Recipes

फोडणीची अक्खी मसूर: पौष्टिकता आणि स्वादाचा एकत्रित आनंद

मसूर डाळ (Red Lentils/ Masoor Dal) ज्याला लाल मसूर म्हणूनही ओळखले जाते, भारतीय पाककृतीमध्ये त्याच्या अफाट पौष्टिक मूल्यांमुळे आणि उपचारात्मक फायद्यांमुळे खूप लोकप्रिय आहे. एक वाटी मसूर डाळ आपल्या दैनंदिन महत्त्वाच्या पोषक तत्वांची गरज भागवण्यासाठी पुरेशी आहे. झटपट शिजणारी आणि गोडसर चवीची मसूर डाळ ही प्रथिनांनी (Protein) भरपूर आणि लोह (Iron), तांबे (Copper), मॅग्नेशियम (Magnesium) , आणि फॉलेटसारख्या (Folate,) आवश्यक पोषक घटकांनी समृद्ध आहे. तर अशा या पौष्टीक्तेत भर घालणाऱ्या मसूर डाळीचा पदार्थ आपण बनवणार आहोत.

फोडणीची अक्खी मसूर म्हणजेच मसूर डाळीला फोडणी घालून बनवलेला पदार्थ, यालाच पंजाब  प्रांतात दाल मखनी (Dal Makhani) म्हणून सुद्धा ओळखले जाते, परंतु दाल मखनी मध्ये मसूर डाळीच्या सोबत इतर काही डाळीचा सुद्धा वापर करतात, पण आज आपण केवळ अक्खी मसूर वापरून हि रेसिपी (Masoor Dal Recipe) बनवणार आहोत. अगदी आपल्या खास महाराष्ट्रीयन पद्धतीने! आणि तेही फक्त २०-२५ मिनिटांमध्ये!

चला तर मग सुरु करूयात !

बनवण्यास लागणारे साहित्य (२ व्यक्तींसाठी)-फोडणीची अक्खी मसूर

  • अक्खी मसूर(Red Lentils)  -१  मोठी वाटी
  • कांदा (onion) -१ बारीक कापलेला
  • टमाटर (Tomato)-१ बारीक कापलेला
  • हिरवी मिरची(green chilly) -२ बारीक कापलेली
  • कोशिंबीर (coriander)-३-४ काड्या बारीक कापलेली
  • लसून(garlic) – ४-५ पाकळ्या बारीक कापलेला
  • लाल तिखट (Red chili powder) -१ टेबलस्पून
  • मीठ (Salt)- १/२  टेबलस्पून
  • हळद (Turmeric powder)- चिमुटभर
  • तेल(oil) -गरजेप्रमाणे

बनविण्याची विधी- फोडणीची अक्खी मसूर

  • सर्वप्रथम १ वाटी मसूर मध्ये दोन वाट्या पाणी घालून १० मिनिटे भिजत ठेवा.
  • १० मिनिटांनी भिजलेली मसूर पाण्यातून काढून चाळणीत निथळत ठेवा,
  • त्यानंतर प्रेशर कुकर gas वर चढवा
  • कुकर गरम झाला कि त्यात तीन चमचे  तेल घालून तेल गरम होऊ द्या
  • तेल गरम झाल्यावर त्यात जिरे मोहरी टाकून तडतडू द्या.
  • त्यानंतर वरील साहित्य जसे कि  बारीक कापलेले कांदा,टोमाटो,कोशिंबीर,लसून सर्व साहित्य कुकरमध्ये घालून २ मिनिट तेलात शिजू द्या.
  • त्यानंतर १ चमचा तिखट आणि १/२ चमचा मीठ व चिमुटभर हळद घालून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मंद आचेवर शिजवा.
  • मिश्रणाला तेल सुटू लागले कि त्यात निथळत ठेवलेली अक्खी मसूर टाका.
  • सर्व मिश्रण चमच्याने व्यवस्थित परतवून घ्या.
  • त्यात १/२ ग्लास पाणी घाला.
  • त्यानंतर कुकरचे झाकण लावून १ शिट्टी होऊ द्या’
  • कुकर थंड झाल्यावर झाकण उघडा.
  • अधिक चवीसाठी वरून थोडासा तूप किवा बटर घाला.

अशी हि चवदार फोडणीची अक्खी मसूर तयार आहे.हि गरमागरम अक्खी मसूर चपाती, भाकरी किवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता.

Related Post

भारतातील विविध राज्यांमध्ये लाल मसूरची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते, विशेषतः उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आणि बिहारमध्ये. भारतीय पाककृतींमध्ये लाल मसूरचा वापर विविध प्रकारच्या डिशेसमध्ये केला जातो, ज्यामुळे ही डाळ भारतीय आहारात महत्त्वपूर्ण स्थान मिळवते.

फोडणीची अक्खी मसूर अतिशय पौष्टिक असून याद्वारा तुम्हाला ॲनिमिया विरुद्ध लढण्यात, वजन कमी होण्यास, पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत होते. मसूर रक्तातील लाल रक्तपेशींची संख्या वाढवते, जी अशक्तपणा टाळण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे. हि डाळ खाल्ल्याने त्वचेवर चमक येते. यातील  प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्सच्या उपस्थितीमुळे केस मजबूत केस गळणे कमी होईल.

मसूरची ही रेसिपी चविष्ट असून बनवायला सोपी आहे, आणि फक्त २०-२५  मिनिटांत तयार होते. ती ग्लूटन-फ्री असण्यामुळे ही आरोग्यदायी पर्याय आहे. अशा प्रकारे, फोडणीची अक्खी मसूर ही पौष्टिक आणि स्वादिष्ट डिश आपल्या मेनूमध्ये समाविष्ट करायला हवी.

आरोग्य आणि पोषण सूचना: या वेबसाइटवरील आरोग्य आणि पोषण माहिती सामान्य माहिती देण्यासाठी आहे. प्रत्येकाची पोषण गरज वेगवेगळी असू शकते. वैयक्तिक आहार सल्ल्यासाठी आपल्या आरोग्यतज्ञाचा सल्ला घ्या. आम्ही दिलेल्या माहितीची अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ही माहिती वैद्यकीय सल्ला नाही.

प्राची राजूरकर

प्राची पर्यावरण शास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीधर असून त्यात संशोधन देखिल करीत आहे. याचबरोबर ती शिक्षणशास्त्रात पदवीधर असून कायद्याची देखील पदवीधर आहे. थोडक्यात सांगायचेच तर ती एक संशोधक, शिक्षण व कायदेतज्ञ आहे, आणि मुख्यत्वे ती वनीकरण क्षेत्रात निपुण असून एका जवाबदार पदावर कार्य करीत आहे. तिला विविध सरकारी योजनाबद्दलचे माहिती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवायला आवडते जे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी तसेच मोठ्या सामाजिक परीवर्तनासाठी फायदेशीर ठरेल.

Recent Posts

शेती उत्पन्न आणि आयकर: ITR फाईल करताना शेतकऱ्यांनी काय लक्षात ठेवावं?

"Income Tax", "ITR", "ITR Filing", "ITR Filing Deadline" - जुलै महिना आला की हे शब्द गुगल वर सर्वाधिक शोधले जातात.… Read More

ग्रामीण भारतात रोजगाराच्या नव्या शक्यता: TCS Layoff च्या पार्श्वभूमीवर एक विचारमंथन

भारतातील अग्रगण्य IT सेवा कंपनी TCS (Tata Consultancy Services) ने अलीकडे 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची घोषणा केली. ही घटना… Read More

व्हे प्रोटीन म्हणजे काय?

आज आरोग्य आणि पोषण या विषयांमध्ये लोकांचा रस झपाट्याने वाढत आहे. या प्रवाहात “व्हे प्रोटीन”/ (Whey Protein)  हा शब्द अनेकदा… Read More