Power Weeder_पॉवर वीडर
पॉवर वीडर, Image credit: https://pixabay.com/

पॉवर वीडर आणि पॉवर टिलरबद्दल संपूर्ण माहिती

भारतातील लहान आणि मध्यम शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतीने शेती करत आहेत. मात्र मजुरांच्या कमतरतेमुळे आणि उत्पादन वाढवण्याच्या गरजेमुळे आता यांत्रिकीकरण अपरिहार्य बनले आहे. विशेषतः “लघु यांत्रिकी शेती उपकरणे” (Small-Scale Mechanised Agricultural Equipment) ही वेळ आणि श्रम वाचवणारी, अधिक प्रभावी शेतीसाठी उपयुक्त ठरत आहेत. यामध्ये पॉवर वीडर आणि पॉवर टिलर हे दोन महत्त्वाचे यंत्रप्रकार आहेत.

दोन मुख्य प्रकार

पॉवर वीडर (Power Weeder):

  • पिकांच्या ओळीमधील तण हटवण्यासाठी वापरले जाणारे लहान यंत्र.
  • भात, भाजीपाला, ऊस, झाडे असलेल्या बागायत क्षेत्रांमध्ये अतिशय उपयुक्त.
  • वजनाने हलके आणि चालवायला सोपे.

पॉवर टिलर (Power Tiller):

  • मातीची नांगरणी, पेरणीपूर्व मशागत, ट्रॉली ओढणे अशा अनेक कामांसाठी वापरले जाणारे बहुपर्यायी यंत्र.
  • ट्रॅक्टरला पर्याय म्हणून वापरले जाते, विशेषतः लहान शेतांमध्ये.
  • जास्त ताकद आणि अधिक अटॅचमेंट्ससह उपलब्ध.

पॉवर वीडर आणि पॉवर टिलर यामधील मुख्य फरक

घटकपॉवर वीडरपॉवर टिलर
वापरतण नियंत्रण, आंतर मशागतनांगरणी, रोटावेटर, ट्रॉली ओढणे
ताकद (HP)3.5 ते 7.5 HP8 ते 18 HP
वजनहलके (60-120 kg)जड (300-600 kg)
किंमतरु. 30,000 ते 70,000रु. 1.5 लाख ते 3 लाख
इंधनपेट्रोल / डिझेलडिझेल
अटॅचमेंट्समर्यादितअधिक विविध प्रकारचे

संशोधन पत्रात पहा – भारतीय बाजारपेठेतील पोर्टेबल वीडर्स आणि पॉवर टिलरचे तुलनात्मक विश्लेषण.

फॉरवर्ड आणि रिव्हर्स रोटरी फंक्शन: महत्त्व आणि उपयोग

पॉवर टिलरमध्ये उपलब्ध असलेले फॉरवर्ड आणि रिव्हर्स रोटरी फंक्शन हे फारच उपयुक्त वैशिष्ट्य आहे:

  • फॉरवर्ड रोटरी: यंत्र पुढे चालताना जमिनीत मशागत करते. अधिक खोल व सरळ ओळीतील नांगरणीसाठी उपयुक्त.
  • रिव्हर्स रोटरी: जिथे खोल मशागत आवश्यक आहे किंवा मोकळा व कमी ओलावा असलेला भाग आहे, तिथे रिव्हर्स मोडमुळे अधिक चांगले काम होते.

खोल मशागतासाठी आणि अवघड जमिनीच्या भागात फॉरवर्ड आणि रिव्हर्स रोटरी फंक्शनमुळे यंत्राचा उपयोग अधिक अचूक आणि कार्यक्षम बनतो. या सुविधेमुळे यंत्र वापरण्याचा कालावधी आणि इंधन खर्च दोन्ही कमी होतो. याशिवाय, श्रमिकांची गरज कमी भासते आणि त्यामुळे एकूण उत्पादन खर्चातही लक्षणीय बचत होते.

अटॅचमेंट्स आणि अपेक्षित कामाचे स्वरूप

यंत्रप्रकारअटॅचमेंट्सउपयोग
पॉवर वीडररोटरी ब्लेड्सतण नियंत्रण, आंतर मशागत
प्लँटर अटॅचमेंटरांगेत बी पेरणी
फर्टिलायझर अटॅचमेंटखते टाकण्यासाठी
पॉवर टिलररोटावेटरपेरणीपूर्व मशागत
ट्रॉलीमाल वाहतूक
प्लाऊ / डिस्क प्लाऊखोल नांगरणी
पंपसेट / थ्रेशरपाणीपुरवठा / कापणी नंतर प्रक्रिया
सीड ड्रिल / प्लँटरएकसंध आणि सरळ रांगेतील पेरणी

आघाडीचे ब्रँड्स

व्हीएसटी शक्ती (VST Shakti), किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेड (Kirloskar Oil Engines Ltd. – KOEL), बीसीएस इंडिया (BCS India), कॅमको – केरळ अॅग्रो मशीनरी कॉर्पोरेशन (KAMCO – Kerala Agro Machinery Corporation), स्प्रेमन अॅग्रो (Sprayman Agro, होंडा पॉवर इक्विपमेंट (Honda Power Equipment), ग्रीव्ह्स कॉटन लिमिटेड (Greaves Cotton Ltd.), श्राची अॅग्रो (Shrachi Agro)

खरेदीपूर्वी विचारात घेण्याजोग्या गोष्टी:

  • आपल्या शेताचे क्षेत्रफळ आणि जमीन प्रकार
  • कोणत्या पिकासाठी आणि कामासाठी यंत्र हवयं?
  • इंधन खपत आणि देखभाल खर्च
  • स्थानिक सेवा केंद्रांची आणि स्पेअर पार्ट्सची उपलब्धता
  • अटॅचमेंट्सची सोय आणि किफायतशीरता
  • शासकीय अनुदान आणि सबसिडीची माहिती (जसे की कृषी यांत्रिकीकरण योजना, जिल्हा कृषि अधिकारी यांच्याकडून अर्जाची प्रक्रिया)
  • ब्रँडची विश्वसनीयता, वॉरंटी सुविधा आणि ग्राहक सेवेचा अनुभव

यंत्र वापरताना घ्यावयाची काळजी:

  • यंत्र सुरू करण्यापूर्वी सर्व नट-बोल्ट तपासणे
  • योग्य प्रमाणात इंधन व ल्युब्रीकंट वापरणे
  • शूज, दस्ताने, आणि कानाचे रक्षण करणारी साधने वापरणे
  • यंत्र चालवताना लहान मुले किंवा जनावरे दूर ठेवणे
  • नियमित सर्व्हिसिंग व देखभाल
  • शेतात उंचसखल जागांवर वापरताना विशेष काळजी

लघु यांत्रिकी शेती उपकरणे म्हणजेच पॉवर वीडर आणि पॉवर टिलर शेतकऱ्यांसाठी वेळ, श्रम आणि खर्च वाचवणारे आधुनिक पर्याय आहेत. योग्य यंत्र निवडल्यास उत्पादनक्षमता वाढते आणि शेती अधिक सुलभ बनते.

author

प्रणाली तेलंग

प्रणाली AG मराठी ची संस्थापक आणि संपादक आहेत. ती कृषी, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनावर ताज्या बातम्या आणि लेख लिहिते. तिने पर्यावरण शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा देखील पूर्ण केला आहे. ती एक प्रशिक्षित शिक्षिकाही आहे. तिने 5 वर्षे शिक्षण, संशोधन आणि विकास क्षेत्रात काम केले आहे.

Similar Posts

Leave a Reply