Recipes

मशरूम ची सुक्की भाजी- पावसाळ्यासाठी उत्तम रानभाजी

आता पाऊस पडू लागलाय, पावसाळा म्हणजे रानभाज्यांचा ऋतू! अनेक प्रकारच्या रानभाज्या आपल्याला पावसाळ्यात बघायला मिळतात, त्यापैकीच एक आणि प्रथिनांचा उत्तम स्त्रोत असलेली एक रानभाजी म्हणजेच भूछत्र किवा मशरूम (Mushroom)! अनेक प्रकारचे मशरूम बाजारात उपलब्ध आहेत, त्यापैकीच एक म्हणजे बटण मशरूम (Button Mushroom)! चला जाणून घेऊया या रेसिपीचा वापर करून स्वादिष्ट पण पौष्टिक मशरूम ची सुक्की भाजी कशी बनवायची.

मशरूम खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मशरूममध्ये अत्यंत कमी कॅलरी असतात, सोबतच त्याच्यात अनेक पोषणतत्व असतात. मशरुम करी, सलाड, सूप आणि भाजी बनवूनही खाता येतं. इतकंच नाही, तर मशरूम स्नॅक्स म्हणूनही खाता येतात. विशेष म्हणजे मशरूम अनेक आजारांवर एखाद्या औषधापेक्षा कमी नाहीये. तर मग बनवायची न आज या बटण मशरूम ची सुक्की भाजी!

भाजी अगदी १०-१५ मिनिटात तयार होते कारण या मशरूम ला खूप जास्तवेळ शिजवायची गरज नाही कारण मुळातच ते अगदी लवचिक आणि मऊ असतात  म्हणून पटकन शिजतात. बघुयात मग या भाजीला साहित्य काय लागेल ते.

बनविण्यासाठी लागणारे साहित्य (२ व्यक्तीसाठी )- मशरूम ची सुक्की भाजी

  • १५-२० मशरूम (Button mushroom)
  • १ कांदा (Onion)
  • १ टमाटर(tomato)
  • १/२ छोटा चमचा जिरे (Cumin seeds)
  • १/२ छोटा चमचा मोहरी (Mustard) s
  • १ छोटा चमचा लाल तिखट (Red chili powder)
  • १/२ छोटा चमचा हळद (Turmeric powder)
  • २-३  लसून पाकळ्या (Garlic)
  • तेल गरजेनुसार (Cooking oil)
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर

बनविण्याची विधी- मशरूम ची सुक्की भाजी

  • सर्वप्रथम मशरूम धुवून बारीक कापून घ्या,बाकी साहित्य जसे कि कांदा ,टोमाटो धुवून बारीक कापून घ्या
  • शेगडी वर कढई चढवून कढईकाढे गरम झाली कि त्यात तीन चमचे तेल ओता.
  • तेल गरम झाल्यावर त्यात जिरे मोहरी घालून चांगले तडतडू द्या.
  • त्यांनतर त्यात बारीक कापलेले कांदे, टोमाटो, लसून व मशरूम घालून नीट परता.
  • ५ मिनिटे वाफेवर आतील मिश्रण शिजू द्या.
  • त्यानंतर वरून १ छोटा चमचा लाल तिखट, १/२ छोटा चमचा हळद, चविनुसार मीठ घालून परत ५ मिनिटे भाजी शिजू द्या.
  • ५ मिनिटांनी शेगडी बंद करा

गरमागरम मशरूम ची सुक्की भाजी तयार आहे. वरून कापलेली कोशिंबीर घालून सर्व्ह करा.

मशरूम चांगले कोलेस्ट्रॉल किंवा एचडीएल (Good cholesterol / High-density lipoprotein (HDL)) सुधारू शकते आणि ट्रायग्लिसेराईड्स (Triglyceride) कमी करू शकते, ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. मशरूममध्ये भरपूर प्रमाणात सेलेनियम आढळते. हे नैसर्गिक सेलेनियम शरीराला आतून निरोगी ठेवते.

मशरूमचे नियमित सेवन केल्याने तुमचा थकवा आणि नैराश्य कमी होईल ज्यामुळे तुम्हाला दर्जेदार जीवन मिळेल. शिवाय मशरूममध्ये फायबर असल्याने, त्यांच्या सेवनाने पोट बराच काळ भरल्यासारखे वाटते आणि भूकही लवकर लागत नाही. मशरूममध्ये ‘व्हिटामिन डी’ मुबलक प्रमाणात आढळते. दररोज मशरूम खाल्ल्याने शरीराला आवश्यक तितके ‘व्हिटामिन डी’ नैसर्गिकरित्या मिळू शकते.  मशरूम ही एक खाण्यास चविष्ट आणि बनवण्यास अतिशय सोपी भाजी आहे. यातील पौष्टिकता टिकवण्यासाठी मशरूम कुठल्याही प्रकारे शिजवणे फायदेशीर ठरते.

आरोग्य आणि पोषण सूचना: या वेबसाइटवरील आरोग्य आणि पोषण माहिती सामान्य माहिती देण्यासाठी आहे. प्रत्येकाची पोषण गरज वेगवेगळी असू शकते. वैयक्तिक आहार सल्ल्यासाठी आपल्या आरोग्यतज्ञाचा सल्ला घ्या. आम्ही दिलेल्या माहितीची अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ही माहिती वैद्यकीय सल्ला नाही.

प्राची राजूरकर

प्राची पर्यावरण शास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीधर असून त्यात संशोधन देखिल करीत आहे. याचबरोबर ती शिक्षणशास्त्रात पदवीधर असून कायद्याची देखील पदवीधर आहे. थोडक्यात सांगायचेच तर ती एक संशोधक, शिक्षण व कायदेतज्ञ आहे, आणि मुख्यत्वे ती वनीकरण क्षेत्रात निपुण असून एका जवाबदार पदावर कार्य करीत आहे. तिला विविध सरकारी योजनाबद्दलचे माहिती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवायला आवडते जे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी तसेच मोठ्या सामाजिक परीवर्तनासाठी फायदेशीर ठरेल.

Share

Recent Posts

ओल्या हळदीची चटणी – चटपटीत आणिआरोग्यदायी

हळद या वनस्पतीचा वापर तिच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून भारतीय लोक स्वयंपाकात करतात. हळदीला आयुर्वेदामध्ये "हरिद्रा" म्हणतात. हळदीचा वापर… Read More

4 months ago

करटोली ची भाजी – आरोग्याचा खजिना

पावसाळा म्हणजे रानभाज्यांचा ऋतू. सगळीकडे रानभाजी महोत्सव सुरु होतात. याच पावसाळ्यात हमखास उपलब्ध  होणारी एक अत्यंत पौष्टिक अशी रानभाजी म्हणजेच… Read More

4 months ago

स्वीट कॉर्न चे स्वादिष्ट आणि पौष्टिक असे पकोडे

अनेक लोकांना स्वीट कॉर्न खायला आवडते. शहर असो वा गाव, बहुतेक लोकांना स्वीट कॉर्न कणीस खायला आवडते. लोक ते मोठ्या… Read More

4 months ago

This website uses cookies.