Recipes

गव्हाच्या पिठाचा केक – छोट्यांसाठी मेजवानी आणि मोठ्यांसाठी स्वादाची पर्वणी

गहू हे धन्य आज पृथ्वीवरील अन्नाच्या महत्वाच्या स्त्रोतापैकी एक आहे. गव्हात 75 ते 80% कर्बोदके, 9 ते 18% प्रथिने, फायबर, अनेक जीवनसत्त्वे (विशेषत: ब जीवनसत्त्वे), कॅल्शियम, लोह आणि अनेक मॅक्रो- आणि सूक्ष्म पोषक घटक असतात. गहू हा मधुर, थंड, पचावयास जड, कफकारक, बलकारक, व जुलाबावर गुणकारी आहे. गहू म्हंटल आपल्या डोळ्यासमोर चपाती, पराठा येतो. पण आज आपण गव्हाच्या पिठाचा केक बनवणार आहोत.  

गव्हाच्या पिठाचा केक एक गोड पदार्थ आहे जो छोट्या बच्चेकंपनी च्या आवडीचा आहेच पण मोठी मंडळी सुद्धा आवडीने खातील. तीन ते चार दिवस सहज टिकणारा आणि नाश्त्याच्या वेळी खाता येणारा असा केक अवघ्या २० मिनिटांत तयार होईल आणि त्यासाठी खूप कमी घटकांची गरज आहे.  चला तर मग आपला केक बनवायला काय काय साहित्य लागणार आहे ते आधी बघुयात!

साहित्य – गव्हाच्या पिठाचा केक

  1. गव्हाचे चे पीठ – दोन  वाट्या
  2. साखर (बारीक केलेली)  -एक   मोठी वाटी
  3. तूप -१ छोटी वाटी
  4. बेकिंग पावडर -१ छोटा चमचा
  5. बेकिंग सोडा -१/२  छोटा चमचा
  6. दुध -१/२ वाटी
  7. ड्रायफ्रुट्स-आवडीनुसार

बनविण्याची विधी – गव्हाच्या पिठाचा केक

  • सर्वप्रथम दोन वाटी कणिक 1  वाटी बारीक केलेली साखर,१ वाटी तूप आणि १/२ वाटी दुध एकत्र करून घ्या.
  • सर्व मिश्रण चमच्याने  छान फेटून घ्या.
  • फेटून घेतलेल्या मिश्रणात १ छोटा चमचा बकिंग पावडर १/२  छोटा चमचा बेकिंग सोडा  घाला
  • मिश्रण परत एकदा फेटून घ्या
  • आवडत असल्यास त्या मिश्रणात थोडे ड्राय फ्रुट्स घालू शकता
  • ज्या आकाराच्या भांड्यात केक बनवायचा आहे त्या भांड्याला थोडे तूप लावून त्यात हे मिश्रण व्यवस्थित ओता.
  • आता  शेगडी वर कुकर ठेवून, कुकरमध्ये खाली पाणी घालून त्यात छोटी जाळी, प्लेट किवा छोटे स्टँड ठेवून आता त्यावर हे मिश्रण ओतलेले भांडे ठेवा.
  • कुकरचे झाकण लावून घ्या.
  • कुकर च्या झाकणाची शिटी काढून घ्या, आपल्याला विना शिटीनेच केक बेक करायचा आहे.
  • १० मिनिटांनी शेगडी बंद करून कुकर थंड होऊ द्या.
  • आता झाकण उघडून  भांडे बाहेर काढा.

केक तयार आहे भांडे उलटवून केक एखाद्या थाळीत काढता येईल. केक छोट्या – छोट्या  तुकड्यामध्ये कापून सर्व करा.

गव्हाच्या पिठाचा केक

असा हा  मैदा, अंडी यांचा वापर न करता अगदी थोड्याशा साहित्यात बनणारा  दुध व तुपाचे पौष्टिक गुणांनी युक्त संपूर्ण शाकाहारी केक झटपट तयार होतो आणि चविष्ट असल्याने तितक्याच लवकर संपतोही….

गव्हामध्ये असणारे खनिजे जसे की मॅग्नेशियम आणि सेलेनियम हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. गव्हाच्या पिठाचा योग्य प्रमाणात वापर केल्यास, तो संपूर्ण आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो. म्हणूनच, गव्हाच्या पिठाचा समावेश केल्याने आपल्या आहारात पोषण मूल्य वाढते.

मग करायचा हा केक तयार?

महत्वाची सूचना: गव्हाच्या पिठात ग्लूटेन, हे एक प्रोटीन असते ज्याची काही लोकांना ऍलर्जी असते किंवा ते संवेदनशील असतात. सेलियाक रोग किंवा ग्लूटेन असहिष्णुता असलेल्या व्यक्तींनी गव्हाचे पीठ टाळावे.

आरोग्य आणि पोषण सूचना: या वेबसाइटवरील आरोग्य आणि पोषण माहिती सामान्य माहिती देण्यासाठी आहे. प्रत्येकाची पोषण गरज वेगवेगळी असू शकते. वैयक्तिक आहार सल्ल्यासाठी आपल्या आरोग्यतज्ञाचा सल्ला घ्या. आम्ही दिलेल्या माहितीची अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ही माहिती वैद्यकीय सल्ला नाही.

प्राची राजूरकर

प्राची पर्यावरण शास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीधर असून त्यात संशोधन देखिल करीत आहे. याचबरोबर ती शिक्षणशास्त्रात पदवीधर असून कायद्याची देखील पदवीधर आहे. थोडक्यात सांगायचेच तर ती एक संशोधक, शिक्षण व कायदेतज्ञ आहे, आणि मुख्यत्वे ती वनीकरण क्षेत्रात निपुण असून एका जवाबदार पदावर कार्य करीत आहे. तिला विविध सरकारी योजनाबद्दलचे माहिती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवायला आवडते जे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी तसेच मोठ्या सामाजिक परीवर्तनासाठी फायदेशीर ठरेल.

Share

Recent Posts

घरीच करा तपासणी: कलिंगडात भेसळ ओळखण्याचे घरगुती उपाय

उन्हाळा आला की सगळी जनता थेट "कलिंगड मोड" मध्ये शिफ्ट होते! एसीपेक्षा जास्त विश्वास कलिंगडावर ठेवणारे आपण, थोडी जरी गरमी… Read More

1 day ago

ग्रामीण भागातून आलेले भारतीय क्रिकेटपटू: संघर्ष, श्रम आणि शौर्याची कहाणी

भारतामध्ये क्रिकेट केवळ एक खेळ नाही तर एक भावना आहे. शहरांपासून ते खेड्यापर्यंत, प्रत्येक ठिकाणी क्रिकेटचा प्रभाव जाणवतो. मात्र, क्रिकेटसाठी… Read More

2 days ago

टोल नाक्याविना प्रवास: जीपीएस-आधारित टोल प्रणाली येतेय!

पूर्वी प्रवास करताना टोल नाक्यावर रोख पैसे देऊन रांगेत थांबणं ही एक सवयच होती. २०१४ नंतर FASTag प्रणाली आली आणि… Read More

2 days ago

This website uses cookies.