घुबड, Image credit: https://commons.m.wikimedia.org/wiki/File:Indian_Eagle_Owl_2.jpg
बालमित्रांनो, हॅरी पॉटर (Harry Potter) मालिकेत जादूच्या जगात दूत म्हणून काम करणारा घुबड तुम्ही पाहिला असेलच. विनी द पू (Winnie-the-Pooh) मध्ये घुबडाचे पात्र ज्ञानाचे प्रतिनिधित्व करते, हेही तुम्हाला माहिती आहेच! पण “काय रे घुबडतोंड्या!” असं उपहासाने कोणी तरी म्हणताना ऐकलंय ना? काही लोक तर मला अशुभही मानतात. पण हे सगळं चुकीचं आहे बरं का! मी आहे घुबड- एक अनोखा आणि अद्वितीय पक्षी.
मी स्ट्रिजिफॉर्मेस (Strigiformes) या वर्गातील एकाकी आणि निशाचर शिकारी पक्षी आहे. माझ्या रात्रीच्या सवयी, वेगळं रूप आणि शिकार करण्यात असलेल्या कौशल्यामुळे लोक मला वेगळ्या नजरेने पाहतात. आम्ही मुख्यतः सस्तन प्राणी, कीटक आणि इतर लहान पक्ष्यांची शिकार करतो. काही आमच्या प्रजाती मासे पकडण्यातही तरबेज आहेत!
जगभरात माझ्या २०० पेक्षा जास्त प्रजाती आढळतात, तर भारतात सुमारे ६० प्रजाती आणि उपप्रजाती आहेत. माझ्यातील सर्वात छोटा सदस्य म्हणजे एल्फ आऊल, ज्याची उंची केवळ ५ ते ६ इंच असते. तर माझ्यातलाच एक भला मोठा सदस्य म्हणजे ग्रेट ग्रे आऊल, ज्याची उंची तब्बल ३२ इंचांपर्यंत जाऊ शकते!
भारतीय संस्कृतीत मला लक्ष्मी देवीचे वाहन मानतात. मला शुभ आणि धनसंपत्तीचे प्रतीक मानले जाते. काहींनी मला बुद्धिमान पक्षीही म्हटले आहे. घुबडाला भूत आणि भविष्य दोन्हीचे ज्ञान आधीपासूनच आहे असे मानतात. ग्रीक पुराणकथेनुसार घुबड हा अथीना, ज्ञानाची देवता यांच्याशी संबंधित आहेत तर अमेरिकन दंत कथांमध्ये बहुतेकदा शक्तिशाली आध्यात्मिक प्राणी म्हणून घुबडांचे उल्लेख आढळतात, परंतु बरेच लोक घुबडला भीत असल्यामुळे या भीतीपोटीच त्याला अशुभ मानले जाते.
या पक्ष्यांचा अधिवास स्मशानात सर्वाधिक असतो. कारण ढोली असलेली, स्थानिक प्रजातींची मोठी झाडं तेथे असतात. त्यांचे डोळे लाल गडद असतात म्हणून लोक भितात. तसेच त्यांच्याबद्दल अंधश्रद्धा पसरवतात. घुबडाला मारण्याचे प्रकार होतात. घुबड हे अशुभाचे प्रतीक आहे, ही अंधश्रद्धा थांबवली पाहिजे.
घुबड या पक्षाची वैशिष्ट्ये
बालमित्रांनो, माझं म्हणजेच आम्हा घुबडांचं आयुष्य सध्या थोडं कठीण झालंय. मानवी कृतींमुळे आम्ही अनेक संकटांना सामोरं जात आहोत.
तर बालमित्रांनो, अंधाऱ्या रात्री जर माझी भेट झाली तर अजिबात घाबरू नका. लक्षात ठेवा, मी आहे तुमचा मित्र – “रात्रीचा सम्राट”! मी आहे घुबड – एक अनोखा आणि अद्वितीय पक्षी!
तुम्हाला अशा गमतीशीर, विज्ञानावर आधारित निसर्गकथा आवडतात का? मग, आमच्या बाल विभागात अधिक कथा शोधा.
२०२५ मध्ये भारतीय महिला क्रिकेटने इतिहास रचला — पहिल्यांदाच ICC महिला क्रिकेट विश्वचषक भारताच्या झोळीत आला! हा फक्त एक क्रीडा… Read More
कल्पना करा, एखाद्या शनिवार-रविवारी शहरातील कुटुंब शेतावर येतं, सकाळी पक्ष्यांच्या आवाजाने उठतं, दुपारी पिठलं-भाकरी खातं, आणि संध्याकाळी गावकऱ्यांसोबत शेकोटीजवळ बसून… Read More
भारतीय शेतकऱ्यांसाठी कडूलिंब म्हणजे फक्त झाड नाही — ते आपल्या शेतीचं आणि संस्कृतीचं प्रतीक आहे. जवळजवळ प्रत्येक गावात, मंदिराजवळ किंवा… Read More