करटोली, Image Credit: https://en.wikipedia.org/wiki/File:Erumapaval.JPG
पावसाळा म्हणजे रानभाज्यांचा ऋतू. सगळीकडे रानभाजी महोत्सव सुरु होतात. याच पावसाळ्यात हमखास उपलब्ध होणारी एक अत्यंत पौष्टिक अशी रानभाजी म्हणजेच करटोली. करटोली या वनस्पतीला ‘कारटोली’, ‘काटवल’, ‘कंटोळा’, ‘कंटोली’, ‘रानकारली’, ‘कर्कोटकी’, ‘करटुली़’ अशीही स्थानिक नावे आहेत. या रानभाजीचे शास्त्रीय नाव मोमॉर्डिका डायोइका (Momordica dioica) असे असून इंग्रजी भाषेत करटोलीला ‘वाइल्ड करेला फ्रूट’ (Wild Karela Fruit) असे म्हणतात. चला जाणून घेऊया या रेसिपीचा वापर करून स्वादिष्ट पण पौष्टिक करटोली ची भाजी कशी बनवायची.
ही रान भाजी वर वर दिसायला जरी काटेरी दिसत असली तरी म्हणतात ना काय भुललासी वरलिया रंगा ! त्याचप्रमणे या भाजीच्या वर वरच्या रंग व स्वरूप न बघता यातील औषधी गुणधर्म घरातील लहानांपासून मोठ्या मंडळी करिता सुद्धा लाभदायक आहे. पावसाळ्यातील विकारांवर करटोलीची भाजी हितावह आहे. त्वचारोग होऊ नयेत म्हणून ही भाजी अवश्य खावी.
तर आज आपण बनवूयात चना डाळ घालून करटोली ची भाजी. सकाळच्या किंवा रात्रीच्या जेवणात हि भाजी पोळी किंवा भाताबरोबर सहज खाता येईल. चला तर मग हि भाजी बनवायला काय काय साहित्य लागेल ते बघूया!
मोमॉर्डिका डायोइका (करटोली) ही कुकुर्बिटेसी कुलातील वनस्पती आहे, जी आशियातील एक मूलस्थानिक वेल आहे. भारत आणि बांगलादेशात ती मोठ्या प्रमाणावर आढळते. कंटोळा ही वनस्पती विविध रोगांच्या प्रतिबंधक आणि उपचारात्मक गुणधर्मांसाठी ओळखली जाते. ही वनस्पती पोषणमूल्यांनी समृद्ध असून, हजारो वर्षांपासून भाजीपाला म्हणून वापरली जात आहे. कंटोळा वनस्पतीमध्ये अल्कलॉइड्स, ग्लायकोसाइड्स, स्टेरॉइड्स, ट्रायटरपेनॉइड्स, फ्लेवोनॉइड्स, उर्सोलिक असिड, जीवनसत्त्वे, खनिजे आणि भरपूर प्रमाणात तंतू असतात, जे दमा, सूज, ताप, मानसिक आणि पाचनासंबंधी विकार यांसारख्या आजारांवर गुणकारी असतात. त्वचेच्या आरोग्याची देखभाल करण्यासाठीही ही वनस्पती उपयोगी आहे.
करटोली हे डोकेदुखीवरील उत्तम औषध आहे. करटोलीचे फळ कडू, उष्ण, संसर्गरक्षक आहे. वात, कुष्ठरोग, मूत्रस्राव, प्रमेह व मधुमेहात करटोलीची फळे उपयुक्त आहेत. अति लाळ सुटणे, मळमळ, हृदयाचे त्रास यातही करटोली गुणकारी आहे. रक्तरोग, डोळ्यांचे रोग, या विकारांत करटोलीचा वापर करतात. कच्चे फळ भाजी म्हणून वापरतात. हे तापातून उठलेल्या रोग्यास पोषक म्हणून देतात.
मे महिना सुरू झाला की पावसाळ्यापूर्वीचं दमट वातावरण जाणवायला लागतं आणि त्याच वेळी एक अद्भुत निसर्गनाट्य घडू लागतं. संध्याकाळी झाडांवर… Read More
ग्वार/ गवार (Cluster Beans / Cyamopsis tetragonoloba) हे खरं तर एक साधंसं पीक वाटतं, ग्रामीण भागात सहजपणे घेतलं जातं. पण… Read More
भारताने पेट्रोलमध्ये इथेनॉलचे (Ethanol) 20% मिश्रण (E20) 2030 च्या उद्दिष्टापेक्षा पाच वर्ष आधी, म्हणजे 2025 मध्ये पूर्ण केलं आहे. पण… Read More