Agriculture

संत्रा बागेसाठी रोगमुक्त रोपे कोठे खरेदी करावी

संत्रा लागवडीत आरोग्यदायी आणि रोगमुक्त रोपांची निवड अत्यंत महत्त्वाची आहे. योग्य रोपांपासून सुरुवात केल्यास उत्पादन वाढते आणि दीर्घकालीन आर्थिक लाभ मिळतो. नागपूर संत्रा / स्वीट ऑरेंज लागवडीसाठी सेंट्रल सिट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट (CCRI), नागपूर आणि खाजगी नर्सरी या दोन्ही पर्यायांमधून रोपे खरेदी करता येतात. परंतु योग्य निर्णय घेण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबींचा विचार करावा लागतो.

१. सेंट्रल सिट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट (CCRI), नागपूर

CCRI ही भारतातील अग्रगण्य सिट्रस संशोधन संस्था असून रोगमुक्त आणि प्रमाणित रोपे पुरवते.

रोगमुक्त रोपांचे उत्पादन:

  • CCRI दरवर्षी जुलैपासून मर्यादित प्रमाणात नागपूर संत्रा /स्वीट ऑरेंज ची रोगमुक्त कलमे आणि रोपे पुरवते.
  • त्यांच्या रोपांचे उत्पादन उच्च दर्जाचे असून ISO 9001:2008 प्रमाणित आहे.

संशोधन आधारित जाती:

  • CCRI मध्ये स्थानिक हवामान आणि रोगप्रतिकारक शक्ती लक्षात घेऊन संशोधित वाणांची लागवड आणि वितरण केले जाते.
  • CCRI कडील रोपे स्थलकालानुकूलित आणि रोगप्रतिकारक असतात.

गुणवत्ता आणि विश्वासार्हता:

  • CCRI ही राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने (NHB) मान्यताप्राप्त संस्था आहे आणि त्यांचे रोपवाटिकेतील उत्पादन अत्यंत विश्वासार्ह असते.

२. शासकीय फलरोपवाटिका – परवडणारा व शाश्वत पर्याय

राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या अंतर्गत अनेक जिल्ह्यांमध्ये शासकीय फलरोपवाटिका कार्यरत आहेत.  उदा. शासकीय फलरोप वटिका, गोंखैरी (नागपूर) ही विदर्भातील शेतकऱ्यांसाठी एक उपयुक्त व विश्वासार्ह पर्याय ठरते.

फायदे:

  • सरकारी दरात रोपे उपलब्ध: खासगी नर्सरीपेक्षा कमी किमतीत रोपे मिळतात.
  • मूल्यवर्धित जाती: अनेक वेळा विभागीय संशोधन केंद्रांशी समन्वयातून प्रादेशिक वाण उपलब्ध असतात.
  • रोगमुक्तता व गुणवत्ता: बहुतांश वेळा NHB, ICAR किंवा राज्य कृषी विद्यापीठांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन.
  • स्थानिक उपलब्धता व विश्वास: स्थानिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कार्यरत असल्यामुळे पारदर्शक व्यवहार.

मर्यादा:

Related Post
  • मर्यादित साठा: हंगामानुसार किंवा मागणीनुसार रोपे पटकन संपू शकतात.
  • ऑनलाइन माहिती कमी: इतर पर्यायांच्या तुलनेत यांचे प्रचार कमी असतो. प्रत्यक्ष चौकशी करावी लागते.

३. खाजगी नर्सरीचे फायदे आणि जोखीम

खाजगी नर्सरीमधून रोपे खरेदी करताना विविध पर्याय उपलब्ध असतात, परंतु काही बाबींची काळजी घ्यावी.

विविधता आणि उपलब्धता:

  • खाजगी नर्सरीमध्ये अनेक प्रकारच्या संत्रा वाणांचे पर्याय उपलब्ध असतात आणि CCRI च्या तुलनेत रोपे अधिक प्रमाणात सहज मिळू शकतात.

सुविधा आणि लवचिकता:

  • ऑर्डर प्रमाण आणि वाहतूक सुविधा यामध्ये खाजगी नर्सरी अधिक लवचिक असतात.

गुणवत्तेची अनिश्चितता:

  • मात्र, गुणवत्तेची हमी नसते आणि काही खाजगी नर्सरींमधून मिळणाऱ्या रोपांची रोगप्रतिकारक क्षमता संदिग्ध असते.
  • सर्व नर्सरींना संबंधित प्रमाणपत्रे आणि मान्यता असतातच असे नाही.

उत्तम रोपे निवडण्यासाठी शिफारसी

रोगमुक्त प्रमाणित रोपांची प्राधान्यता:

  • CCRI /शासकीय फलरोपवाटिका कडून रोपे घेणे अधिक सुरक्षित आहे कारण त्यांची गुणवत्ता आणि रोगमुक्तीची हमी आहे.
  • खाजगी नर्सरीतील रोपे घेताना रोगमुक्त प्रमाणपत्र तपासावे आणि नर्सरीची विश्वासार्हता निश्चित करावी.

 स्थानिक कृषी विभागाची मदत घ्या:

  • तुमच्या भागातील खाजगी नर्सरींची विश्वसनीयता आणि गुणवत्तेची माहिती स्थानिक कृषी अधिकाऱ्यांकडून मिळवा.

नर्सरीचे प्रमाणपत्र आणि ट्रॅक रेकॉर्ड तपासा:

  • NHB प्रमाणित नर्सरी किंवा इतर मान्यताप्राप्त संस्थांची मान्यता असलेली नर्सरी निवडावी.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन

  • संत्रा लागवडीसाठी रोगमुक्त आणि उच्च दर्जाची रोपे मिळवणे दीर्घकालीन यशासाठी आवश्यक आहे.
  • CCRI / शासकीय फलरोपवाटिका कडून खरेदी केल्यास शाश्वत आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनाची खात्री मिळते.
  • खाजगी नर्सरीतून खरेदी करताना नर्सरीचे प्रमाणपत्र आणि रोपांची गुणवत्ता तपासावी.

संत्रा लागवडीसाठी योग्य रोपांची निवड हे उत्पादनाचे भविष्य ठरवते. CCRI / शासकीय फलरोपवाटिका कडून रोगमुक्त आणि संशोधित रोपे खरेदी करणे सर्वोत्तम पर्याय आहे. खाजगी नर्सरी निवडताना प्रमाणपत्रे आणि गुणवत्ता तपासणे अत्यंत आवश्यक आहे. स्थानिक कृषी विभाग आणि मान्यताप्राप्त नर्सरी यांच्याकडून माहिती घेऊनच योग्य निर्णय घ्यावा. त्यामुळेच आरोग्यदायी आणि भरघोस संत्रा उत्पादनाचे स्वप्न साकार करता येईल.

प्रणाली तेलंग

प्रणाली AG मराठी ची संस्थापक आणि संपादक आहेत. ती कृषी, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनावर ताज्या बातम्या आणि लेख लिहिते. तिने पर्यावरण शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा देखील पूर्ण केला आहे. ती एक प्रशिक्षित शिक्षिकाही आहे. तिने 5 वर्षे शिक्षण, संशोधन आणि विकास क्षेत्रात काम केले आहे.

Recent Posts

सत्तेवर नजर ठेवणं म्हणजे राष्ट्रभक्ती

१५ ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन — ध्वजारोहण, देशभक्तीपर गीतं, आणि अभिमानाने भरलेले क्षण. पण या वर्षी, सामाजिक माध्यमांवर फिरत… Read More

उडणारी खार – झाडांवरून उडणारी ही गूढ वनवासी!

बालमित्रांनो, आपल्या आजूबाजूला झाडांवरून सरसर चढणारी, टूणटूण उड्या मारणारी छोटीशी खार आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. रामायणात रामाला रामसेतू बांधताना मदत… Read More

पॉवर वीडर आणि पॉवर टिलरबद्दल संपूर्ण माहिती

भारतातील लहान आणि मध्यम शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतीने शेती करत आहेत. मात्र मजुरांच्या कमतरतेमुळे आणि उत्पादन वाढवण्याच्या गरजेमुळे आता यांत्रिकीकरण… Read More