Recipes

स्वीट कॉर्न चे स्वादिष्ट आणि पौष्टिक असे पकोडे

अनेक लोकांना स्वीट कॉर्न खायला आवडते. शहर असो वा गाव, बहुतेक लोकांना स्वीट कॉर्न कणीस खायला आवडते. लोक ते मोठ्या उत्साहाने खातात. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असल्या तरी, काही लोक ते भाजून खातात, तर काही लोक ते उकळवून किंवा वेगवेगळ्या स्नॅक्समध्ये मिसळून खातात. चला तर मग बनवूया स्वीट कॉर्न चे पकोडे!

स्वीट कॉर्नमध्ये व्हिटॅमिन ए, बी, ई सारखे अँटिऑक्सिडेंट, खनिज आणि पौष्टिक गुणधर्म असतात, जे अनेक आरोग्य समस्यांवर मात करण्यास मदत करतात.आणि अशाच या स्वीट कॉर्न चा काहीसा चटपटीत पदार्थ बनवला तर बच्चे कंपनी च काय तर मोठी मंडळी देखील पुन्हा पुन्हा मागून खातील हा पदार्थ! हो मग आज आपणबनवणार आहोत स्वीट कॉर्न चे चटपटीत ,स्वादिष्ट आणि पौष्टिक असे पकोडे! जे सकाळच्या  किवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट पदार्थ आणि तोही झटपट बनणारा, आणि टोमाटो च्या चटणी किवा सॉस  बरोबर खाण्यास एकदम भारी!

तर हे स्वीट कॉर्न चे पकोडे बनवायला आपल्याला काय काय साहित्य लागेल ते बघा.

Related Post

बनविण्यासाठी लागणारे साहित्य- स्वीट कॉर्न चे पकोडे

  1. स्वीट कॉर्ण-१ (स्वीट कॉर्ण चे दाणे सोलून मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यावे)
  2. तांदळाचे पीठ -१/२ वाटी
  3. बेसन -१ चमचा
  4. हिरवी मिरची -४ बारीक कापलेली
  5. कांदा -१ बारीक  कापलेला
  6. कढीपत्ता-२ पाने
  7. कोथिंबीर -४-५ काड्या  बारीक  कापलेला
  8. मीठ -१ चमचा
  9. ओवा -चिमुटभर
  10. तीळ-१/२ छोटा चमचा
  11. हिंग -चिमुटभर
  12. जिरे पावडर  १/२ चमचा
  13. हळद -१/२ चमचा
  14. लाल तिखट -१ चमचा
  15. तेल  तळण्याकरिता

बनविण्याची विधी- स्वीट कॉर्न चे पकोडे

  • सर्वप्रथम मिक्सर मधून जाडसर वाटून घेतलेले स्वीट कॉर्न चे दाणे एका मोठ्या पातेल्यात काढून घ्यावे.
  • आता त्यात वर दिलेल्या प्रमाणात तांदळाचे पीठ,बेसन,बारीक कापलेला कांदा,हिरवी मिरची ,कढीपत्ता,कोथिंबीर, तिखट, हळद, मीठ,ओवा,तीळ,हिंग,जिरे पावडर  घालून मिश्रण चांगले एकजीव करावे.
  • आता कढई त तेल गरम करून त्यात वरील मिश्रणाचे छोटे छोटे पकोडे तळून घ्यावेत.
  • गरमागरम पकोडे टोमाटो ची चटणी किवा सास सोबत सर्व करावे.

स्वीट कॉर्न खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. स्वीट कॉर्नचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. कारण स्वीट कॉर्नमध्ये व्हिटॅमिन ए, बी, ई सारखे अँटिऑक्सिडेंट, खनिज आणि पौष्टिक गुणधर्म असतात, जे अनेक आरोग्य समस्यांवर मात करण्यास मदत करतात. यासोबतच यामध्ये फायबरचे प्रमाणही आढळते, जे याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते. स्वीट कॉर्नमध्ये खनिज क्षारही पुरेशा प्रमाणात आढळतात.

स्वीट कॉर्नचे सेवन केल्याने आरोग्याशी संबंधित अनेक आजार बरे होण्यास मदत होते. स्वीट कॉर्नमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्सचे गुणधर्म आढळतात, जे डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतात.स्वीट कॉर्नमध्ये भरपूर लोह, व्हिटॅमिन बी 12 आणि फॉलिक आम्ल असते, जे रक्तक्षय दूर करण्यास मदत करते.

प्राची राजूरकर

प्राची पर्यावरण शास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीधर असून त्यात संशोधन देखिल करीत आहे. याचबरोबर ती शिक्षणशास्त्रात पदवीधर असून कायद्याची देखील पदवीधर आहे. थोडक्यात सांगायचेच तर ती एक संशोधक, शिक्षण व कायदेतज्ञ आहे, आणि मुख्यत्वे ती वनीकरण क्षेत्रात निपुण असून एका जवाबदार पदावर कार्य करीत आहे. तिला विविध सरकारी योजनाबद्दलचे माहिती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवायला आवडते जे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी तसेच मोठ्या सामाजिक परीवर्तनासाठी फायदेशीर ठरेल.

Recent Posts

शेती उत्पन्न आणि आयकर: ITR फाईल करताना शेतकऱ्यांनी काय लक्षात ठेवावं?

"Income Tax", "ITR", "ITR Filing", "ITR Filing Deadline" - जुलै महिना आला की हे शब्द गुगल वर सर्वाधिक शोधले जातात.… Read More

ग्रामीण भारतात रोजगाराच्या नव्या शक्यता: TCS Layoff च्या पार्श्वभूमीवर एक विचारमंथन

भारतातील अग्रगण्य IT सेवा कंपनी TCS (Tata Consultancy Services) ने अलीकडे 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची घोषणा केली. ही घटना… Read More

व्हे प्रोटीन म्हणजे काय?

आज आरोग्य आणि पोषण या विषयांमध्ये लोकांचा रस झपाट्याने वाढत आहे. या प्रवाहात “व्हे प्रोटीन”/ (Whey Protein)  हा शब्द अनेकदा… Read More