झिरो बजेट नैसर्गिक शेती/ Zero-Budget Natural Farming (ZBNF) हा शाश्वत शेतीचा एक पर्याय आहे, ज्यामध्ये रासायनिक खते व कीटकनाशकांवर अवलंब न राहता नैसर्गिक संसाधनांचा वापर करून उत्पादन घेण्यावर भर दिला जातो. पारंपरिक पद्धतींवर आधारित, ही पद्धत शेतकऱ्यांसाठी किफायतशीर असून पर्यावरणपूरक शेतीला चालना देते.
झिरो बजेट नैसर्गिक शेती म्हणजे काय?
झिरो बजेट नैसर्गिक शेती ही संकल्पना आहे जिथे शेतीचा खर्च जवळजवळ शून्यावर आणला जातो. यामध्ये जमिनीची सुपीकता नैसर्गिकरीत्या टिकवून ठेवली जाते आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारणे हाच उद्देश असतो. यासाठी गाय शेण, गायीचे मूत्र, पाचगव्य (दूध, ताक, तूप, मूत्र, शेण), जीवामृत, आणि बीजामृत अशा घटकांचा उपयोग केला जातो.
सुभाष पाळेकर हे शून्य-बजेट नैसर्गिक शेतीचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांनी पारंपरिक भारतीय शेतीच्या तत्त्वांवर आधारित ही पद्धत विकसित केली. रासायनिक खते व कीटकनाशकांच्या वापरामुळे होणाऱ्या प्रदूषण व खर्चवाढीच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांनी ZBNF संकल्पना मांडली.
झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे तत्त्वे
झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे फायदे
झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे घटक
1. जीवामृत: गायीच्या शेणामध्ये मोठ्या प्रमाणात उपयुक्त जिवाणू असतात (प्रति ग्रॅम ३०० ते ५०० अब्ज). हे जिवाणू मातीतील सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून त्यांचे पोषणतत्त्वांमध्ये रूपांतर करतात. गायीचे शेण, मूत्र, गूळ, डाळीचे पीठ आणि स्वच्छ माती यापासून जीवामृत तयार होते. ही नैसर्गिक जिवाणू जमिनीत वापरल्यावर जमिनीची सुपीकता वाढते आणि जिवाणूंची क्रिया वेगवान होते. प्रत्येक हेक्टरसाठी महिन्यातून दोन वेळा ५०० लिटर जीवामृत वापरणे सुचवले जाते.
2. बीजामृत: बीजामृत हे देशी गायींच्या शेण आणि मूत्रापासून तयार केलेले मिश्रण आहे, ज्याचा वापर बियाणे प्रक्रियेसाठी होतो.
3. आच्छादन: आच्छादन म्हणजे वरच्या मातीवर झाडांचे अवशेष, सेंद्रिय पदार्थ, किंवा उरलेली पीक सामग्री टाकणे.
4. वापसा स्थिती: मातीमध्ये योग्य प्रमाणात हवा असणे हे पिकांच्या निरोगी वाढीसाठी आणि उत्पादनक्षमतेसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. मातीतील वाफसा म्हणजे मातीला अशी स्थिती मिळवून देणे जिथे हवेची हालचाल होऊ शकते, पण माती ओलसर देखील राहते.
झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा पीक पद्धतीचा मॉडेल
परंपरागत कृषी विकास योजना (PKVY) आणि ZBNF
परंपरागत कृषी विकास योजना (PKVY) ही झिरो बजेट नैसर्गिक शेतीला चालना देणारी महत्त्वाची योजना आहे. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक अनुदाने व तांत्रिक मदत दिली जाते. जैविक शेती आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी योजनेत शेतकरी गटांना प्राधान्य दिले जाते.
झिरो बजेट नैसर्गिक शेती: संधी आणि आव्हाने
संधी:
आव्हाने:
झिरो बजेट नैसर्गिक शेती शाश्वत शेतीकडे नेणारा प्रभावी पर्याय आहे. सुभाष पाळेकर यांच्या मार्गदर्शनाने व PKVY सारख्या योजनांच्या मदतीने शेतकरी ही पद्धत आत्मसात करू शकतात. मात्र, प्रशिक्षित श्रमशक्ती, शाश्वत बाजारपेठा, आणि शेतकरी जागरूकता वाढवणे महत्त्वाचे ठरेल.
संदर्भ
भारतातील अग्रगण्य IT सेवा कंपनी TCS (Tata Consultancy Services) ने अलीकडे 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची घोषणा केली. ही घटना… Read More
आज आरोग्य आणि पोषण या विषयांमध्ये लोकांचा रस झपाट्याने वाढत आहे. या प्रवाहात “व्हे प्रोटीन”/ (Whey Protein) हा शब्द अनेकदा… Read More
आपण भारतात कुठेही गेलो, तरी बहुतांश ठिकाणी विहिरींचा आकार गोलसरच आढळतो. मग ती पारंपरिक विहीर असो, बोअरवेल असो, किंवा गावातील… Read More
View Comments