Recipes

मिश्र कडधान्यांची उसळ – शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांची मेजवानी

तर आज वेगवेगळी कडधान्ये एकत्र करून आपण बनवूयात मिश्र कडधान्यांची उसळ. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वाना खाता येण्यासारखी आणि छोट्या मोठ्या भुकेसाठी एकदम उत्तम पर्याय!

आपण सर्वाना कडधान्यांचे पौष्टिकत्व तर माहितीच आहे. प्रत्येक कडधान्याची आपापली एक खासियत असते तसाच एक वेगळा आरोग्यदायी फायदा असतो  आणि  वेगवेगळी कडधान्ये जर एकत्र केली तर आपल्याला पौष्टिकतेचा एक जम्बो पॅक च मिळेल की!

कडधान्ये भिजवून किंवा  मोड आणून खाण्याची पध्दत खरोखरच आरोग्यदायी आहे; त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते. क जीवनसत्व तर  भिजवल्यानंतर व मोड आल्यानंतरच तयार होते. कडधान्यांना भिजवून खाल्ल्याने कडधान्यांचा वातूळपणा कमी होतो लोह व कॅल्शियमचे शोषण चांगले होते.

महाराष्ट्रात कडधान्यांना मोड आणून (Sprouting Pulses) खाण्याची जुनी आणि चांगली परंपरा आहे. त्यामुळे काही विशिष्ट विकरे उत्तेजीत होतात आणि त्यांच्यामुळे चांगले बदल घडवून येतात.

मिश्र कडधान्यांची उसळ साठी आपल्याला काय काय साहित्य लागेल ते बघूया.

बनविण्यासाठी लागणारे साहित्य- मिश्र कडधान्यांची उसळ

2 वाटी मिश्र कडधान्ये – यात मुग (Moong), मटकी (Moth Beans), वाटाणे (Dried peas),  बरबटी (Yardlong bean) व चने (Chickpea) प्रत्येकी १/२ वाटीपेक्षा थोडा कमी  या प्रमानात घ्यायचे व रात्रभर पाण्यात भिजू द्यायचे –

  • कांदा (onion) -१ बारीक कापलेला
  • टमाटर (Tomato)-१ बारीक कापलेला
  • हिरवी मिरची(green chilly) -२ बारीक कापलेली
  • कोशिंबीर (coriander)-३-४ काड्या बारीक कापलेली
  • लसून(garlic) – ४-५ पाकळ्या बारीक कापलेला
  • लाल तिखट (Red chilly powder) -१ टेबलस्पून
  • कढीपत्ता ५-१०  पाने
  • १/२ छोटा चमचा जिरे ( cumin seeds)
  • १/२ छोटा चमचा मोहरी ( mustard seeds)
  • मीठ (Salt)- १/२  टेबलस्पून
  • हळद (Turmeric powder)- चिमुटभर
  • तेल(oil) -गरजेप्रमाणे

बनविण्याची विधी – मिश्र कडधान्यांची उसळ

  • सर्वप्रथम प्रेशर कुकर gas वर चढवा
  • कुकर गरम झाला कि त्यात तीन चमचे  तेल घालून तेल गरम होऊ द्या
  • तेल गरम झाल्यावर त्यात जिरे मोहरी टाकून तडतडू द्या.
  • त्यानंतर वरील साहित्य जसे कि  बारीक कापलेले कांदा,टोमाटो,कोशिंबीर,लसून,  कढीपत्ता  सर्व साहित्य कुकरमध्ये घालून २ मिनिट तेलात शिजू द्या.
  • त्यानंतर १ चमचा तिखट आणि १/२ चमचा मीठ व चिमुटभर हळद घालून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मंद आचेवर शिजवा.
  • मिश्रणाला तेल सुटू लागले कि त्यात निथळत ठेवलेले मिश्र कडधान्ये  टाका.
  • सर्व मिश्रण चमच्याने व्यवस्थित परतवून घ्या.
  • त्यात १/२ ग्लास पाणी घाला.
  • त्यानंतर कुकरचे झाकण लावून १ शिट्टी होऊ द्या’
  • कुकर थंड झाल्यावर झाकण उघडा.
  • अधिक चवीसाठी वरून थोडासा तूप किवा बटर घाला.

अशी हि चवदार मिश्र कडधान्यांची उसळ तयार आहे.हि गरमागरम उसळ चपाती, भाकरी किवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. किंवा  मुलांच्या डब्ब्यात द्यायला, नाहीतर नाष्ट्यात खाण्यासाठी अतिशय योग्य.

कडधान्य रात्रभर भिजवत ठेवली तर त्यातील टॅनीन (Tannins) आणि फायटीक अॅसीडचे (Phytic acid) प्रमाण कमी होते. कडधान्यातील फायबर मुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते. मिश्रित कडधान्यामध्ये  प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त असते म्हणून ते सर्व शाकाहारी लोकांसाठी खूप चांगले असते. मिश्रित कडधान्ये फोलेटचा चांगला स्रोत आहेत,  ते पाचक आरोग्य राखतात आणि आपली उर्जा पातळी वाढवतात.

प्राची राजूरकर

प्राची पर्यावरण शास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीधर असून त्यात संशोधन देखिल करीत आहे. याचबरोबर ती शिक्षणशास्त्रात पदवीधर असून कायद्याची देखील पदवीधर आहे. थोडक्यात सांगायचेच तर ती एक संशोधक, शिक्षण व कायदेतज्ञ आहे, आणि मुख्यत्वे ती वनीकरण क्षेत्रात निपुण असून एका जवाबदार पदावर कार्य करीत आहे. तिला विविध सरकारी योजनाबद्दलचे माहिती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवायला आवडते जे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी तसेच मोठ्या सामाजिक परीवर्तनासाठी फायदेशीर ठरेल.

Share

Recent Posts

ओल्या हळदीची चटणी – चटपटीत आणिआरोग्यदायी

हळद या वनस्पतीचा वापर तिच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून भारतीय लोक स्वयंपाकात करतात. हळदीला आयुर्वेदामध्ये "हरिद्रा" म्हणतात. हळदीचा वापर… Read More

4 months ago

करटोली ची भाजी – आरोग्याचा खजिना

पावसाळा म्हणजे रानभाज्यांचा ऋतू. सगळीकडे रानभाजी महोत्सव सुरु होतात. याच पावसाळ्यात हमखास उपलब्ध  होणारी एक अत्यंत पौष्टिक अशी रानभाजी म्हणजेच… Read More

4 months ago

स्वीट कॉर्न चे स्वादिष्ट आणि पौष्टिक असे पकोडे

अनेक लोकांना स्वीट कॉर्न खायला आवडते. शहर असो वा गाव, बहुतेक लोकांना स्वीट कॉर्न कणीस खायला आवडते. लोक ते मोठ्या… Read More

4 months ago

This website uses cookies.