गवार शेंगाची शेंगदाणे वापरून करता येणारी अगदी चवदार आणि पौष्टिक अशी भाजीची रेसिपी आज आपण शिकणार आहोत. या भाजीतले महत्वाचे दोन घटक जे मी आधीच सांगितलेत ते म्हणजे गवार शेंगा (Cyamopsis tetragonoloba /Guar bean / Cluster beans) आणि शेंगदाणे (Arachis hypogaea / Groundnuts)! आता गवार बद्दल सांगायचं झाल तर गवार ही शेंगवर्गीय भाजी असून कोवळ्या शेंगाचा भाजीसाठी उपयोग केला जातो तर सुकलेल्या बियांचा उसळ म्हणून उपयोग केला जातो. ग्रामीण भागात हे अतिशय लोकप्रिय पिक आहे.
भारतात महारष्ट्र, राजस्थान, उत्तरप्रदेश या क्षेत्रात गवारीची लागवड केली जाते. गवारीच्या पिकापासून निघणारे डिंक (Guar gum) याला मोठी मागणी असल्यामुळे परकीय चलन मिळूवून देणारे पिक म्हणून याकडे पहिले जाते. गवारीच्या शेंगामध्ये फाँस्फरस (Phosphorous), चुना (Lime), लोह (Iron) इत्यादी खनिजे आणि अ, ब, क जीवनसत्वे (Vitamin A,B and C) बरयाच प्रमाणात असतात. त्याचप्रमाणे शेंगदाणे देखील प्रथिने (Protein), कॅल्शियम (Calcium), फायबर (Fiber), मॅग्नेशियम (Magnesium), पोटॅशियम (Potassium), व्हिटॅमिन ई (Vitamin E), व हेल्दी फॅट्स (Healthy fats) परिपूर्ण असतात त्यामुळे ते नियमित खाल्ल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य, त्वचा आणि केस चांगले राहतात.
तर असे हे दोन्ही बहुगुणी घटक वापरून बनवूया भाजी! अगदी १५ मिनटात झटपट तयार होणारी हि भाजी आपल्याला सकाळच्या जेवणात,लहान मुलांना मधल्या सुट्टीत डब्ब्यात द्याला किवा अगदी रात्रीच्या जेवणात सुद्द्धा खाता येईल.
बनवण्यास लागणारे साहित्य (२ व्यक्तींसाठी)- गवार शेंगाची शेंगदाणे टाकून चविष्ट भाजी
- गवार शेंगा (Guar bean / Cluster beans) तोडलेल्या -१ मोठी वाटी
- शेंगदाणे (Peanut) -१/२ छोटी वाटी
- कांदा (onion) -१
- टमाटर (Tomato)-१
- हिरवी मिरची(Green chilly) -२
- कोशिंबीर (Coriander)-३-४ काड्या
- लसून(garlic) – ४-५
- लाल तिखट (Red chili powder) -१ टेबलस्पून
- मीठ (Salt)- १/२ टेबलस्पून
- हळद (Turmeric powder)- चिमुटभर
- तेल(oil) -गरजेप्रमाणे
बनविण्याची विधी-गवार शेंगाची शेंगदाणे टाकून चविष्ट भाजी
- सर्वप्रथम व्यवस्थित तोडलेल्या गवार शेंगा व्यवस्थित धुवून बाजूला ठेवा.
- त्यानंतर वरील साहित्य जसे कि शेंगदाणे, कांदा, टोमाटो, कोशिंबीर, लसून सर्व एकत्र करून मिक्सर मधून फिरवून जाडसर वाटून घ्या.
- आता शेगडी वर कढई ठेवून त्यात तीन चमचे (टेबलस्पून) तेल घाला.
- तेल गरम झाल्यावर त्यात जिरे मोहरी टाकून तडतडू द्या.
- त्यानंतर त्यात वरील मिक्सरमध्ये वाटलेले मिश्रण टाका.
- त्यानंतर १ चमचा तिखट आणि १/२ चमचा मीठ व चिमुटभर हळद घालून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मंद आचेवर शिजवा.
- मिश्रणाला तेल सुटू लागले कि त्यात धुवून ठेवलेल्या गवार शेंगा टाका.
- सर्व मिश्रण चमच्याने व्यवस्थित परतवून घ्या.
- कढई वर झाकण ठेवून मंद आचेवर ५-१० मिनिटे भाजी छान शिजू द्या
- भाजी शिजली कि शेगडी बंद करून गरमागरम भाजी वाढायला घ्या
अशी हि चवदार भाजी चपाती, भाकरी किवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता.
तर कधी करताय मग गावर शेंगाची शेंगदाणे टाकून भाजी !
आहारात गवारीच्या भाजी खाण्याने वजन नियंत्रणात राहते. तसेच, आहारातील गवारीच्या शेंगा आपल्याला अनेक गंभीर आजारांपासून बचावते. गवारच्या शेंगा खाल्ल्याने अपचन, बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्या दूर होतात. आपल्याला बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास, आहारात गवारीच्या शेंगांचा समावेश करा. त्यातील फायबर आपल्याला बद्धकोष्ठतेपासून मुक्त करेल. याचे नियमित सेवन केल्याने पाचन तंत्र मजबूत होते. गवारीच्या शेंगा नियमित खाल्ल्याने पोट स्वच्छ राहते.
याव्यतिरिक्त यात ग्लायको न्यूट्रिएंट असते जे शरीरात साखरेची पातळी संतुलित राखण्यास मदत करते. गवारच्या शेंगामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हाडे निरोगी राहतात. गवारीची भाजी गर्भवती महिलांसाठीही अत्यंत लाभदायक ठरते. गवारीमधील फॉलिक अॅसिड (Folic acid) आणि व्हिटामिन्स (Vitamins) पोटातील बाळाच्या विकासासाठी फायदेशीर ठरतात. गवारीची भाजी त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करते. म्हणून भारतीय पाककृतीमध्ये गवारीच्या भाजी खूप लोकप्रिय आहे.
आरोग्य आणि पोषण सूचना: या वेबसाइटवरील आरोग्य आणि पोषण माहिती सामान्य माहिती देण्यासाठी आहे. प्रत्येकाची पोषण गरज वेगवेगळी असू शकते. वैयक्तिक आहार सल्ल्यासाठी आपल्या आरोग्यतज्ञाचा सल्ला घ्या. आम्ही दिलेल्या माहितीची अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ही माहिती वैद्यकीय सल्ला नाही.