला हवी.

    आरोग्य आणि पोषण सूचना: या वेबसाइटवरील आरोग्य आणि पोषण माहिती सामान्य माहिती देण्यासाठी आहे. प्रत्येकाची पोषण गरज वेगवेगळी असू शकते. वैयक्तिक आहार सल्ल्यासाठी आपल्या आरोग्यतज्ञाचा सल्ला घ्या. आम्ही दिलेल्या माहितीची अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ही माहिती वैद्यकीय सल्ला नाही.

    Share this:

    • Post
    • Click to share on Reddit (Opens in new window)Reddit
    • Click to share on Telegram (Opens in new window)Telegram
    • Click to share on WhatsApp (Opens in new window)WhatsApp

    Related

    Tags: Dal Masoor Dal Recipe Recipes Red Lentil पाककृती मराठी रेसिपीज मसूर डाळ लाल मसूर
    author

    प्राची राजूरकर

    प्राची पर्यावरण शास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीधर असून त्यात संशोधन देखिल करीत आहे. याचबरोबर ती शिक्षणशास्त्रात पदवीधर असून कायद्याची देखील पदवीधर आहे. थोडक्यात सांगायचेच तर ती एक संशोधक, शिक्षण व कायदेतज्ञ आहे, आणि मुख्यत्वे ती वनीकरण क्षेत्रात निपुण असून एका जवाबदार पदावर कार्य करीत आहे. तिला विविध सरकारी योजनाबद्दलचे माहिती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवायला आवडते जे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी तसेच मोठ्या सामाजिक परीवर्तनासाठी फायदेशीर ठरेल.

    lettuce
    Previous

    सेंद्रिय शेतीतील आव्हाने आणि संधी, आणि या आव्हानांचा सामना करण्याचे मार्ग

    गावर शेंगाची भाजी
    Next

    गवार शेंगाची शेंगदाणे टाकून चविष्ट भाजी

    Similar Posts

    तिखट शेवया - Spicy Indian noodles
    Recipes

    तिखट शेवया – आजीचे स्वादिष्ट नूडल्स

    author
    By प्राची राजूरकर
    July 26, 2024July 26, 2024
    कच्च्या केळीची भाजी
    Recipes

    उपवास स्पेशल- कच्च्या केळीची भाजी

    author
    By प्राची राजूरकर
    July 16, 2024July 26, 2024

    Leave a ReplyCancel reply

    Subscribe via email!

    Subscribe to agmarathi newsletter

    Recent Posts

    • रात्रीचा सम्राट: घुबडाची अद्भुत कहाणी
    • मी आहे संपत्ती, समृद्धी आणि अढळ विश्वासाचे प्रतीक – मी आहे र्‍होडोडेंड्रॉन!
    • झिरो एनर्जी कूल चेंबर – फळे व भाजीपाला ताजे ठेवण्याचा कमी खर्चाचा उपाय
    • मी आहे बेस्ट आर्किटेक्ट! – सुगरण पक्ष्याचं अफलातून घरटे
    • वन्यप्राणी गणना बुद्ध पौर्णिमेलाच का करतात?
    • संत्रा बागेसाठी रोगमुक्त रोपे कोठे खरेदी करावी
    • कावळा आणि मुंग्यांचं नैसर्गिक हॉस्पिटल!
    • मेंढपाळाचा मुलगा ते UPSC अधिकारी : बिरदेव डोणे यांची जिद्दीची कहाणी
    • मातीचे गुणधर्म: शेतीसाठी माती किती उपयुक्त आहे हे कशावर ठरते?
    • देशी कोंबडी की देशी-टाईप? खरी ओळख, अंड्याची व मांसाची गुणवत्ता आणि बाजारातील फसवणूक उघड

    आम्हाला फॉलो करा

    • facebook
    • twitter
    • instagram
    • youtube
    Test

    प्रधानमंत्री सौरघऱ – मोफत वीज योजना: संपूर्ण माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया

    भारत सरकारने हरित उर्जेचा प्रचार आणि वीज बचतीसाठी १३ फेब्रुवारी...
    VIEW MORE
    Test

    ॲग्रीस्टॅक: शेतकऱ्यांच्या डिजिटल ओळख, मुख्य आव्हाने, आणि सहभागी होण्याची प्रक्रिया

    ॲग्री स्टॅक (Agri Stack) एक डिजिटल पायाभूत सुविधा आहे जी...
    VIEW MORE
    Test

    पीएम-कुसुम योजना: कॉम्पोनंट-ए – संपूर्ण माहिती

    पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान (PM-KUSUM / पीएम-कुसुम...
    VIEW MORE
    • आमच्या बद्दल (About us)
    • गोपनीयता धोरण (Privacy Policy)
    • आमच्याशी संपर्क साधा (Contact us)
    A theme by Gradient Themes ©