Agriculture

मातीचे गुणधर्म: शेतीसाठी माती किती उपयुक्त आहे हे कशावर ठरते?

शेतीसाठी माती किती उपयुक्त आहे, याचा निर्णय केवळ तिच्या प्रकारावरच नाही, तर तिच्या विविध गुणधर्मांवर देखील अवलंबून असतो. योग्य मातीमध्ये पिके चांगली वाढतात, पोषणद्रव्यं सहज मिळतात, आणि जलधारणक्षमता चांगली असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मातीचे गुणधर्म (Soil Properties) समजून घेणं फार महत्त्वाचं आहे.

भारतामध्ये आढळणाऱ्या मातीचे प्रकार व त्यांचे शेतीतील महत्त्व यावर आधारित लेख तुम्ही इथे वाचू शकता – भारतामधील मातीचे प्रकार आणि त्यांचे शेतीतील महत्त्व

या लेखात आपण मातीचे मुख्य तीन प्रकारचे गुणधर्म पाहणार आहोत: भौतिक, रासायनिक, आणि जैविक.

१. भौतिक गुणधर्म (Physical Properties):

भौतिक गुणधर्म जसे की पोत, छिद्रता आणि जलधारण क्षमता हे ठरवतात की बीज उगम किती सहज होईल, मुळे कशी वाढतील, आणि पाणी व हवा किती सहज मातीमध्ये खेळती राहतील.  मातीच्या भौतिक गुणधर्माची यादी खाली दिली आहे –

  • मातीची पोत (Texture) – वाळू, गाळ आणि चिकटणारे कण यांचे प्रमाण.
  • मातीची रचना (Structure) – मातीच्या कणांचा एकत्रितपणा.
  • छिद्रता (Porosity) – मातीतील रिकाम्या जागा, ज्यातून हवा व पाणी जाऊ शकते.
  • जलधारण क्षमता (Water Holding Capacity) – पाणी साठवून ठेवण्याची क्षमता.
  • बल्क घनता (Bulk Density) – कोरड्या मातीचे वजन प्रति घनफूट.
  • मातीचा रंग  (Soil color) – लोखंड, सेंद्रिय द्रव्य व खनिजांवर आधारित.
  • तापमान (Temperature)– बीज उगम व सूक्ष्मजीव क्रियेवर प्रभाव.

२. रासायनिक गुणधर्म (Chemical Properties)

रासायनिक गुणधर्म म्हणजेच पोषक तत्त्वांची उपलब्धता, मातीचे pH मूल्य, व सेंद्रिय कर्ब यावर पीक किती समतोल पोषण घेईल हे ठरतं. मातीच्या रासायनिक गुणधर्माची यादी खाली दिली आहे –

Related Post
  • pH मूल्य – आम्लता किंवा क्षारीपणा.
  • कॅशन एक्सचेंज क्षमता (Cation Exchange Capacity -CEC) – अन्नद्रव्ये धारण व अदलाबदल करण्याची क्षमता.
  • पोषक तत्त्वे (Nutrients) – नत्र (N), स्फुरद (P), पालाश (K), झिंक, लोह, मँगनीज.
  • सेंद्रिय कर्ब (Organic Carbon) – सुपीकतेचा मुख्य घटक.
  • विद्युत चालकता (EC) – मातीतील क्षारांचे प्रमाण.

३. जैविक गुणधर्म (Biological Properties)

जैविक गुणधर्म हे मातीतील सूक्ष्मजीव, गांडुळे आणि इतर जिवंत घटकांशी संबंधित असतात. हे घटक मातीला ‘जिवंत’ ठेवतात आणि तिची सुपीकता नैसर्गिकरीत्या वाढवतात. मातीच्या जैविक गुणधर्माची यादी खाली दिली आहे –

  • सूक्ष्मजीवांची क्रिया (Microbial activity) – जिवाणू (नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जिवाणूंची उपस्थिती – उदाहरणार्थ Rhizobium, Azotobacter), बुरशी (मायकोरायझा / Mycorrhiza), कृमी, इ.
  • सेंद्रिय घटकांचे प्रमाण (Organic Matter) – मातीतील सजीव सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतात आणि ते करताना वनस्पतींना ग्रहणासाठी पोषक द्रव्ये उपलब्ध करून देतात.
  • मातीचे श्वसन (Soil Respiration) – मातीतील जीवनसत्त्व क्रियाशील आहे की नाही याचे निदर्शक.
  • रायझोस्फिअर (Rhizosphere) – मुळांच्या आजूबाजूची जैविक क्रियाशीलता.

मातीचे गुणधर्म सुधारण्यासाठी उपाय

गुणधर्माचा प्रकारसुधारण्यासाठी उपाय
भौतिक गुणधर्मशेणखत, कंपोस्ट व गांडूळ खत वापरून मातीची रचना सुधारा कमीत कमी मशागत (minimum tillage)गव्हाच्या किंवा हरभऱ्याच्या काड्यांनी माती झाकणे (mulching)
रासायनिक गुणधर्ममाती परीक्षण करून योग्य प्रमाणात खत व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी कंपोस्ट व हिरवळीच्या खताचा वापर क्षारी/आम्ल मातीसाठी चूना किंवा सल्फर वापरा (pH संतुलनासाठी)
जैविक गुणधर्मजैविक खतांचा वापर वाढवा (जैविक शेतीची तत्त्वे पाळा) सूक्ष्मजीवयुक्त द्रव्ये (जसे की जिवामृत, बीजामृत, दशपर्णी अर्क) चा वापर वाढवापीक पालट व आंतरपीक पद्धतीने जैवविविधता वाढवा – शेंगावर्गीय पिकांची आंतरपिके/पालटपिकेसेंद्रिय कार्बन वाढवणाऱ्या पद्धती (leaf litter, compost mulch इ.) वाढवा

माती ही फक्त एक माध्यम नसून, ती आपल्या शेतीची खरी पायाभूत संपत्ती आहे. तिचे गुणधर्म समजून घेणं म्हणजे पिकांच्या गरजांनुसार योग्य निर्णय घेण्याचं शक्तिशाली साधन मिळवणं.

शेतकरी म्हणून आपल्याला या तिन्ही प्रकारांतील गुणधर्म ओळखून त्यांची संतुलित सुधारणा करणे गरजेचे आहे. कारण हीच ती कळीची गोष्ट आहे जी जमिनीपासून उत्पादनापर्यंतचा प्रवास ठरवते.

आणि जर हे सर्व गुणधर्म समजून घ्यायचे असतील, तर माती परीक्षण हाच सर्वोत्तम मार्ग आहे. पण त्यासाठी नमुना घेण्याची योग्य पद्धत अवलंबणं आवश्यक आहे.

वाचा: माती परीक्षणासाठी नमुने कसे गोळा करावे?

प्रणाली तेलंग

प्रणाली AG मराठी ची संस्थापक आणि संपादक आहेत. ती कृषी, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनावर ताज्या बातम्या आणि लेख लिहिते. तिने पर्यावरण शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा देखील पूर्ण केला आहे. ती एक प्रशिक्षित शिक्षिकाही आहे. तिने 5 वर्षे शिक्षण, संशोधन आणि विकास क्षेत्रात काम केले आहे.

Recent Posts

“Future of Jobs 2025” – ग्रामीण भारतातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने

भारताच्या ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची परिस्थिती जवळजवळ सारखीच असते. घरात शेती, पावसावर अवलंबून उत्पन्न, आणि शिक्षण म्हणजे आयुष्य बदलण्याची एकमेव… Read More

वाळवंटातली शेती: इराणच्या कृषी व्यवस्थेचा आढावा

आजच्या जागतिक घडामोडींमुळे इराण पुन्हा चर्चेत आहे. अर्थव्यवस्था, ऊर्जा संसाधने आणि भू-राजकारण या विषयांबरोबरच इराणच्या शेतीबद्दलही उत्सुकता वाढली आहे. पहिल्या… Read More

जागतिक मृदा दिवस: भारतातील माती, अन्नसुरक्षा आणि सेंद्रिय कार्बन घट

दरवर्षी ५ डिसेंबर रोजी जगभरात जागतिक मृदा दिवस (World Soil Day) साजरा केला जातो. FAO आणि संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकाराने सुरू… Read More