Recipes

मिश्र भाज्यांचा रोल

लहान मुलांसाठी नेहमी-नेहमी नाष्ट्यासाठी काय बनवायचं हा प्रश्न माझ्यासारख्या अनेक आईना पडला असतो, रोज रोज भाजी पोळी खायचापण मुल कंटाळा करतात, अशा वेळी त्याच भाजीपोळीला जरा वेगळ्या रुपात मुलांना खाऊ घालता आला तर किती छान!  म्हणूनच वेगवेगळ्या भाज्यांना एकत्र करून आपण आज बनवणार आहोत मिश्र भाज्यांचा रोल. २० मिनिटात तयार होणारा आणि खायला चवदार अशा या  रेसिपी साठी दोन व्यक्तीसाठी जर रोल बनवायचा आहे तर काय काय साहित्य लागेल ते बघूया.

बनविण्यासाठी लागणारे साहित्य – मिश्र भाज्यांच्या रोल

  1. गाजर (Carrot) १ किसलेला
  2. शिमला मिरची (Bell pepper/ Capsicum) २ बारीक कापलेला
  3. पत्ता कोबी (Cabbage) किसलेला  १ वाटी
  4. कांदा (Onion) २ बारीक कापलेला
  5. टमाटर (Tomato) १ बारीक कापलेला
  6. लसून (Garlic) ६ पाकळ्या बारीक कापलेल्या
  7. लाल तिखट (Red chili powder) -१ चमचा
  8. मीठ (Salt)-चवीप्रमाणे
  9. सोयासॉस (Soya sauce)-२ चमचे
  10. चिज क्यूब (Cheese cube) -३  किसलेला
  11. मैदा ( Maida/ all-purpose flour) १/२ वाटी
  12. कणिक ( Wheat flour)-१ वाटी
  13. तेल (Cooking oil) -३ चमचे
  14. दही (Curd) -१ चमचा

बनविण्याची विधी- मिश्र भाज्यांचा रोल 

  • सर्वप्रथम किसलेला गाजर,बारीक कापलेले पत्ताकोबी,शिमला मिर्ची,कांदा,टमाटर, आणि लसूण एकत्र करून घ्या.
  • आता शेगडी वर खोलगट कुकिंग पॅन ठेवून गरम झाला कि त्यात एक चमचा तेल घाला .तेल गरम झाले कि त्यात वर एकत्र केलेल्या भाज्या घालून नीट परतवून घ्या.
  • आता त्यात वरून २ चमचे सोयासॉस , १ चमचा लाल तिखट, १/२ चमचा मीठ घालून हळूहळू परतवून घ्या.
  • २-३ मिनिटे भाज्या परतवून झाल्यावर पॅन मधले मिश्रण एका भांड्यात काढून घ्या.
  • आता दुसरीकडे १ वाटी कणिक,१/२ वाटी  मैदा,चिमुटभर मीठ ,व १ चमचा दही घालून  पोळीसाठी भिजवतो तितका घट्टसर  गोळा भिजवून घ्या.
  • थोडासा उंडा घेऊन त्याची पातळसर पोळी लाटून घ्या.
  • या पोळीला आता तव्यावर दोन्ही बाजूनी छान शेकून घ्या.
  • पोळीला ताटात काढून वर तयार केलेले मिश्रण पोळीवर एका बाजूला पसरवा.
  • वरून थोडा किसलेला चीझ घाला.
  • आता मिश्रण असलेली पोळी रोल प्रमाणि दुमडून घ्या.
  • रोल केलीली पोळी पुन्हा एकदा गरम तव्यावर शेकून घ्या.

तुमचा गरमागरम मिश्र भाज्यांचा रोल तयार आहे.

गरमागरम रोल टोमाटो सॉस बरोबर खायला एकदम छान वाटेल.  हा रोल मुले, मोठी मंडळी नाश्त्याच्या स्वरूपात खाऊ शकतील, याशिवाय बच्चेकंपनीला तर हा मेनू डब्ब्यात मधल्या सुट्टीत खायला पण देऊ शकाल. त्याने दोन फायदे होतील एक म्हणजे रोज भाजी पोळी खाण्याचा कंटाळा करणारे मुले हा रोल आवडीने खाती आणि दुसरा म्हणजे यात भाज्यांचे प्रमाण भरपूर असल्याने या आहारामुळे रक्तदाब कमी होतो, हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका कमी होतो,  डोळ्यांच्या आणि पचनाच्या समस्या कमी होतात आणि रक्तातील साखरेवर सकारात्मक प्रभाव पडतो, ज्यामुळे भूक लागण्यास मदत होते.

Related Post

तर करायचा ण मग हा मिश्र भाज्यांचा रोल आपल्या बच्चेकंपनी साठी!!

आरोग्य आणि पोषण सूचना: या वेबसाइटवरील आरोग्य आणि पोषण माहिती सामान्य माहिती देण्यासाठी आहे. प्रत्येकाची पोषण गरज वेगवेगळी असू शकते. वैयक्तिक आहार सल्ल्यासाठी आपल्या आरोग्यतज्ञाचा सल्ला घ्या. आम्ही दिलेल्या माहितीची अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ही माहिती वैद्यकीय सल्ला नाही.

प्राची राजूरकर

प्राची पर्यावरण शास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीधर असून त्यात संशोधन देखिल करीत आहे. याचबरोबर ती शिक्षणशास्त्रात पदवीधर असून कायद्याची देखील पदवीधर आहे. थोडक्यात सांगायचेच तर ती एक संशोधक, शिक्षण व कायदेतज्ञ आहे, आणि मुख्यत्वे ती वनीकरण क्षेत्रात निपुण असून एका जवाबदार पदावर कार्य करीत आहे. तिला विविध सरकारी योजनाबद्दलचे माहिती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवायला आवडते जे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी तसेच मोठ्या सामाजिक परीवर्तनासाठी फायदेशीर ठरेल.

Recent Posts

काजवा महोत्सव: निसर्गाचा एक जादुई अनुभव

मे महिना सुरू झाला की पावसाळ्यापूर्वीचं दमट वातावरण जाणवायला लागतं आणि त्याच वेळी एक अद्भुत निसर्गनाट्य घडू लागतं. संध्याकाळी झाडांवर… Read More

ग्वार गम: कोरडवाहू भागात सोन्यासारखा पर्याय

ग्वार/ गवार (Cluster Beans / Cyamopsis tetragonoloba) हे खरं तर एक साधंसं पीक वाटतं, ग्रामीण भागात सहजपणे घेतलं जातं. पण… Read More

इथेनॉल उत्पादनात भारताची वाटचाल: संधी, स्थान आणि सावधगिरी

भारताने पेट्रोलमध्ये इथेनॉलचे (Ethanol) 20% मिश्रण (E20) 2030 च्या उद्दिष्टापेक्षा पाच वर्ष आधी, म्हणजे 2025 मध्ये पूर्ण केलं आहे. पण… Read More