Teak Plantation, Image credit: https://www.needpix.com/
वा! काय सुंदर फर्निचर होत त्या जुन्या बंगल्यातल! नक्कीच सागवान असणार! असे वाक्य कधी ना कधी आपल्या कानावर पडतच असतील. कारण अगदी पुरातन काळापासून साग या वृक्षाला ओळखल्या जाते त्याच्या मजबुतीसाठी. भारतात २,००० हून अधिक वर्षांपासून सागाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.
बालमित्रांनो, झाडाचे महत्त्व सांगणारा एक सुंदर संस्कृत श्लोक असा आहे:
“दशकूपसमा वापी, दशवापीसमो ह्रदः।
दशह्रदसमो पुत्रो, दशपुत्रसमो द्रुमः॥”
याचा अर्थ — एक जलकुंड दहा विहिरींसारखे, एक तलाव दहा जलकुंडांसारखा, एक पुत्र दहा तलावांसारखा, आणि एक वृक्ष दहा पुत्रांसारखा आहे.
सागवान (Tectona grandis) ही लॅमियासी कुटुंबातील उष्णकटिबंधीय वृक्षप्रजाती आहे. भारत, म्यानमार, लाओस यांसारख्या देशांमध्ये हा मूळचा आढळतो. टीक हे नाव पोर्तुगीज भाषेतील ‘टेका’ या शब्दावरून आले आहे.
भारतात सागवान प्रामुख्याने कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि विशेषतः चंद्रपूर व पश्चिम घाटातील भागात आढळतो. चंद्रपूरचा सागवान Ram Mandir, Central Vista प्रकल्प, राष्ट्रपती भवन यांसारख्या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे.
सागवान लाकडाला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय मोठी मागणी आहे. त्याच्या टिकाऊपणामुळे लाकूड उद्योगात मोठे योगदान आहे. किंमती ₹1,500–₹3,000 प्रति घनफूटच्या घरात असतात.
लाकूडतोड, फर्निचर निर्मिती, हस्तकला, कारागिरीत मोठ्या प्रमाणावर रोजगार
सागवान लाकडाची निर्यात युरोप, मिडल ईस्ट, आग्नेय आशिया याठिकाणी होते. भारताच्या परकीय गंगाजळीत भर पडते.
सागवान झाडे कृषी वनीकरणात लावता येतात. शेतकऱ्यांना पिकांसोबत झाडे जोपासता येतात, मातीचे आरोग्य सुधारते व जैवविविधता वाढते.
सागवान मंदिरे, राजवाडे, समारंभिक बांधकामात वापरले जाते. सांस्कृतिक वारशाचे रक्षण करते.
नाही. सागवान झाडे पूर्णतः सुरक्षित आणि विषारी नसतात.
बालमित्रांनो, सागवान (Tectona grandis) म्हणजे केवळ झाड नाही, तर एक संपूर्ण जग आहे — सौंदर्य, उपयोग, टिकाऊपणा आणि नैसर्गिक समृद्धी यांचे प्रतीक. तुम्ही सागवान झाड पाहिलं तर त्याच्या महत्त्वाची जाणीव ठेवा, आणि त्याचे रक्षण करा. सागवान झाड म्हणजे निसर्गाचा खजिना आहे!
टीप: या लेखातून तुम्ही एक लाकडाचं झाड किती उपयोगी असू शकतं, ते शिकलात. तुमच्या गावात कुठे सागवान आहे का ते पाहा आणि शाळेत, घरी, मित्रांसोबत त्याबद्दल बोलायला विसरू नका!
मे महिना सुरू झाला की पावसाळ्यापूर्वीचं दमट वातावरण जाणवायला लागतं आणि त्याच वेळी एक अद्भुत निसर्गनाट्य घडू लागतं. संध्याकाळी झाडांवर… Read More
ग्वार/ गवार (Cluster Beans / Cyamopsis tetragonoloba) हे खरं तर एक साधंसं पीक वाटतं, ग्रामीण भागात सहजपणे घेतलं जातं. पण… Read More
भारताने पेट्रोलमध्ये इथेनॉलचे (Ethanol) 20% मिश्रण (E20) 2030 च्या उद्दिष्टापेक्षा पाच वर्ष आधी, म्हणजे 2025 मध्ये पूर्ण केलं आहे. पण… Read More