शेवग्याच्या पानांचे पराठे
आपला देश फळं, भाज्या यांच्याबाबतीत खूप समृद्ध आहे. मांसाहाराच्या तुलनेत इथं शाकाहाराला (Vegetarian Food) ला अधिक प्राधान्य दिलं जातं. आयुर्वेदासारखी (Ayurveda) अनमोल देणगीही आपल्याला लाभली आहे. आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या अनेक भाज्यांचे औषधी गुणधर्म आता जगालाही पटले असून, जगभर त्याचा प्रसार होत आहे. आपल्या परसदारी अनेक प्रकारची झाडे असतात पण बऱ्याचवेळा आपल्याला त्यांचे महत्व लक्षात येत नाही. असाच एक बहुगुणी वृक्ष म्हणजे शेवगा (Moringa oleifera / Drumstick tree )! चला तर मग बनवूया शेवग्याच्या पानांचे पराठे.
विशेष म्हणजे आपला देश शेवग्याचा अर्थात मोरिंगाचा सर्वात मोठा उत्पादक आहे. शेवग्याच्या शेंगा आपण भाजीसाठी वापरतो पण याच्या पानातही अनेक औषधी गुणधर्म असतात. तुम्हाला महिती आहे का शेवग्याच्या पानांमुळे थकवा आणि अशक्तपणा दूर होत शरीराला उर्जा मिळते. कारण या पानांमध्ये भरपूर लोह व व्हिटॅमिन-ए (Iron and Vitamin A) असते.
आज आपण जे पराठे बनवणार आहोत ते चवदार तर आहेच आणि त्याचे आरोग्यदायी फायदे तर मोठ्यापासून लहाना पर्यंत सगळ्यांसाठी अगदी फायदेशीर ! आणि हे पराठे म्हणजे तुम्ही नाश्त्याला, जेवणात किवा अगदी रात्रीच्या जेवणातही खाऊ शकता. तर आता बनवूयात शेवग्याच्या पानांचे पराठे. अगदी कमी साहित्यात आणि झटपट १५ मिनिटात तयार होणारे.
आता साहित्य काय लागणार ते बघुया !
दह्याबरोबर किवा टमाटर च्या चटणीबरोबर सर्व करा ज्यामुळे हे शेवग्याचे पराठे खायला अधिक लज्जतदार वाटतील.
शेवग्याच्या शेंगांबरोबरच पानं, फुलंदेखील खाण्यासाठी वापरली जातात. शेवग्यामध्ये प्रथिनं (Proteins) , अमीनो अॅसिडस् (Amini acids), बीटा-कॅरोटीन (Beta-carotene) आणि वेगवेगळ्या प्रकारचे फिनॉलिक (Phenolic) असतात जे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात. शेवग्यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम (Calcium) असते. – मुलांसाठी याचा खूपच फायदा होतो. यामुळं हाडं आणि दात मजबूत होतात. रोगप्रतिकार शक्ती (Immunity) वाढविण्यासाठीदेखील शेवगा उपयुक्त ठरतो. त्वचेसाठीही (Skin) शेवगा खूप फायदेशीर आहे.
कृपया येथे मोरिंगा बद्दल अधिक जाणून घ्या: Tamil Nadu Agricultural University
आरोग्य आणि पोषण सूचना: या वेबसाइटवरील आरोग्य आणि पोषण माहिती सामान्य माहिती देण्यासाठी आहे. प्रत्येकाची पोषण गरज वेगवेगळी असू शकते. वैयक्तिक आहार सल्ल्यासाठी आपल्या आरोग्यतज्ञाचा सल्ला घ्या. आम्ही दिलेल्या माहितीची अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ही माहिती वैद्यकीय सल्ला नाही.
भारताच्या ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची परिस्थिती जवळजवळ सारखीच असते. घरात शेती, पावसावर अवलंबून उत्पन्न, आणि शिक्षण म्हणजे आयुष्य बदलण्याची एकमेव… Read More
आजच्या जागतिक घडामोडींमुळे इराण पुन्हा चर्चेत आहे. अर्थव्यवस्था, ऊर्जा संसाधने आणि भू-राजकारण या विषयांबरोबरच इराणच्या शेतीबद्दलही उत्सुकता वाढली आहे. पहिल्या… Read More
दरवर्षी ५ डिसेंबर रोजी जगभरात जागतिक मृदा दिवस (World Soil Day) साजरा केला जातो. FAO आणि संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकाराने सुरू… Read More