author

प्रणाली तेलंग

प्रणाली AG मराठी ची संस्थापक आणि संपादक आहेत. ती कृषी, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनावर ताज्या बातम्या आणि लेख लिहिते. तिने पर्यावरण शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा देखील पूर्ण केला आहे. ती एक प्रशिक्षित शिक्षिकाही आहे. तिने 5 वर्षे शिक्षण, संशोधन आणि विकास क्षेत्रात काम केले आहे.

ग्रीन वॉटर म्हणजे नेमकं काय?

“पाणी म्हणजेच जीवन” हे आपण शालेय जीवनापासून ऐकत आलो आहोत. पण पाण्याचे प्रकार काय असतात हे आपल्याला नेहमीच माहिती नसते. पाणी फक्त नळातून, विहिरीतून किंवा धरणातून मिळणारं नसतं – ते जमिनीतही असतं, आणि झाडांमुळे वातावरणातही फिरत असतं. या लेखात आपण ग्रीन वॉटर (Green Water) म्हणजे काय, ते का महत्त्वाचं आहे, आणि त्याचं अचूक मोजमाप का […]

ग्वार गम: कोरडवाहू भागात सोन्यासारखा पर्याय

ग्वार/ गवार (Cluster Beans / Cyamopsis tetragonoloba) हे खरं तर एक साधंसं पीक वाटतं, ग्रामीण भागात सहजपणे घेतलं जातं. पण याच ग्वारापासून मिळणाऱ्या ग्वार गमचं (Guar Gum) महत्त्व खूप मोठं आहे. हा नैसर्गिक घटक जगभरच्या अन्नप्रक्रिया, औषध, सौंदर्यप्रसाधने आणि तेल उद्योगात वापरला जातो. त्यामुळे ग्वार हे केवळ शेतीचं पीक न राहता एका आंतरराष्ट्रीय उद्योगाचं केंद्रबिंदू […]

इथेनॉल उत्पादनात भारताची वाटचाल: संधी, स्थान आणि सावधगिरी

भारताने पेट्रोलमध्ये इथेनॉलचे (Ethanol) 20% मिश्रण (E20) 2030 च्या उद्दिष्टापेक्षा पाच वर्ष आधी, म्हणजे 2025 मध्ये पूर्ण केलं आहे. पण इथेनॉल म्हणजे नक्की काय? ते कुठून आणि कशापासून तयार होतं? आणि इथेनॉल उत्पादनात भारताचा जागतिक स्तरावर काय दर्जा आहे? या लेखातून आपण हे सविस्तरपणे समजून घेऊया. इथेनॉल म्हणजे काय? इथेनॉल हा एक प्रकारचा जैवइंधन (biofuel) […]

सत्तेवर नजर ठेवणं म्हणजे राष्ट्रभक्ती

१५ ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन — ध्वजारोहण, देशभक्तीपर गीतं, आणि अभिमानाने भरलेले क्षण. पण या वर्षी, सामाजिक माध्यमांवर फिरत असताना एक पोस्ट खूपच अंतर्मुख करणारी ठरली. इंटरनेट इन्फ्लुएन्सर नमान श्रीवास्तव यांनी लिहिलं होतं: “राजनीति में जाना ज़रूरी नहीं है, लेकिन राजनीति पर नज़र रखना हर नागरिक का कर्तव्य है।सिर्फ वोट देना ही लोकतंत्र नहीं […]

पॉवर वीडर आणि पॉवर टिलरबद्दल संपूर्ण माहिती

भारतातील लहान आणि मध्यम शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतीने शेती करत आहेत. मात्र मजुरांच्या कमतरतेमुळे आणि उत्पादन वाढवण्याच्या गरजेमुळे आता यांत्रिकीकरण अपरिहार्य बनले आहे. विशेषतः “लघु यांत्रिकी शेती उपकरणे” (Small-Scale Mechanised Agricultural Equipment) ही वेळ आणि श्रम वाचवणारी, अधिक प्रभावी शेतीसाठी उपयुक्त ठरत आहेत. यामध्ये पॉवर वीडर आणि पॉवर टिलर हे दोन महत्त्वाचे यंत्रप्रकार आहेत. दोन […]

सेंद्रिय प्रमाणपत्रांचे प्रकार

आजकाल ग्राहक अधिक आरोग्यसजग झाले आहेत. रासायनिक अन्नामुळे होणारे आजार, कीटकनाशकांचा अतिरेकी वापर, आणि GM बियाण्यांच्या दुष्परिणामांविषयी आता जागरूकता वाढली आहे. त्यामुळे सेंद्रिय उत्पादनांची (Organic Produce) मागणी वेगाने वाढते आहे. पण खरी चिंता हीच असते – “हे खरंच सेंद्रिय आहे का?” म्हणूनच ‘सेंद्रिय प्रमाणपत्र’ (Organic Certification) हा ग्राहक आणि विक्रेत्यांमधील विश्वासाचा दुवा बनतो. याच संदर्भात, […]

बिजापोटी कीड

“बेला” – नागपूर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव. आकाराने लहान, पण संस्कृतीने समृद्ध. प्रामुख्याने शेतकरी कुटुंबांनी वसलेलं हे गाव, वेंणा नदीवर सुरू असलेल्या मोठ्या धरण प्रकल्पामुळे हळूहळू बदलत गेलं – शेतीप्रधान जीवनशैलीत आता व्यावसायिक हालचालींची छाया दिसायला लागली. हीच रूपांतरणाची प्रक्रिया मी लहानपणी अनुभवली. आमचं वडिलोपार्जित साधंसं घर, त्याच्या मागे एक छोटीशी स्वयंपाकघरासोबत जोडलेली बाग, आणि […]

GATE परीक्षेच्या आधारे कृषी, अन्नप्रक्रिया व डेअरी तंत्रज्ञानातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांची माहिती

शेतीशी संबंधित शिक्षण आणि करिअरसाठी केवळ पदवीपर्यंत मर्यादित राहून चालत नाही, तर पुढील शिक्षणही महत्त्वाचे असते. अनेक तरुण कृषी, अन्न तंत्रज्ञान (Food Technology), व डेअरी तंत्रज्ञान (Dairy Technology) या क्षेत्रात पदव्युत्तर (Postgraduate – PG) शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असतात. यासाठी GATE ही महत्त्वाची परीक्षा ठरते. या लेखात आपण पाहूया: GATE परीक्षा म्हणजे काय? GATE म्हणजे “Graduate […]

कीटकनाशकांचे प्रकार: कार्यपद्धतीनुसार कोणता प्रकार कधी वापरावा

शेती करताना कीड आणि रोगांमुळे होणारे नुकसान ही एक मोठी समस्या असते. यावर उपाय म्हणून शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशके आणि कीटकनियंत्रक (Insecticides / Pesticides) वापरत असतात. पण नेमकं कोणतं कीटकनाशक कोणत्या प्रकारचं असतं, ते कसं काम करतं, आणि कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे , ही माहिती अनेकदा स्पष्ट नसते. या लेखात आपण कीटकनाशकांचे मुख्य दोन प्रकार […]

शेती उत्पन्न आणि आयकर: ITR फाईल करताना शेतकऱ्यांनी काय लक्षात ठेवावं?

“Income Tax”, “ITR”, “ITR Filing”, “ITR Filing Deadline” – जुलै महिना आला की हे शब्द गुगल वर सर्वाधिक शोधले जातात. मात्र या गदारोळात एक अतिशय महत्त्वाचा आणि ग्रामीण भारताशी थेट संबंधित विषय दुर्लक्षित राहतो, तो म्हणजे शेती उत्पन्न आणि त्याचं आयकर विवरणात स्थान (Agricultural Income and Income Tax). अनेकांना वाटतं की, शेती उत्पन्न करमुक्त (Tax-Free) […]