मिश्र कडधान्यांची उसळ
तर आज वेगवेगळी कडधान्ये एकत्र करून आपण बनवूयात मिश्र कडधान्यांची उसळ. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वाना खाता येण्यासारखी आणि छोट्या मोठ्या भुकेसाठी एकदम उत्तम पर्याय!
आपण सर्वाना कडधान्यांचे पौष्टिकत्व तर माहितीच आहे. प्रत्येक कडधान्याची आपापली एक खासियत असते तसाच एक वेगळा आरोग्यदायी फायदा असतो आणि वेगवेगळी कडधान्ये जर एकत्र केली तर आपल्याला पौष्टिकतेचा एक जम्बो पॅक च मिळेल की!
कडधान्ये भिजवून किंवा मोड आणून खाण्याची पध्दत खरोखरच आरोग्यदायी आहे; त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते. क जीवनसत्व तर भिजवल्यानंतर व मोड आल्यानंतरच तयार होते. कडधान्यांना भिजवून खाल्ल्याने कडधान्यांचा वातूळपणा कमी होतो लोह व कॅल्शियमचे शोषण चांगले होते.
महाराष्ट्रात कडधान्यांना मोड आणून (Sprouting Pulses) खाण्याची जुनी आणि चांगली परंपरा आहे. त्यामुळे काही विशिष्ट विकरे उत्तेजीत होतात आणि त्यांच्यामुळे चांगले बदल घडवून येतात.
मिश्र कडधान्यांची उसळ साठी आपल्याला काय काय साहित्य लागेल ते बघूया.
2 वाटी मिश्र कडधान्ये – यात मुग (Moong), मटकी (Moth Beans), वाटाणे (Dried peas), बरबटी (Yardlong bean) व चने (Chickpea) प्रत्येकी १/२ वाटीपेक्षा थोडा कमी या प्रमानात घ्यायचे व रात्रभर पाण्यात भिजू द्यायचे –
अशी हि चवदार मिश्र कडधान्यांची उसळ तयार आहे.हि गरमागरम उसळ चपाती, भाकरी किवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. किंवा मुलांच्या डब्ब्यात द्यायला, नाहीतर नाष्ट्यात खाण्यासाठी अतिशय योग्य.
कडधान्य रात्रभर भिजवत ठेवली तर त्यातील टॅनीन (Tannins) आणि फायटीक अॅसीडचे (Phytic acid) प्रमाण कमी होते. कडधान्यातील फायबर मुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते. मिश्रित कडधान्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त असते म्हणून ते सर्व शाकाहारी लोकांसाठी खूप चांगले असते. मिश्रित कडधान्ये फोलेटचा चांगला स्रोत आहेत, ते पाचक आरोग्य राखतात आणि आपली उर्जा पातळी वाढवतात.
मे महिना सुरू झाला की पावसाळ्यापूर्वीचं दमट वातावरण जाणवायला लागतं आणि त्याच वेळी एक अद्भुत निसर्गनाट्य घडू लागतं. संध्याकाळी झाडांवर… Read More
ग्वार/ गवार (Cluster Beans / Cyamopsis tetragonoloba) हे खरं तर एक साधंसं पीक वाटतं, ग्रामीण भागात सहजपणे घेतलं जातं. पण… Read More
भारताने पेट्रोलमध्ये इथेनॉलचे (Ethanol) 20% मिश्रण (E20) 2030 च्या उद्दिष्टापेक्षा पाच वर्ष आधी, म्हणजे 2025 मध्ये पूर्ण केलं आहे. पण… Read More