पीएम-कुसुम योजना (PM Kusum Yojna ) हा भारत सरकारचा एक प्रमुख उपक्रम आहे ज्याचा उद्देश शेतकऱ्यांमध्ये सौर ऊर्जा निर्मितीला चालना देणे आहे. या योजनेद्वारे, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीवर सौर पंप आणि सौर ऊर्जा संयंत्रे लावण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते, ज्यामुळे त्यांचे पारंपारिक उर्जा स्त्रोतांवरील अवलंबित्व कमी होते आणि शाश्वत कृषी पद्धतींना हातभार लावला जातो. पीएम-कुसुम योजना शेतकऱ्यांना उर्जेचा विश्वासार्ह स्त्रोत देऊन त्यांना केवळ सशक्त बनवत नाही तर हवामान बदलाशी लढा देण्याच्या भारताच्या वचनबद्धतेशी सुसंगत राहून अक्षय ऊर्जेचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देते. पीएम-कुसुम योजनेचे तपशील आणि तुम्ही ऑनलाइन अर्ज कसा करू शकता ते पाहू या.
पाणी हे कृषी उत्पादनासाठी एक महत्त्वपूर्ण गरज असून पाण्याविना कृषी उत्पन्न घेण्याची आपण कल्पनाच करू शकत नाही. जगभरात एकूण लागवडीखालील जमिनीच्या 20 टक्के शेती सिंचन पद्धतीने केली जात असून या सिंचीत शेती द्वारा प्राप्त होणारया विविध कृषी उद्पादने जगभरात उत्पादित एकूण अन्नामध्ये 40 टक्के योगदान देतात. केवळ पावसावर आधारित शेती व सिंचित शेती यात तुलना केल्यास, सिंचित शेती ही सरासरी प्रति युनिट जमिनीच्या दुप्पट उत्पादक ठरते आणि त्यामुळे शेतीची उत्पादन क्षमता अधिक होऊन आणि पिकांत वैविध्यता येते. महाराष्ट्रात कृषी क्षेत्रापैकी एकूण सिंचन क्षेत्र 44.19 लाख हेक्टर असून 80% क्षेत्र पावसावर अवलंबून आहे. आणि जवळपास ७०% शेतकरी अत्यल्प व अल्प भूधारक या वर्गात मोडतात.
शेतीसाठी लागणाऱ्या या पाण्याची गरज भागविण्याकरिता सध्यस्थितीत बरेच शेतकरी विजेद्वारा चालणारे पाण्याचे पंप आणि डिझेल पंपांचा (Electric Water Pump and Diesel Water Pump) वापरतात. पण महाराष्ट्रातील बहुतांश शेती ही दुर्गम, मागास भागात देखील आहे आणि अशा ठिकाणी तसेच अन्य ठिकाणी देखील विजेद्वारा चालणारे पाण्याचे पंपचा वापर करणे हे इतके सोपे नाही, त्याला कारण म्हणजे वारंवार होणारी वीज कपात, वीजटंचाई, व लोडशेडिंगची समस्या! आणि त्यामुळे होते काय? तर हा विजेद्वारा चालणारे पाण्याचे पंप वापरणारा शेतकरी हवालदिल होऊन जातो.
2030 पर्यंत गैर-जीवाश्म इंधन स्त्रोतांपासून (non-fossil fuel sources) स्थापित विद्युत उर्जा क्षमतेचा वाटा 40% पर्यंत वाढवण्यास भारत प्रयत्नरत आहे. तसेच आपल्या मंत्रिमंडळाने सौर उर्जेचे लक्ष्य वाढवण्यास मान्यता दिली आहे. त्यासाठीच केंद्रशासनाद्वारा सुरु करण्यात आली आहे हि पीएम कुसुम योजना ! पीएम कुसुम योजनेअंतर्गत राज्यनिहाय उद्दिष्टे किंवा निधीचे वाटप केले जात नाही कारण ती मागणीवर आधारित योजना आहे. तथापि या योजने अंतर्गत काही टप्पे गाठण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना निधी जारी केला जातो.
या योजनेप्रमाणेच अटल सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरुवात करण्यात आल्या आहेत या योजनांचा एक आढावा घेऊया :
महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये अटल सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे. या योजनेतून राज्य सरकारचे शेतकऱ्यांना 3 वर्षात 1 लाख सौर पंप देण्याचे तसेच 31 जानेवारी 2019 पर्यंत सरकार भाग्यवान शेतकऱ्यांची नावे जाहीर करून फेब्रुवारी 2019 पासून सौर पंप बसवले जाण्याचे उद्दिष्ट्य होते.
याअंतर्गत तीन एचपी, पाच एचपी व साडे सात एचपी असलेल्या पंपांचे वाटप करण्यात येत असते. शेतकऱ्यांना केवळ पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरून अनुदानित पंप मिळतात. महाराष्ट्र शासनाच्या अल्पभूधारक आणि दुर्गम भागात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानावर सौर कृषी पंप देण्याच्या योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक लाभार्थ्यांना लाभ मंजूर झाला असून त्यांच्या शेतात सौर कृषी पंप कार्यान्वितही झाले आहेत.
शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीला दिवसासुद्धा सिंचन करता यावं, याचबरोबर चालण्याची जास्त किंमत (High Running Cost) असलेल्या डिझेल पंपांचा (Diesel Pump) वापर कमी होऊन शेतकऱ्यांवरचा आर्थिक भार कमी व्हावा. तसेच पर्यावरण प्रदूषण कमी होऊन पर्यावरण संवर्धन साधता यावं, यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना हा एक उत्तम उपक्रम सुचविण्यात आला, आणि महाराष्ट्र शासनाने 2019 मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू केली. सौरऊर्जेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना सौर पंप संच उभारणीसाठी ९५% अनुदान देते. या योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाचे, पात्र शेतकऱ्यांना १,००,००० सौरपंप प्रदान करण्याचे उद्दिष्ट्य होते. नक्कीच या योजनेतून प्राप्त झालेल्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या या सौर पंपांचा वापर शेतकऱ्यांसाठी अतिशय किफायतशीर ठरेल आणि त्यामुळे त्यांच्यावरचा आर्थिक भार कमी होईल.
याच योजनांना अधिक बळ देण्यासाठी पुढचा टप्पा म्हणजेच पीएम-कुसुम योजना! होय भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय (एमएनआरई /MNRE) द्वारा मार्च २०१९ पासून हि योजना सुरु करण्यात आली असून प्रधानमंत्री कुसुम योजना म्हणजेच पीएम कुसुम -प्रधान मंत्री किसान उर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान (PM-KUSUM – Pradhan Mantri Kisan Urja Suraksha evam Utthaan Mahabhiyan) आहे. पीएम-कुसुम योजनेत खालील घटक आहेत:
घटक-A: शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीवर विकेंद्रित ग्राउंड/स्टिल्ट माउंटेड ग्रिड कनेक्टेड सोलर किंवा इतर अक्षय उर्जा आधारित 10,000 मेगावॅट चे पॉवर प्लांट उभारणे.
घटक-B: 14 लाख स्टँड-अलोन सौर कृषी पंपांची स्थापना.
घटक-C: फीडर लेव्हल सोलारायझेशनसह 35 लाख ग्रिड जोडलेल्या कृषी पंपांचे सौरीकरण 31.03.2026 पर्यंत करणे.
आणि हे तीनही टप्पे यशस्वी रित्या राबविण्याकरिता केंद्र शासनाद्वारा अर्थसहाय्य पुरविण्यात येत आहे.
ही योजना भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू करण्यात आली आहे. राज्य सरकारे घटक ब अंतर्गत सौर पंप बसवण्यासाठी 30% सबसिडी देतात. सौर पंपाच्या उर्वरित खर्चासाठी शेतकरी बँकेचे कर्ज देखील घेऊ शकतात. मार्च 2023 पर्यंत, घटक B अंतर्गत 21,741 स्टँडअलोन सौर पंप स्थापित केले गेले आहेत. शेतकऱ्यांसाठी कमी किमतीच्या वित्तपुरवठ्याची उपलब्धता आणि राज्याचा निधी ही या योजनेच्या अंमलबजावणीतील मुख्य आव्हाने आहेत. तसं पाहता पीएम-कुसुम योजनेत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ करण्याची आणि डिझेलवरील त्यांचे अवलंबित्व कमी करण्याची क्षमता आहे. तथापि, योजनेची पूर्ण क्षमता साध्य करण्यासाठी अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
पायरी 1: प्रथम https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B या पोर्टल वर यायचे आहे. तुम्हाला या पोर्टलवर एक ‘लाभार्थी नोंदणी फॉर्म’ मिळेल, जिथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि इतर संबंधित तपशील वापरून लाभार्थी म्हणून नोंदणी करावी लागेल.
एकदा तुम्ही लाभार्थी नोंदणी फॉर्म (स्थान/गाव) मध्ये आवश्यक माहिती भरल्यानंतर, सौर पंपांच्या क्षमतेनुसार (3 एचपी, 5 एचपी आणि 7.5 एचपी) तुमच्या स्थानासाठी योजनेची उपलब्धता (कोटा) दर्शविणारी पॉप-अप विंडो दिसेल.
पायरी 2: तुमच्या स्थान/गावासाठी योजनेअंतर्गत कोट्याच्या उपलब्धतेवर अवलंबून, तुम्ही अर्ज फी भरून पुढे जाऊ शकता.कृपया आवश्यकतेनुसार अर्ज फी भरा. हा लेख लिहिताना अर्जाची फी रु. १५ होती. कृपया पेमेंटच्या वेळी पेमेंट फॉर्ममध्ये अचूक माहिती भरा. तुम्ही UPI, नेट बँकिंग किंवा ATM आणि क्रेडिट कार्डद्वारे फी भरू शकता.
पायरी 2- अर्ज फी भरल्यानंतर, तुमचा अर्ज स्वीकारला जाईल, आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एसएमएस (SMS) पाठवला जाईल. कृपया वन-टाइम-पासवर्ड (OTP) साठी एसएमएस चेक करा आणि पोर्टलवर प्रविष्ट करा (संदर्भासाठी कृपया खालील स्क्रीनशॉट तपासा).
पायरी 3: ओटीपी इनपुट केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या नोंदणीसाठी एक पुष्टीकरण विंडो दाखवली जाईल. तुमचा अर्ज क्रमांक, नाव, मोबाईल नंबर इ. या वेबपेजवर दिसतील.तुम्ही पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर, तुम्ही कुसुम सौर पंप घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरू शकता.
पायरी 4: तुमचा अर्ज लॉग इन करण्यासाठी एसएमएसद्वारे तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठवलेला अर्ज क्रमांक आणि पासवर्ड वापरा आणि फॉर्म पूर्णपणे भरा (जसे की जमिनीचा तपशील इ.). अर्जाचा स्क्रीनशॉट तुमच्या संदर्भासाठी खाली दिला आहे.
पायरी 5: सर्व तपशील पूर्ण केल्यानंतर, शेतकऱ्याने नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे. अर्ज सबमिट केल्यावर, शेतकऱ्याला “यशस्वीपणे नोंदणीकृत” असा संदेश प्राप्त होईल. पोचपावती (Acknowledge) क्रमांक प्राप्त होईल.
कुसुम सोलर पंप योजना ३१.०३.२०२६ पर्यंत कार्यरत राहणार आहे.या कालावधीत पत्र असणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
प्रश्न-कुसुम सोलर पंप योजना साठी अर्ज कसा करायचा
उत्तर- कुसुम सोलर पंप योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत महाऊर्जा पोर्टल वरून फॉर्म भरायचा आहे. त्याची सविस्तर माहिती वर दिली आहे.
प्रश्न-कुसुम सोलर पंप योजनेसाठी कोण पात्र आहे?
उत्तर- सोलर पंप योजनेसाठी केवळ शेतकरी पात्र असणार आहेत.
प्रश्न-कुसुम सोलर पंप योजनेद्वारे किती अनुदान भेटणार?
उत्तर- सोलर पंप खरेदीसाठी 90 ते 95 टक्के इतके अनुदान मिळणार आहे.
प्रश्न-कुसुम सोलर पंप योजनेद्वारे लावण्यात आलेले solar panel किती काळ टिकतात?
उत्तर- या योजनेद्वारा लावण्यात आलेले solar panel हे २५ ते ३० वर्ष टिकतात.
या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी केंद्र शासनाच्या महाऊर्जा च्या अधिकृत वेबसाईट वर दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावयाचे आहे. अटल सौर कृषिपंप योजना-१ व २ आणि मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेमध्ये लाभ घेतलेले शेतकरी महाकृषि ऊर्जा अभियन पीएम-कुसुम घटक-ब योजनेसाठी पात्र नाहीत.
अधिक माहितीसाठी शासनाच्या https://mnre.gov.in/solar/scheme या website ला भेट देऊ शकता किवा १८००-१८०-३३३३ या टोल फ्री क्रमांकावर सम्पर्क करू शकता.
https://mnre.gov.in/solar/scheme
https://www.mahadiscom.in/solar/index.html
https://www.mahaurja.com/ASKP/login.php
https://pmkusum.mnre.gov.in/
हळद या वनस्पतीचा वापर तिच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून भारतीय लोक स्वयंपाकात करतात. हळदीला आयुर्वेदामध्ये "हरिद्रा" म्हणतात. हळदीचा वापर… Read More
पावसाळा म्हणजे रानभाज्यांचा ऋतू. सगळीकडे रानभाजी महोत्सव सुरु होतात. याच पावसाळ्यात हमखास उपलब्ध होणारी एक अत्यंत पौष्टिक अशी रानभाजी म्हणजेच… Read More
अनेक लोकांना स्वीट कॉर्न खायला आवडते. शहर असो वा गाव, बहुतेक लोकांना स्वीट कॉर्न कणीस खायला आवडते. लोक ते मोठ्या… Read More
This website uses cookies.
View Comments