author

प्रणाली तेलंग

प्रणाली AG मराठी ची संस्थापक आणि संपादक आहेत. ती कृषी, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनावर ताज्या बातम्या आणि लेख लिहिते. तिने पर्यावरण शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा देखील पूर्ण केला आहे. ती एक प्रशिक्षित शिक्षिकाही आहे. तिने 5 वर्षे शिक्षण, संशोधन आणि विकास क्षेत्रात काम केले आहे.

GATE परीक्षेच्या आधारे कृषी, अन्नप्रक्रिया व डेअरी तंत्रज्ञानातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांची माहिती

शेतीशी संबंधित शिक्षण आणि करिअरसाठी केवळ पदवीपर्यंत मर्यादित राहून चालत नाही, तर पुढील शिक्षणही महत्त्वाचे असते. अनेक तरुण कृषी, अन्न तंत्रज्ञान (Food Technology), व डेअरी तंत्रज्ञान (Dairy Technology) या क्षेत्रात पदव्युत्तर (Postgraduate – PG) शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असतात. यासाठी GATE ही महत्त्वाची परीक्षा ठरते. या लेखात आपण पाहूया: GATE परीक्षा म्हणजे काय? GATE म्हणजे “Graduate […]

कीटकनाशकांचे प्रकार: कार्यपद्धतीनुसार कोणता प्रकार कधी वापरावा

शेती करताना कीड आणि रोगांमुळे होणारे नुकसान ही एक मोठी समस्या असते. यावर उपाय म्हणून शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशके आणि कीटकनियंत्रक (Insecticides / Pesticides) वापरत असतात. पण नेमकं कोणतं कीटकनाशक कोणत्या प्रकारचं असतं, ते कसं काम करतं, आणि कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे , ही माहिती अनेकदा स्पष्ट नसते. या लेखात आपण कीटकनाशकांचे मुख्य दोन प्रकार […]

शेती उत्पन्न आणि आयकर: ITR फाईल करताना शेतकऱ्यांनी काय लक्षात ठेवावं?

“Income Tax”, “ITR”, “ITR Filing”, “ITR Filing Deadline” – जुलै महिना आला की हे शब्द गुगल वर सर्वाधिक शोधले जातात. मात्र या गदारोळात एक अतिशय महत्त्वाचा आणि ग्रामीण भारताशी थेट संबंधित विषय दुर्लक्षित राहतो, तो म्हणजे शेती उत्पन्न आणि त्याचं आयकर विवरणात स्थान (Agricultural Income and Income Tax). अनेकांना वाटतं की, शेती उत्पन्न करमुक्त (Tax-Free) […]

ग्रामीण भारतात रोजगाराच्या नव्या शक्यता: TCS Layoff च्या पार्श्वभूमीवर एक विचारमंथन

भारतातील अग्रगण्य IT सेवा कंपनी TCS (Tata Consultancy Services) ने अलीकडे 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची घोषणा केली. ही घटना देशाच्या एकूण रोजगार प्रणालीसाठी एक मोठा इशारा ठरते. नोकऱ्यांची ही अस्थिरता आपल्याला ग्रामीण भागात रोजगार निर्माण करण्याच्या नव्या संधी शोधण्याची गरज दाखवते. विशेषतः कृषी (Agriculture), अन्न प्रक्रिया (Food Processing), ग्रामोद्योग (Rural Enterprises), आणि कृषी-तंत्रज्ञान (AgriTech) […]

व्हे प्रोटीन म्हणजे काय?  

आज आरोग्य आणि पोषण या विषयांमध्ये लोकांचा रस झपाट्याने वाढत आहे. या प्रवाहात “व्हे प्रोटीन”/ (Whey Protein)  हा शब्द अनेकदा ऐकायला मिळतो , पण आपल्यापैकी अनेकांना अजूनही व्हे प्रोटीन म्हणजे नेमकं काय, ते कशासाठी वापरलं जातं, आणि ते कसं वापरावं, याची नीट माहिती नाही. या लेखात आपण व्हे प्रोटीनची म्हणजे काय, उपयोग, फायदे, आणि बाजारातील […]

विहिरी गोलच का असतात?

आपण भारतात कुठेही गेलो, तरी बहुतांश ठिकाणी विहिरींचा आकार गोलसरच आढळतो. मग ती पारंपरिक विहीर असो, बोअरवेल असो, किंवा गावातील जुन्या विहिरी – सर्वच ठिकाणी एक सामान्य गोष्ट दिसते, ती म्हणजे विहिरीचा गोलाकार आकार. हे जाणीवपूर्वक होतं का? का विहिरी कधीच चौकोनी किंवा आयताकृती बांधल्या जात नाहीत? या प्रश्नाचं उत्तर विज्ञान, स्थापत्यशास्त्र आणि व्यवहारिक अनुभव […]

वाहन स्क्रॅपिंग धोरण व महाराष्ट्रातील १५% कर सवलत

आजच्या काळात भारतात अनेक जुनी वाहने रस्त्यावर धावत आहेत जी प्रदूषण वाढवतात आणि भीतीदायक बनतात. अशा पार्श्वभूमीवर भारत सरकारने मार्च २०२१ मध्ये वाहने स्क्रॅप करण्यासाठी Vehicle Scrappage Policy 2021 जाहीर केली. या धोरणानुसार ग्राहकांना जुने वाहन स्क्रॅप केल्यावर नवीन वाहन खरेदीवर राष्ट्रीय व राज्य पातळीवर प्रोत्साहने दिली जातात महत्त्वाच्या तारीखा – धोरणाची अंमलबजावणी वेळापत्रक वाहन […]

शेतीतील खतांचे प्रकार – योग्य खत निवडण्याचे मार्गदर्शन

शेतीमध्ये चांगले उत्पादन मिळवण्यासाठी जमिनीची सुपीकता टिकवणे आणि पिकांना आवश्यक पोषणद्रव्ये योग्य प्रमाणात पुरवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी खतांचा वापर अपरिहार्य ठरतो. पण खतांचे प्रकार समजून घेणे आणि योग्य निवड करणे हे शाश्वत आणि लाभदायक शेतीसाठी अत्यंत गरजेचे आहे. या लेखात आपण खतांचे चार मुख्य प्रकार आणि त्यांचे फायदे-तोटे सविस्तरपणे पाहणार आहोत, तसेच द्रव आणि […]

 “No R, No Fish” – मासेमारीला विश्रांती देणारी एक साधी पण शहाणी संकल्पना

“No R, No Fish” – ही इंग्रजीतील एक जुनी म्हण, जी वरवर पाहता फारशी लक्ष वेधून घेत नाही. पण जरा खोलात गेलं की लक्षात येतं, की ही चार शब्दांची म्हण मानवाच्या आहारसुरक्षेपासून ते पर्यावरणसंवर्धनापर्यंत अनेक गोष्टी सांगून जाते. या म्हणीचा अर्थ असा की – ज्या महिन्यांच्या इंग्रजी नावात ‘R’ नाही (उदा. May, June, July, August) […]

जगातील सर्वात सुरक्षित बियाण्यांचा खजिना

तुम्ही कल्पना करू शकता का, एक अशी गुहा जी पृथ्वीवरील सर्व महत्त्वाच्या पिकांच्या बियाण्यांचं कोट्यवधी नमुन्यांसह संरक्षण करते? ती देखील उत्तर ध्रुवाच्या जवळ, बर्फाच्छादित पर्वतात! स्वाल्बार्ड जागतिक बिया भंडार (Svalbard Global Seed Vault)  म्हणजे असाच एक अद्भुत जागतिक खजिना — जो आपली अन्नसुरक्षा भविष्यासाठी सुरक्षित ठेवतो. या लेखात आपण जाणून घेणार आहोत: स्वाल्बार्ड जागतिक बिया […]