किड्स कॉर्नर

माझ्या नावात फिश आहे… पण मी फिश नाही! — जेलीफिश

“सारा समंदर मुझे जेलीफिश के नाम से जानता है… और इस समंदर में मेरी वही हैसियत है जो जंगल में शेर की होती है!”

हा डायलॉग “कालीचरण” या हिंदी सिनेमात शोभेल, पण तो जर एखादी जेलीफिश म्हणाली, तर कोणाला आश्चर्य वाटणार नाही! कारण जेलीफिश दिसायला जितकी सुंदर आणि आकर्षक, तितकीच ती कधी कधी घातकही असते. आणि सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे — जेलीफिश नावात ‘फिश’ असलं तरी ती मुळीच मासा नाही!

जेलीफिश म्हणजे काय?

जेलीफिश, ज्याला ‘समुद्री जेली’ किंवा फक्त ‘जेली’ म्हणूनही ओळखले जाते, हे तब्बल ५० कोटी वर्षांपासून पृथ्वीवर अस्तित्वात आहे! त्यांना अनेक वेळा ‘समुद्रातील छत्री’ असेही म्हटले जाते.

  • हे पाठीचा कणा नसलेले प्राणी (invertebrates) आहेत.
  • त्यांच्या शरीरात हृदय, मेंदू, हाडं किंवा फुफ्फुसं नसतात.
  • शरीराचा मध्य भाग “कॅलिक्स” किंवा “घंटा” सारखा असतो.
  • या घंटा काही साध्यासुध्या नाहीत — त्या डंख मारणाऱ्या पेशींनी सुसज्ज असतात.
  • या पेशींना नेमॅटोसिस्ट म्हणतात. त्या शिकार पकडण्यासाठी किंवा बचावासाठी वापरल्या जातात.

काही जेलीफिश गतिमान नसून, देठांनी समुद्रतळावर अडकलेले असतात. त्यांचे तोंड आणि पोटाभोवतीही नेमॅटोसिस्ट असू शकतात.

जीवनचक्र कसे असते?

  1. अंडी → 2. प्लॅन्युला लार्वा/अळी → 3. पॉलीप → 4. मेडुसा
  2. मेडुसा ही लैंगिक अवस्था असते.
  3. मेडुसा अवस्था वाढते, प्रजनन करते आणि काही महिन्यांत मरते.
  4. जेलीफिश एकलिंगी असून, नर आणि मादी सारखेच दिसतात.
  5. प्रजातीप्रमाणे त्यांचा आकार ३ सेमी ते ३ मीटर पर्यंत असतो.
  6. ते मुख्यतः मांसाहारी असतात — प्लँक्टोनिक जीव, लहान मासे, अंडी इत्यादी खातात.

प्रकार आणि वर्गीकरण

प्रकारवैशिष्ट्य
सायफोझोआमोठी जेलीफिश (200+ प्रजाती)
क्युबोझोआबॉक्स जेलीफिश (50 प्रजाती)
स्टॉरोझोआदेठ असलेली (50 प्रजाती)
हायड्रोझोआलहान, गोड्या पाण्यातील (1000–1500 प्रजाती)
  • सायफोझोअन्स: “खरे जेलीफिश” (समुद्रात)
  • हायड्रोझोअन्स: गोड्या पाण्यातील

खाण्यायोग्य का?

काही जेलीफिश प्रजाती खाण्यायोग्य असतात, विशेषतः चीन, जपान, कोरियामध्ये.

  • जसे की Rhopilema esculentumStomolophus meleagris
  • यांचा वापर औषधांमध्ये, कोलेजनमध्ये होतो.
  • सायफोझोआ प्रजातींमधील फक्त १२ च प्रजाती खाद्यपदार्थात वापरतात.

हानिकारक कशा असतात?

  • नेमॅटोसिस्ट डंखामुळे त्वचेवर पुरळ, सूज, श्वासाचा त्रास होतो.
  • जगभर हजारो पोहणाऱ्यांना जखम होते.
  • महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, मालवण, वेंगुर्ले, वायंगणी भागात मच्छीमार अडकतात.
  • जेलीफिश जाळ्यात अडकतात आणि काढताना खाज येते, त्रास होतो.

समुद्रातील इकोसिस्टममधील भूमिका

  • जेलीफिश मोठ्या प्रमाणात झाल्यावर मत्स्य उद्योग, पॉवर प्लांट्स इत्यादींवर परिणाम होतो.
  • समुद्रातील अन्नसाखळीतील भूमिका महत्त्वाची आहे.

मजेदार माहिती

  • जेलीफिश गटाला स्मॅक” म्हणतात.
  • यांचे Fossils दुर्मिळ आहेत कारण त्यांचं शरीर सौम्य असतं.
  • Stygomedusa gigantea — सर्वात मोठी जेलीफिश
  • Staurocladia — फक्त ०.५ मिमी लहान!
  • Turriopsis dohrnii — कधीही न मरणारी “अमर” प्रजाती
  • ऑक्सिजन कमी असलेल्या पाण्यातही जगतात.
  • खारट पाणी, उबदार तापमान आणि प्रदूषण — जेलीफिशसाठी पोषक.
  • हवामान बदलामुळे त्यांची संख्या वाढते.

तर बालमित्रांनो, आता तुम्हाला कळलं ना की “जेलीफिश फिश नाहीच!” — ती आहे एक प्राचीन आणि अनोखी समुद्री रहिवासी!

ती काही वेळा निरागस, पारदर्शक आणि रंगीबेरंगी दिसते, पण तिच्या विषारी डंखामुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे समुद्रकिनारी जाताना सावध राहा, जेलीफिश पाहा, पण हात लावू नका!

सुट्ट्यांचा आनंद घ्या, पण सुरक्षिततेचीही काळजी घ्या!

प्राची राजूरकर

प्राची पर्यावरण शास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीधर असून त्यात संशोधन देखिल करीत आहे. याचबरोबर ती शिक्षणशास्त्रात पदवीधर असून कायद्याची देखील पदवीधर आहे. थोडक्यात सांगायचेच तर ती एक संशोधक, शिक्षण व कायदेतज्ञ आहे, आणि मुख्यत्वे ती वनीकरण क्षेत्रात निपुण असून एका जवाबदार पदावर कार्य करीत आहे. तिला विविध सरकारी योजनाबद्दलचे माहिती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवायला आवडते जे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी तसेच मोठ्या सामाजिक परीवर्तनासाठी फायदेशीर ठरेल.

Recent Posts

काजवा महोत्सव: निसर्गाचा एक जादुई अनुभव

मे महिना सुरू झाला की पावसाळ्यापूर्वीचं दमट वातावरण जाणवायला लागतं आणि त्याच वेळी एक अद्भुत निसर्गनाट्य घडू लागतं. संध्याकाळी झाडांवर… Read More

ग्वार गम: कोरडवाहू भागात सोन्यासारखा पर्याय

ग्वार/ गवार (Cluster Beans / Cyamopsis tetragonoloba) हे खरं तर एक साधंसं पीक वाटतं, ग्रामीण भागात सहजपणे घेतलं जातं. पण… Read More

इथेनॉल उत्पादनात भारताची वाटचाल: संधी, स्थान आणि सावधगिरी

भारताने पेट्रोलमध्ये इथेनॉलचे (Ethanol) 20% मिश्रण (E20) 2030 च्या उद्दिष्टापेक्षा पाच वर्ष आधी, म्हणजे 2025 मध्ये पूर्ण केलं आहे. पण… Read More