गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर आणि ग्राहकांमध्ये एकच चर्चा आहे — E20 पेट्रोल आलंय, पण यामुळे माझ्या गाडीचं माईलेज (Mileage) कमी होईल का? जुन्या इंजिनवर काही दुष्परिणाम तर नाहीत ना?
भारत सरकारच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रम (Ethanol Blending Programme (EBP) मुळे हा प्रश्न अगदी घराघरात पोहोचला आहे. आधीच्या लेखात आपण भारताची इथेनॉल (Ethanol) उत्पादनातील वाटचाल, जागतिक स्थान आणि सावधगिरी या संदर्भात चर्चा केली होती.
पण वाहनधारकांच्या नजरेतून बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे – आजही शुद्ध / इथेनॉल मुक्त पेट्रोल (E0, ethanol-free) भारतात उपलब्ध आहे का?
भारताचा प्रवास: E0 ते E20
भारताने गेल्या 20 वर्षांत मोठी झेप घेतली आहे:
- 2003: Ethanol Blended Petrol (EBP) कार्यक्रमाची सुरुवात – 9 राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 5% ethanol blend (E5) सुरू.
- 2013: National Policy on Biofuels जाहीर.
- 2014 नंतर: इथेनॉल उत्पादन वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना — इथेनॉलसाठी ठराविक दरव्यवस्था (administered price mechanism), विविध कच्च्या मालांपासून उत्पादनास परवानगी, GST १८% वरून ५% पर्यंत घट, दीर्घकालीन खरेदी धोरण जाहीर.
- 2018: अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने (DFPD) साखर कारखान्यांसाठी इथेनॉल उत्पादन क्षमता वाढवण्यास आर्थिक मदत योजना सुरू केली. 2021-22 पर्यंत पेट्रोलमध्ये 10% (E10) इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य आणि 2030 पर्यंत 20% (E20)
- 2021: हे लक्ष्य (E20) पुढे आणून 2025–26 पर्यंत.
- 2025–26 : भारतभर (Pan-India) E20 rollout.
याचा अर्थ असा की, आज बहुतेक पंपांवर E10 ऐवजी E20 डिफॉल्ट मिश्रण (E20 default blend) मिळतं. शुद्ध पेट्रोल (Pure petrol (E0) मुख्य प्रवाहातून जवळपास नाहीसं झालं आहे.
ग्राहकांना इथेनॉल मुक्त पेट्रोल (E0) का हवासा वाटतो?
E20 हे सरकारसाठी पर्यावरणपूरक आणि आयात-निर्भरता कमी करणारा उपाय असला तरी, ग्राहकांसाठी काही खऱ्या चिंता आहेत:
- माईलेज (Mileage): इथेनॉल मध्ये petrol पेक्षा ऊर्जा कमी असते. त्यामुळे 20% इथेनॉल मिश्रण वापरल्यास गाडीचं माईलेज साधारण 6–8% पर्यंत घटू शकतं.
- इंजिन सुसंगतता (Engine Compatibility): जुन्या गाड्यांच्या इंधन प्रणाली (fuel system) मधल्या रबर पाईप्स, सील आणि धातूचे भाग वर जंग (corrosion) चा धोका.
- विश्वासाचा मुद्दा (Trust): अनेक वाहनधारकांना वाटतं की “शुद्ध पेट्रोल = सर्वोत्तम गुणवत्ता” आणि इथेनॉल मिसळलेलं म्हणजेच कमी दर्जाचं.
स्रोत: Autocar India – How does E20 fuel affect efficiency and performance of your vehicle?, आणि Will E20 fuel damage your car? Key risks and compatibility explained
भारतात अजून E0 उपलब्ध आहे का?
उत्तर आहे – हो, पण फक्त प्रीमियम इंधन (Premium fuels) मध्ये.
- XP100 (Indian Oil) – 100 ऑक्टेन असलेलं प्रीमियम इंधन. ऑटोकार इंडिया/ Autocar India च्या लॅब तपासणीत XP100 मध्ये इथेनॉलचे प्रमाण 0.2% पेक्षा कमी आढळले, म्हणजेच ते प्रत्यक्षात इथेनॉल मुक्त (E0) आहे.
- poWer100 (HPCL) – 100 ऑक्टेन, आणि ऑटोकार इंडिया नुसार हे देखील इथेनॉल मुक्त (E0) आहे.
स्रोत: Autocar India – How much ethanol is in your petrol? ऑटोकार इंडिया ने ASTM D4815 मानकानुसार गॅस क्रोमॅटोग्राफी (GC) वापरून योग्य प्रयोगशाळा चाचणी केली.
बाकी प्रीमियम इंधन पर्याय/ premium variants (XP95, Speed, Shell V-Power, Speed 97) आता E20 blends आहेत.
ऑक्टेन नंबर vs इथेनॉल मिश्रण
ग्राहकांमध्ये सर्वात जास्त गोंधळ या दोन गोष्टींमध्ये होतो:
- ऑक्टेन रेटिंग/ Octane rating (RON): पेट्रोलची इंजिनची खडखड/ engine knocking टाळण्याची क्षमता दाखवते. High-compression इंजिनला उच्च octane लागतो.
- इथेनॉल मिश्रण: पेट्रोल मध्ये किती टक्के इथेनॉल मिसळलं आहे ते.
गोंधळ कसा होतो?
कारण इथेनॉल स्वतःच high octane असतं. त्यामुळे पेट्रोलमध्ये मिश्रण केल्यावर खडखड कमी होतो, पण ऊर्जा / energy कमी असल्यामुळे माईलेज कमी होतो.
सत्य काय आहे?
Premium नाव = high octane, पण ethanol-free असं नाही. फक्त XP100 आणि poWer100 हेच आज ethanol-free (E0) आहेत (स्रोत: ऑटोकार इंडिया).
किंमत आणि उपलब्धता
- XP100 / poWer100: साधारण Rs.150–165 प्रति लिटर (शहर आणि राज्यांनुसार बदल).
- Availability: फक्त metro cities (Delhi, Mumbai, Pune, Bengaluru, Hyderabad) आणि काही highways वर निवडक outlets.
- पुण्यात Indian Express ने E0 पेट्रोल मिळणाऱ्या pump ची माहिती दिली आहे (Indian Express)
रोजच्या वापरासाठी practical नाही; niche customers (supercars, high-end bikes, जुनी गाड्या) यांच्यासाठीच उपयुक्त.
कोणत्या गाडीला कोणतं पेट्रोल योग्य?
- नवीन गाड्या (post-2021-22 models) – बहुतेक E20 compatible आहेत. Regular E20 वापरू शकतात.
- जुन्या गाड्या (E20 compatible नाहीत):
- आता E10 पेट्रोल वेगळं उपलब्ध नाही.
- त्यामुळे regular E20 वापरणं अपरिहार्य, पण fuel system (hoses, seals, metals) ची देखभाल नीट करावी. कधीमधी XP100/poWer100 (E0) वापरल्यास engine health चांगलं राहू शकतं. निर्माता कंपनीकडून retrofit किंवा compatibility update बाबत सल्ला घ्यावा.
- High-performance cars/bikes – XP100/ poWer100 (100 octane, E0) सर्वोत्तम पर्याय.
निष्कर्ष
- भारतात आता नियमित वापरासाठी E0 उपलब्ध नाही; तो फक्त विशिष्ट प्रीमियम इंधन/ niche premium fuels (e.g. XP100, poWer100) मध्येच मिळतो.
- ऑक्टेन रेटिंग (Octane rating ) आणि इथेनॉल मिश्रण (Ethanol blending ) ही दोन वेगवेगळी संकल्पना आहेत. Premium नावाचा अर्थ इथेनॉल मुक्त / ethanol-free असतोच असं नाही.
- भविष्यात E20 हेच सामान्य पेट्रोल असेल; E0 फक्त उच्च-प्रदर्शन वाहनांसाठी आणि खास ग्राहकांसाठीच राहील.
- त्यामुळे ग्राहकांनी घाबरून न जाता आपल्या गाडीच्या मार्गदर्शक पुस्तक / Manual मध्ये सुसंगतता / Compatibility तपासावं, आणि त्यानुसार योग्य इंधन निवडावं.